Dhing Tang 
संपादकीय

ढिंग टांग : चंद्रावर स्वारी!

ब्रिटिश नंदी

नमोजीभाई : जे श्री क्रष्ण! 
मोटाभाई : जे श्री क्रष्ण..! 
नमोजीभाई : शु काम? 
मोटाभाई : एमज...बद्धा ठीक तो छे? 
नमोजीभाई : बहु टेन्सनमां छूं! 
मोटाभाई : शुं थयु? 
नमोजीभाई : मने डिस्टर्ब नथी करतो! हुं रिव्हर्स काऊण्ट डाऊन मां बिझी छूं! 
मोटाभाई : रिव्हर्स काऊंट डाऊन? 
नमोजीभाई : उलटी गिनती! 
मोटाभाई : पण इलेक्‍सन तो खतम थई गया! हवे उलटी गिनती शा माटे? 

नमोजीभाई : तुम्हाला तो सगळीकडे इलेक्‍सनज दिसते! हूं चांद उप्पर यान भेजू छूं!! 
मोटाभाई : यान? 
नमोजीभाई : चोक्‍कस! 
मोटाभाई : चांद? 
नमोजीभाई : हां भाई हां!! 
मोटाभाई : चांदवर यान कशाला पाठवते? मी आत्ताज कर्नाटकमधे यान पाठवला!! व्हाया गोवा!! 
नमोजीभाई : कर्नाटक तो अहिंयांज छे! 
मोटाभाई : हवे मध्यप्रदेश अने राजस्थानमां यान पाठवणार हाय!! उलटी गिनती शुरु छे!! गोवा, कर्नाटक, मध्यप्रदेस, राजस्थान...बध्दा इंडिया मां कमळयान मोकळवानु छे!! 
नमोजीभाई : हूं स्पेसमां कमळ मोकळवानी वात करु छुं!! 

मोटाभाई : हां मने खबर छे! 
नमोजीभाई : शूं खबर छे? 
मोटाभाई : एटले के, आपडी पार्टी पूरे दुनियामधी नंबर वन हाय! एने विश्‍वमां नंबर वन करवानु छे! 
नमोजीभाई : करेक्‍ट!! हूं छूं ने! मैं हूं ना!! 
मोटाभाई : तमे छो, तो कछु चिंता नथी!! 
नमोजीभाई : चांद केटला दूर छे, तमे खबर छे के!! 
मोटाभाई : बहु लंबा नथी! मारे घरने अगाशी उप्परथी दिखे छे!! 
नमोजीभाई : अगाशीने मारो गोली! चांद आपल्यापासून त्रण लाख चुराशी हज्जार चारसो किलोमीटर दूर आहे!! खबर छे? 
मोटाभाई : ओ म्हारा बाप!! 

नमोजीभाई : हूं त्यां चांद्रयान लेंड करीश!! 
मोटाभाई : लेंडिग अलाऊड छे त्यां? 
नमोजीभाई : मनी लेडिंग नथी!! तिथे उतरायच्या हाय!! 
मोटाभाई : तो टेन्सन शूं छे!! 
नमोजीभाई : चांदउप्पर कोणे मोकळवानुं, आ सवाल छे!! 
मोटाभाई : अरे बाप रे!! तुम्ही तर तिकडे ज्यायच्या प्लान करत नाही ने? 

नमोजीभाई : मने तो जावानुं छे! पण त्याला टाइम लागणार! चांद्रयान-12 ज्याणार, तेवाशीक मी ज्याणार! 
मोटाभाई : मने पण जावानुं छे! 
नमोजीभाई : रोकेट उडाला पायजे ने? 
मोटाभाई : तो तुम्ही कशाला ज्याते? नका जाऊ!! 
नमोजीभाई : हूं हवे अमेरिकाला ज्याणार हाय! डोनाल्डभाईना बुलावो आव्यो छे! चांद्रयानमधूनशी मला हिंदी माणस मोकळायच्या हाय! 
मोटाभाई : काय करायच्या हाय? 
नमोजीभाई : मोकळवानु छे! भेजनेका हय! पाठवायच्या हाय! सांभळ्यो? 
मोटाभाई : आपडा अमदावाद वाळा गुजराथी माणस चालेश? 
नमोजीभाई : ना! 

मोटाभाई : तो मराठी माणस मोकळो! एने मोकळीस तो चांद उप्पर बद्धा सूपडा साफ थई जईश!! बोम्बेमधी बांदऱ्यात चांदजेवाच खड्‌डा छे रास्ता मां! बांदऱ्याच्या लोगांना चांदवर घरच्यासारखा वाटणार!! एनेज मोकळ्यो!! 
नमोजीभाई : ना बाबा ना! मराठी माणस तो अहिंयांज ठीक छे!! 
मोटाभाई : कोणाला पण पाठवा, पण भाजपावाळा नको! 
नमोजीभाई : अच्छा? बट व्हाय? 
मोटाभाई : माझा एक प्रिथिमीवरचा व्होटर कमी होएल ने!! तुम्ही असा करा...तुम्ही कोंग्रेसवाला पाठवा! प्रिथ्वी कोंग्रेसमुक्‍त होऊन ज्याणार! बराबर ने?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Main Exams 2026 Postponed : MPSC च्या तीन महत्त्वाच्या मुख्य परीक्षा ढकलल्या पुढे; सुधारित तारखा लवकरच होणार जाहीर

Jammu-Kashmir Assembly: जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा? विधानसभेत ठराव मंजूर, भाजपचा सभात्याग! काय बदल होणार?

Ladki Bahin Yojana ₹1500 Installment : लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 ऐवजी किती पैसे जमा झाले? घरबसल्या मोबाईलवर मिनिटांत तपासा रक्कम; कशी पाहाल स्टेटस?

Udaipur ₹2 Crore Bribery Case : एसीबीच्या जाळ्यात सापडला मोठा मासा? तब्बल 2 कोटी रुपयांची घेतली लाच; एसओजी अधिकाऱ्याच्या नावाने पैसे घेणारा दलाल जाळ्यात

Latest Marathi News Live Update: गुंज परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; ३० जणांना चावा

SCROLL FOR NEXT