kalaripayattu meenakshi amma
kalaripayattu meenakshi amma 
संपादकीय

सेवा-साधनेवर मोहोर 'पद्मश्री'ची

श्रीमंत मानेshrimant.mane@esakal.com

प्रजासत्ताक दिनानिमित्त जाहीर होणारे पद्म सन्मान दरवर्षीच कसल्या तरी वादाला जन्म देतात. यंदा तसं थोडं कमी घडलं; पण महत्त्वाचं म्हणजे केंद्र सरकारने अतुल्य कामगिरी केलेले भन्नाट कर्तबगार व अवलिया 'पद्मश्री'साठी शोधले. सव्वाशे कोटी लोकसंख्येच्या खंडप्राय भारताच्या कुठल्या तरी कोपऱ्यात आपापल्या क्षेत्रात अत्यंत निष्ठेने काम करणाऱ्यांपैकी काही उदाहरणं तोंडात बोट घालायला लावणारी आहेत.


'चायनीज मार्शल आर्ट'चं मूळ केरळमध्ये असल्याचं मानलं जातं. या युद्धकलेचं नाव कलरीपयत्तू! कोझिकोडे जिल्ह्यात वडकरा या तालुका मुख्यालयी पंचाहत्तरी ओलांडलेल्या मीनाक्षी अम्मा 'कडाथंडन कलरी संगम' नावाच्या गुरुकुलात गेली 68 वर्षे प्रशिक्षणाच्या रूपानं ती कला जतन करताहेत. या चपळ महिला वस्ताद केवळ काठावर उभं राहून शिकवत नाहीत, तर या वयातही आखाड्यात उतरून दोन हात करायची त्यांची तयारी असते. 75 हजार लोकसंख्येच्या समुद्रकिनाऱ्यावरच्या या गावाला पोर्तुगिजांविरोधातल्या संघर्षाचा इतिहास आहे अन्‌ तलवारीचं तळपतं पातं हाती धरलेल्या मीनाक्षी आजीबाईंनी जणू तो संघर्षही जतन केलाय.


कोलकत्याचे बिपीन गणात्रा असेच अवलिया. शाळा अर्धवट सोडलेले अग्निरक्षक. आगीत सख्खा भाऊ गमावला म्हणून गेली चाळीस वर्षे महानगरात कुठंही आग लागल्याचं कळालं, की अग्निशमन दलाच्या मदतीला धावून जातात, लोकांना वाचविण्यासाठी आगीत उडी घेतात. 59 वर्षीय बिपीनभाईंची अग्निशमन दलाला खूपच मदत होते. कारण, 2015 मध्ये कोलकत्यात छोट्या-मोठ्या सोळाशे आगी लागल्या. त्यात 143 बळी गेले, तर 974 जखमी झाले.


तेलंगणच्या खम्मम जिल्ह्यातल्या रेडीपल्लीचे दरीपल्ली रामय्या जागोजागी बिया टाकत राहतात. झाडं लावतात. एक कोटी वृक्षलागवडीचा महापराक्रम नोंदवलाय त्यांनी. लोक त्यांना 'चेतला (झाडवाले) रामय्या' म्हणून ओळखतात. सरकारच्या 'तेलंगणा कु हरिता हरम' (हरितमाला) योजनेला त्यांचा मोठा हातभार लागलाय.
गुजरातेतील बनासकांठा जिल्ह्यात सरकारी गोलिया (ता. दिसा) गावचे गेनाभाई दरगाभाई पटेल दोन्ही पायाने जन्मतः अधू शेतकरी. हजारो हेक्‍टरवर डाळिंब शेती फुलवली म्हणून 'अनारदादा' अशी त्यांची ओळख. गेल्या बारा वर्षांत त्यांनी जिल्ह्याच्या शेतीला पूर्णपणे सेंद्रिय डाळिंब शेतीचं नवं क्षितिज दिलं, गोमूत्राचा वापर व 'मल्चिंग'चं तंत्रज्ञान वापरून. अहमदाबादच्या 'लाइफलाइन फाउंडेशन'चे डॉ. सुब्रतो दास यांनी महामार्गावर अपघातस्थळी अवघ्या 40 मिनिटांत पोचणारी व्यवस्था उभी केली. गुजरातसह महाराष्ट्र, केरळ, राजस्थान व पश्‍चिम बंगालमधील अंदाजे चार हजार कि.मी.च्या महामार्गावर त्यांनी त्या माध्यमातून बाराशेवर जखमींचे प्राण वाचवलेत.


कर्नाटकात दक्षिण कन्नड जिल्ह्याच्या सुल्लीया तालुक्‍यातल्या अलेट्टी इथले गिरीश भारद्वाज मंड्या येथील पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयातून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेले मेकॅनिकल इंजिनिअर. सुल्लीयात स्वतःचा व्यवसाय टाकला अन्‌ वन खात्याच्या मागणीखातर लाकडी फळ्या, वायररोप व लोखंडी पट्ट्यांचा वापर करून ऋषिकेशच्या लक्ष्मण झुल्यासारखा झुलता पूल बांधला. त्याची मागणी वाढली. लोखंडाच्या तुलनेत दहा टक्‍के खर्चात, अवघ्या तीन महिन्यांत तयार होणारे शंभरावर पूल कर्नाटक, केरळ व आंध्र प्रदेशात बांधले. त्यातून 'सेतूबंधू' अशी त्यांची ओळख बनली.


बिहार, सिक्‍कीम, मेघालय; तसेच भूतान, बांगलादेश सीमेच्या बेचक्‍यात पश्‍चिम बंगालमधला जलपैगुडी जिल्हा वसलाय. जिल्ह्याचे मुख्यालय तीस्ता नदीच्या पश्‍चिम तीरावर, तर माल तालुका व धालाबारी गाव पूर्व तीरावर. तिथले 'ऍम्ब्युलन्सदादा' करीमुल हक दुचाकीवरची रुग्णवाहिका चालवतात. बत्तीस किलोमीटरवर जिल्हा रुग्णालयात गरजूंना पोचवतात. त्यांची दुचाकी वीस गावांची जीवनदायिनी बनलीय. तीन हजारांहून अधिक जीव त्यांनी वाचवलेत.

आईच्या कष्टाचे फेडले पांग...
तेलंगणातली हातमागावरची पोचमपल्ली सिल्क साडी प्रसिद्ध आहे. मुख्यत्वे स्त्रिया विणकाम करतात. हजारो कुटुंबांचं पोट त्यावर चालतं; पण मोठं कष्टाचं काम. एका साडीसाठी चात्यांवर धागा गुंडाळताना विणकरांना हात एक मीटर वर्तुळात तब्बल नऊ हजार वेळा खाली-वर करावा लागतो. चिंताकिंदी मल्लेशाम हे शाळा अर्धवट सोडावी लागलेले नलगोंडा जिल्ह्यातल्या शर्जीपेट गावचे विणकर. आई लक्ष्मी मल्लेशामचे कष्ट त्यांना पाहवले नाहीत. सायकलच्या चाकाचा वापर करून त्यांनी बनवलेल्या यंत्रानं धागा गुंडाळण्याचं कष्ट संपवलं. चार तासांऐवजी दीड तासात साडी विणली जाऊ लागली. 1999 मध्ये त्या यंत्राला चिंताकिंदींनी आईचंच नाव दिलं. आर्थिक मदतीचा हात 'नाबार्ड'नं दिला अन्‌ सामान्यांचे कष्ट कमी करणारं संशोधन विणकरांच्या कामाला आलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT