practical art and life living art how to live life Sakal
संपादकीय

प्रत्यक्ष कला आणि जगण्याची कला

एक फार प्रसिद्ध गोष्ट आहे. एका भुकेल्या मुलाला एक रुपया मिळतो. त्यातून तो एक गुलाबाचे फुल आणि खाण्याचा पदार्थ घेतो.

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. शेफाली भुजबळ

एक फार प्रसिद्ध गोष्ट आहे. एका भुकेल्या मुलाला एक रुपया मिळतो. त्यातून तो एक गुलाबाचे फुल आणि खाण्याचा पदार्थ घेतो. खरे तर त्याची भूक इतकी मोठी असते की, त्याने मिळालेल्या सगळ्या पैशांतून पदार्थ घेतला असता तरी चालले असते; पण तसे तो करीत नाही. त्याने जे केले त्याचे उत्तर देताना तो मुलगा म्हणतो,

''अर्ध्या पैशातून घेतलेल्या पदार्थामुळे माझे जगणे मला पुढे नेता येईल; पण ते पुढे का न्यायचे याचे उत्तर ते गुलाबाचे फूल देईल. या गोष्टीचा सारांश इतकाच की, जगायचं कशासाठी? आणि कसे ? याची उत्तरे माणसाला आयुष्यात मिळाली पाहिजेत. नुसतेच जगणे आणि कलापूर्ण जगणे यामध्ये मूलभूत फरक आहे.

तो फरक जोपर्यंत लक्षात येत नाही, तोपर्यंत या पृथ्वीतलावर जगणाऱ्या कोट्यावधी कृमी, कीटकांमध्ये आणि आपल्यामध्ये फारसा फरक उरणार नाही. म्हणून जीवन जगण्याची कला आत्मसात करता यायला हवी. ती केल्यानंतर टाकलेले एक पाऊलसुद्धा आनंदनिर्मिती घडवून आणत असते.

ज्यावेळी मी स्वत: ''भरतनाट्यम'' या नृत्यप्रकाराचे शिक्षण घेत होते त्यावेळी गुरूने दिलेला एखादा तोडा घरी येऊन रियाजाने पक्का करताना कधीकधी कंटाळा येत असे. हे मी अतिशय प्रामाणिकपणे माझ्या गुरूंना सांगितले.

त्यावेळी त्या मला म्हणाल्या, "मी शिकवलेला तोडा पक्का करण्यासाठी रियाज करावाच लागेल; पण तो करताना आपली भावस्थिती त्या तोड्याच्या बोलांमध्ये जोपर्यंत एकाग्र होत नाही तोपर्यंत ती नुसतीच कसरत असते आणि मग त्यात कंटाळा येणे सहाजिक आहे.

आपल्या जगण्याचा एक भाग म्हणजे आपण करत असलेला रियाज आहे, हे जोपर्यंत आपल्या मनाला आपण समजावून सांगत नाही तोपर्यंत कंटाळा येत राहाणार.’’ त्यांचे हे म्हणणे माझ्या आणि माझ्याबरोबरच्या इतर विद्यार्थिनींवर परिणाम करणारे ठरले.

त्यानंतर आम्ही दोघी-चौघींनी गुरूंनी सांगितले त्याप्रमाणे करायचे असे ठरवले. आता गोष्ट जरा पुढे गेली होती. माझ्या बरोबरच्या विद्यार्थिनींवर आमच्या गुरूंच्या बोलण्याचा असर पुढचे एक महिना राहिला आणि पुन्हा पहिल्यासारखीच स्थिती झाली. मी मात्र रियाज करताना जाणीवपूर्वक गुरूंच्या त्या शब्दांना आठवत राहिले.

नंतर नंतर ते शब्द मागे पडले त्या शब्दांच्या मागचा भाव रियाजाच्या वेळी आपोआप आठवू लागला. थोड्याच दिवसात कंटाळा येणे बंद तर झालेच; पण पुढे आता आपण काय शिकणार आहोत याची उत्सुकता वाढीस लागली. गुरूंनी मला कलेचा संबंध हा फक्त कृतीशी नसून जीवनाशी आहे हे सांगितल्याने जीवन जगण्यातले भाव बदलत गेले.

नृत्य ही एक अशी कला आहे, की जी त्या नृत्य करणाऱ्याबरोबरच रसिकालाही स्वतःमध्ये सामावून घेते. नृत्यामध्ये फक्त शारीरिक हालचाली नसतात; किंबहुना नृत्य हे संपूर्ण शरीराचे जरी दिसत असले तरी ते खऱ्या अर्थाने घडत असते ते फक्त नृत्य करणाऱ्याच्या चेहऱ्यावर.

नर्तक अथवा नर्तकीचा चेहरा गाण्यातले शब्द, पढंतमधील बोल यांच्यामागे असणारा भाव कोणत्या पद्धतीने आविष्कृत करतात यावर रसिक त्या नृत्यामध्ये रंगून जात असतो. ताल, लय यांच्या सम्मीलनामध्ये घडत जाणारी ही प्रक्रिया शास्त्र म्हणून त्या नर्तकीला कळत असते; पण त्यापलीकडे कलेच्या पातळीवर जाणारे ते नर्तन रसिकाला आपल्याबरोबर घेऊन जाते.

हा सगळा विषय ज्यावेळी जीवन नावाच्या पातळीवर येतो त्यावेळी प्रत्येकाच्याच जगण्यात काही ना काही विषय असतोच. त्या विषयाचे शास्त्र म्हणून त्या व्यक्तीला माहीत असते; तरीही जगाची चाललेली लय आणि आजूबाजूच्या वातावरणाचा असलेला ताल समजून घेत त्यावर आपण आपले ‘चेहऱ्यावरचे हावभाव’ बदलत असतो.

त्यात सुख - दुःख, हास्य आणत असतो. ही कला कशी साध्य होते याचे उत्तर जो ज्या कलेमध्ये रूची घेईल त्यानुसार देईल. तात्पर्य काय तर प्रत्यक्ष कला आणि जगण्याची कला या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत. एका विशिष्ट ठिकाणी त्या एक होतात आणि आपल्याला आनंद कसा मिळवावा, याचे दिग्दर्शन करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: विमान अपघाताचा २२ पानांचा प्राथमिक अहवाल आला; ब्लॅक बॉक्समध्ये काय आढळलं? विमान झाडावर कोसळलं अन्...

Israel Iran War: इस्रायल-इराण तणावाचा परिणाम! दुबई, सौदी, कतारला जाणारी एअर इंडियाची उड्डाणे रद्द; वाहतुकीवर युद्धाचे सावट

एक नाही बिग बॉस मराठीच्या घरात होणार तीन वाईल्ड कार्ड ENTRY ? या सेलिब्रिटींची सोशल मिडीयावर चर्चा

T20 WC, IND vs WI: रिंकू सिंगनं वडिलांच्या निधनाचं दुःख बाजूला सारून टीम इंडियासाठी कोलकाता गाठलं; Video Viral

Latest Marathi News Live Update : अजित दादांच्या अपघातग्रस्त विमानाचा प्राथमिक अहवाल उघड

SCROLL FOR NEXT