Ashdin Doctor
Ashdin Doctor sakal
संपादकीय

बदलत्या जीवनशैलीचे पॉडकास्ट

सम्राट कदम

बदलत्या जीवनशैलीमुळे दिवसेंदिवस मानसिक आणि शारीरिक व्याधींमध्ये वाढ होत आहे. अशा आजारांना तोंड देण्यासाठी छोट्या-छोट्या बदलातून समृद्ध आरोग्यासाठी ॲशदीन डॉक्टर यांनी ‘हॅबीट कोच पॉडकॉस्ट’ची सुरवात केली आहे. या वास्तवदर्शी पॉडकास्टचा घेतलेला मागोवा...

प्रश्‍न - जीवनशैलीशी निगडित या पॉडकास्टची गरज का भासली?

ॲशदीन डॉक्टर - वैयक्तिक ते सार्वजनिक आरोग्यासंदर्भात मार्गदर्शन करणारे अनेक पॉडकास्ट सध्या अस्तित्वात आहेत. मात्र, ही सर्व पॉडकास्ट परदेशी आहेत. आपल्या देशातील समस्यांना गृहित धरून, खऱ्या अर्थाने भारतीयांना मार्गदर्शन करणाऱ्या स्वदेशी पॉडकास्टची गरज होती. म्हणूनच आम्ही ‘हॅबीट कोच पॉडकास्ट’ची सुरवात केली. केवळ माहितीचा भडिमार न करता रोजच्या आयुष्यात अमलात येतील, अशा सल्ल्यांची गरज होती. तीच आम्ही यातून पूर्ण केली. आपल्या सवयी आणि विचारांमुळे आपल्या आयुष्याचा दर्जा ठरतो हे निश्चित होते. त्यामुळे हीच मध्यवर्ती कल्पना होती.

जीवनशैलीशी निगडीत व्याधी वाढण्याचे प्राथमिक कारण काय असावे?

मानसिक आणि शारीरिक व्याधींचे प्रमाण वाढत आहे. खरं तर अनेक वर्षांनंतर प्रथमच मानसिक आरोग्याबाबत चर्चा व्हायला लागली आहे. ताणतणावांमुळे रोजच्या आयुष्यात चिडचिड आणि एकटेपणा वाढला आहे. तो दूर करण्यासाठी व्यक्त होणे गरजेचे आहे. अगदी कृतज्ञता व्यक्त करण्यापासून ते मन मोकळे करण्यापर्यंतच्या कृती नियमीत घडायला हव्यात. आज याची कुठे तरी कमतरता जाणवत आहे.

शारीरिक व्याधींबाबत बोलायचे ठरले तर, आज आपल्या बहुतेकांची हालचालच पार बंद झाली आहे. खाण्याच्या पद्धतीही बदलल्या आहेत. सकस आहाराची जागा जंक फूडने घेतली आहे. त्यामुळे रोजच्या दिनचर्येत हालचालींची अधिक वाढ करणे आणि त्याचबरोबर सकस आहारावर भर देणाऱ्या टिप्स आम्ही या पॉडकास्टद्वारे सांगत असतो. छोट्या-छोट्या बदलातूनच आरोग्य बदलत असते.

पॉडकॉस्टची सुरवात कशी झाली?

माझ्या वैयक्तिक अनुभवातूनच हा पॉडकास्ट सुरू झाला. माझ्या चुकीच्या सवयी आणि त्यातून उद्भवलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने माझे जीवनच आरपार बदलले. रोज चार मिनिटांसाठी सुरू केलेला व्यायाम पॉडकास्टपर्यंत येऊन ठेपला आहे. माझा प्रवास सांगताना लोकांना तो अवघड वाटत होता. म्हणून छोट्या गोष्टींनी सुरवात केली.

सुरवातीला मी लोकांना खासगीमध्ये मार्गदर्शन करायचो. लोकांमध्ये नवे काही करण्याची प्रेरणाच नव्हती. त्यासाठी एक मॉडेल तयार केले. रोजची हालचाल, सकस आहार, चांगली झोप, निवळलेला ताणतणाव आणि श्वसनाच्या पद्धतींसंबंधी वर्तनात बदल करणे याबाबतचे सल्ले आम्ही दिले. पुणे आयव्हीएमच्या स्टुडिओची साथ मिळाली आणि हे पॉडकास्ट अस्तित्वात आले.

सुरूवातीचे आव्हाने कोणती होती?

आम्ही सुरूवात केली त्यावेळी पॉडकास्टबद्दल लोकांना फार काही माहिती नव्हते. त्यामुळे त्यांच्यामध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे. दुसरं म्हणजे लॉकडाउनच्या काळात मी कर्जतवरून व्हॉइस नोटवर पॉडकास्टचा आवाज रेकॉर्ड केला. अन् मला सांगायला अभिमान वाटतो की, आजपर्यंत एकही कार्यक्रम रद्द झालेला नाही. पॉडकास्ट ऐकणारा श्रोता हा जरा भिन्न असतो.

तो रोज आपल्याशी एक प्रकारे संवाद साधत असतो. त्यामुळे दररोज किंवा वेळच्या वेळी त्याला आवाजाच्या माध्यमातून भेटायला हवे. सध्या ताणतणावात असलेल्या श्रोत्यांबरोबरच आपल्या आयुष्यात नवे काही करू पाहणारे श्रोते आमचा पॉडकास्ट ऐकत असतात. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून नोकरदारांपर्यंत आमचे श्रोते आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT