Pune Edition Editorial Article on Marm on Jungle King
Pune Edition Editorial Article on Marm on Jungle King 
संपादकीय

जंगलचा राजा का दुरावतोय ? (मर्म)

सकाळवृत्तसेवा

देशात गेल्या काही वर्षांत सरकारी पातळीवरील प्रयत्न, पर्यावरणाबाबत वाढती जागरूकता, जंगली श्‍वापदांचे संवर्धन या सर्वांचा परिपाक म्हणून जंगलचा राजा सिंह, वाघ, हरणं आणि इतर श्‍वापदांची संख्या झपाट्याने वाढत आहे. हे आशादायक चित्र एका बाजूला असताना गुजरातमधील तीन हजार चौरस किलोमीटरपेक्षा जास्त गिर क्षेत्रातील सिंहांच्या एकापाठोपाठ एक मृत्यूने काळजी निर्माण झाली आहे. दुसरीकडे नरभक्षक वाघाला ठार करण्यासाठी न्यायालयाच्या संमतीने हत्यार वापरावे लागत आहे. सप्टेंबरच्या मध्यापासून गिर अभयारण्यात सिंह मृतावस्थेत सापडू लागले.

सुरवातीला वर्चस्वसंघर्षातून एकमेकांना जखमी करण्यातून हे घडल्याचे सांगितले गेले. त्यानंतर श्‍वासास अडथळा, यकृत आणि मूत्रपिंडांना विषाणूंची बाधा, यामुळे हे मृत्यू होताहेत की काय, अशी शंका निर्माण झाली. वन खात्याने तातडीने हालचाल केली. 500वर कर्मचाऱ्यांची दीडशेच्या आसपास पथके करून त्यांच्याद्वारे "सिंह वाचवा' मोहीम सुरू केली. आजारी सिंहांना इतरांपासून दूर ठेवून उपचार सुरू केले, तरी मृत्यूचे थैमान थांबेना. कॅनन डिस्टेंपर विषाणूबाधेने (सीडीव्ही) हे मृत्यू होतात, असा प्राथमिक अंदाज आहे. गिरमध्ये 2008 मध्ये पावणेदोनशेच्या आसपास सिंह होते. 2010 मध्ये ती 411 वर गेली; 2015 मध्ये हाच आकडा 525पर्यंत पोहोचला.

आजमितीला सहाशेच्यावर सिंह येथे असावेत, असा अंदाज आहे. वन खाते, पर्यावरणप्रेमींच्या प्रयत्नांतून वाढलेल्या या संख्येला 18 दिवसांतील 21वर सिंहांच्या मृत्यूने ग्रहण लागले आहे. पूर्वेकडील डालखानिया या विरळ सिंहवस्तीच्या भागात मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. दर वर्षी गिर अभयारण्यात विशेषतः पावसाळ्याच्या तीन महिन्यांत शंभरच्या आसपास सिंहाचा मृत्यू होतो. तथापि, या वेळचे मृत्यूचे थैमान नेहमीपेक्षा वेगळे आहे. 1994 मध्ये "सीडीव्ही'च्या बाधेने टांझानियात हजारच्या आसपास सिंहांचा मृत्यू झाला होता.

यावरून या विषाणूचा फैलाव आणि त्याची विध्वंसकता लक्षात येते. हे लक्षात घेता वन खात्याचे सुरू असलेले प्रयत्न स्तुत्य असले, तरी आजारावरील उपचारासाठी प्रतिबंधक लस येणे, ती सिंहांना देणे, अन्य कारणे असतील तर त्याबाबत प्रयोगशाळांतून वेगाने अहवाल येणे, त्याची कार्यवाही करणे, यात फारसा वेळ दवडता कामा नये. सिंहांना वाचवण्याचे प्रयत्न गतिमान केले पाहिजेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: लाईक्ससाठी पेटवलं जंगल ! सोशल मीडियावर आगीचा व्हिडिओ अपलोड केल्या प्रकरणी तिघांना बेड्या

Harshit Rana KKR vs LSG : कारवाईनंतरही हर्षित राणा सुधरला नाही; बीसीसीआयला पुन्हा डिवचलं?

Latest Marathi News Update : १० जूनला भाजपचा मुख्यमंत्री शपथ घेईल- पंतप्रधान नरेंद्र मोदी

World Athletics Relays : भारतीय महिला अन् पुरुष संघाची रिलेमध्ये दमदार कामगिरी, आता ऑलिम्पिक पदकासाठी पॅरिसमध्ये धावणार

Google Chrome Errors: गुगल क्रोम युजर्सना सरकारचा इशारा, नुकसान टाळण्यासाठी लगेचच करा 'हे' बदल

SCROLL FOR NEXT