motivation success story Bhika Mahant Babhulgaonkar Shastri honored by state government Hari Narayan Apte Award for book Zhanjar
motivation success story Bhika Mahant Babhulgaonkar Shastri honored by state government Hari Narayan Apte Award for book Zhanjar sakal
संपादकीय

... तुम्ही बि घडाना!

मधुकर कांबळे

आज वयाच्या ७१ व्या वर्षी ३९ पुस्तके, हजारो प्रवचने करणारे भिका महंत बाभूळगावकर शास्त्री म्हणून परिचित

कीर्तनकार असलेले मोठे बंधू भानुदास महाराज यांचे कीर्तन ऐकून सोळा वर्षांचा भिका प्रभावित झाला. ‘‘दादा, मलाही तुझ्यासारखेच कीर्तन करायचे आहे. तू शिकवशील का?’’ अशी भावाला गळ घातली तेव्हा भावाकडून ‘‘तुझे ना शिक्षण झाले. तुला लिहिता वाचता येते.

तू कसे कीर्तन करणार?’’ असे उत्तर मिळाले. ही गोष्ट सकारात्मकतेने घेऊन जिद्दी भिकाने थेट बदनापूरचा महानुभाव आश्रम गाठला. गुरूकडून भगवतगीता मुखोद्गत करण्यास सुरुवात केली.

आज वयाच्या ७१ व्या वर्षी ३९ पुस्तके, हजारो प्रवचने करणारे भिका महंत बाभूळगावकर शास्त्री म्हणून परिचित आहेत. त्यांच्या ‘झांजर’ या पुस्तकासाठी ‘हरी नारायण आपटे पुरस्कारा’ने राज्य सरकारने त्यांना सन्मानित केले आहे.

महानुभाव आणि वारकरी संप्रदाय जोडण्याचे मोलाचे काम ते करत आहेत. ध्येय गाठण्यासाठी वयाच्या १६व्या वर्षी महानुभाव आश्रम गाठला. तेथे त्यांचे आध्यात्मिक शिक्षण सुरू झाले. तेथेच अक्षरे गिरवण्यास सुरुवात केली.

त्यानंतर संस्कृत विद्यापीठात शिकताना संस्कृत आणि मराठी भाषेत पारंगत झाले. अखंड वाचन, चिंतन व मनन सुरू होते. गावोगाव प्रवचन करू लागले. महानुभाव पंथाची चक्रधर स्वामींनी स्थापना केली, तर माउली ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला, प्रचार-प्रसार केला.

चक्रधर स्वामी आणि संत ज्ञानेश्वर समकालीन संत वारकरी कुटुंबातून आलेले महंत बाभुळगावकर भोजराज शास्त्री यांनी या दोन्ही भक्तिसंप्रदायाचा समन्वय साधण्याचे काम केले. वारकरी संतांविषयीची आदरभावना मनात असल्याने महानुभाव आणि वारकरी संप्रदाय यांची समन्वयाची भूमिका घेऊन त्यांनी महानुभाव पंथात कीर्तनपरंपरा रुळवण्याचा प्रयत्न केला.

‘महाचिंतनी’सारख्या सर्वसमावेशक यंत्रणेचे जनक म्हणून ते सर्वश्रृत आहेत. प्रवचनात अध्यात्म सांगण्यासोबतच त्यांनी सामाजिक विषयांना हात घातला. सर्वधर्मसमभाव हा त्यांच्या चिंतनाचा प्रमुख विषय. त्यांची चाळीसहून अधिक ग्रंथसंपदा आहे.

‘निश्चल डोंगरगाव, प्रेमळ माणसं’ हा त्यांचा धडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आहे. ‘मार्गस्थ’ हे त्यांचे आत्मचरित्र नितळ, पारदर्शी पण तितकेच परखड आहे. एक महंत कसा घडतो, हे या आत्मकथनातून कळते. अनेक गुपिते त्यांनी यात उलगडली आहेत.

‘झोळी’, ‘कीर्तन चंद्रिका’, ‘लीळावैभव (ओवीबद्ध दोन भाग)’, ‘महावाक्य’, ‘आनंदसागर’, ‘ओथंबा’, ‘गोत्रज’, ‘एक सूर्य एक प्रभा’, ‘देवमाणूस’, ‘मंत्रपूजा’, ‘प्रायश्चित्त’, ‘श्रीगोविंदप्रभू’, ‘सभाशास्त्र’, ‘अभंगचिंतनी’, ‘भिका म्हणे’, ‘कीर्तन सांगाती’, ‘कीर्तनगंगा’, ‘प्रसादसेवा’, ‘मार्गस्थ’, ‘आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना’, ‘नामाचे दहा ठाय’, ‘मार्गरूढी’,

‘विचारमालिका निरूपण’, ‘शांतिपाठ’, ‘वास्तुपाठ’, ‘झांजर’, ‘मार्गस्थ (आत्मचरित्र दोन भाग)’, ‘वचनमाला (तीन भाग)’, ‘उद्धव गीता’ अशी त्यांच्या नावावर ग्रंथसंपदा आहे. गेल्या २६ वर्षांपासून ते ‘महाचिंतनी’चा उपक्रम आयोजित करतात. देशाच्या विविध भागात निवासी राहून ही ‘चिंतनी’ घेतली जाते.

विविध धर्मगुरू मार्गदर्शनास येतात. यात वारकरी व महानुभाव संप्रदायाची मोठी उपस्थिती असते. त्या व्यासपीठावरून सर्वधर्म- जात-पंथ एक, ही शिकवण दिली जाते. दरवर्षी जानेवारीत हा तीनदिवसीय कार्यक्रम होतो.

राज्यभरातील सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर यात सहभागी होतात. महंत बाभुळगावकर शास्त्री म्हणतात, ‘‘वारकरी संप्रदाय हे माझे माहेर आहे, तर महानुभाव सासर. दोन्ही संप्रदायातील दरी आता मिटली आहे. आज या टोकाने त्या टोकाचा सन्मान केला आहे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: मुंबईतील मतदान केंद्रांवर सुविधा नाहीत; आदित्य ठाकरेंनी व्हिडिओद्वारे मांडली समस्या

Navi Mumbai News: 13 वर्षाच्या मुलाने पॉर्न पाहून अल्पवयीन बहिणीला केलं गरोदर, पनवेलमधील धक्कादायक घटना

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: जावेद अख्तर, शबाना आझमींनी मुंबईत केले मतदान

Deepthi Jeevanji : भारत की बेटी सब पर भारी... दीप्तीने जपानमध्ये रचला इतिहास! 400 मीटर T20 शर्यतीत जिंकले 'गोल्ड मेडल'

IPL 2024: ECB ने निर्णय बदलला... हंगाम संपण्यापूर्वीच इंग्लिश खेळाडू परत जाण्याबाबत पंजाब किंग्सच्या कोचचा खुलासा

SCROLL FOR NEXT