Hous of Bamboo
Hous of Bamboo Sakal
संपादकीय

हौस ऑफ बांबू : उदगीरचे दमगीर वीर!

कु. सरोज चंदनवाले

नअस्कार! पंखा ऑनवर सोडून पहुडल्ये आहे. एवढं डिहायड्रेशन झालं आहे की घसा सुकलाय की मीच, हेच कळत नाहीए. डॉक्टरांकडे जाऊन आले. ते म्हणाले, ‘लिंबूपाणी प्या असं प्रिस्क्रिप्शन देणार होतो. तुम्हाला लिंबं परवडतील का? मी महाग औषधं पेशंटला कधीही लिहून देत नाही...’ नुकतीच उदगीरच्या मोहिमेवरुन परतल्ये आहे, म्हणून ही अवस्था. ९५ वं अखिल भारतीय साहित्य संमेलन (एकदाचं) उदगीरला पार पडलं, हे चांगलंच झालं. संमेलनाच्या दिवशी एक-दोन पत्रकार मांडवाच्या बाहेरच भेटले. एक माझ्याकडे शिंग रोखून पाहात होता. मला म्हणाला, ‘तुम्ही आयोजकांपैकी आहात का?’ मी म्हटलं, ‘आपण सगळे सारस्वत या सोहळ्याचे आयोजकच नाही का?’

मांडवाच्या आत कूलर समोर उभं राहून काही पत्रकार गार वारा घेण्याचा प्रयत्न करीत होते. एकानं शेवटी हवालदिल होऊन कूलरच्या पाठीमागे जाऊन डोकावून बघितलंन!

‘भयंकर गरमी हो’ असं एक पत्रकार दुसऱ्या पत्रकाराला सांगत होता. त्या पत्रकारांच्या कोंडाळ्यालाच मी ‘निमंत्रितांची राहण्याची सोय कुठं आहे?’ हे विचारुन घेतलं. तेवढ्यात एक साहित्य कार्यकर्ता अदबीनं पुढे आला आणि त्यानं यादीत माझं नाव विचारुन ‘तुम्ही बिदर रोडला अमक्या अमक्या हाटेलात जावा’ असं सांगितलं.

‘तुम्हाला हॉटेलात उतरवलंय, म्हंजे मजाय!’ एक पत्रकार माझ्याकडे बघून म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावर ‘भला इसकी कमीज मेरे कमीजसे सफेद कैसी?’ असे भाव होते. त्याची चूक नव्हती. त्याला पशुवैद्यक महाविद्यालयाच्या वसतीगृहात उतरवलं होतं. बैल-घोड्यादी प्राण्यांसमवेत आपण राहातोय, या कल्पनेने तो मनातल्या मनातच हंबरला. ‘हे तर काहीच नाही, ते अमके अमके पत्रकार हॉस्पिटलात उतरलेत!,’ दुसरा पत्रकार म्हणाला.

‘क्याय? हास्पिटलात? म्हंजे आडमिटच झाले म्हणा की...हाहा!!,’ तिसरा पत्रकार खिंकाळला. ‘हॉस्पिटल नव्हे हो, डोळ्यांचा दवाखाना आहे तो!’ दु. पत्रकारानं खुलासा केला.

‘चला, पत्रकारांना नवी साहित्यदृष्टी तरी मिळेल,’ चौथ्यानं मल्लिनाथी केली. बहुधा कुण्या दैनिकाचा पगारी नाट्यसमीक्षक असावा! ‘नशीब, म्याटर्निटीत नाही उतरवलंन! नाहीतर जाताना...ह्यॉह्यॉ ह्याक ह्याक...खीकफ्रीक...ठ्यांश!,’ पाचव्या पत्रकारानं स्वत:च्याच भंपक विनोदावर (एकट्यानंच) खोखो हसून घेतलं. बहुधा कुण्या दैनिकाचा पगारी विनोदी स्तंभलेखक असावा!

...मांडवाच्या मागल्या बाजूला जेवणाची सोय आहे, असं कळल्यावर पावलं आपोआप तिथं वळली. कारण अस्सल मराठवाडी भोजनानुभवाची तिथं जय्यत तयारी असेल, असं सांगण्यात आलं होतं. खास न्याहारीची लज्जत वाढवणारा, सुशिला (हे खाद्यपदार्थाचं नाव आहे. कृती : पसाभर कुरमुरे घ्यावेत, आणि पाण्यातून निथळून काढावेत. कांदेपोह्याला करतात तशी शेंगदाणे, कांद्याची फोडणी करुन त्यात भिजरे कुरमुरे घालावेत. सुशिला तयार!) मिळणार होता. भोकरी डाळ, भाकरी, दही-धपाटे, शेवभाजी, बेसनवडी, बैंगन मसाला अशी मराठीवाडी मेजवानी मिळणार म्हणून कोथरुडहून उठून उदगीरला गेले होते.

पण...पण साधं मिर्चीचं भजंसुध्दा मिळालं नाही. मराठी संमेलनाचा मुदपाकखाना हैदराबादी बल्लव सांभाळत होते! भोजन कक्षात अनेक साहित्याचे मानकरी रांग धरुन उभे होते. भोजनकक्षात दोन सुंदर मुली नुसत्याच उभ्या होत्या. त्या का उभ्या होत्या, हे शेवटपर्यंत कुणालाही समजलं नाही. मराठीचा गंधही नसलेले वाढपी निर्विकार चेहऱ्यानं वाढत होते. ‘भाऊ, भात दे नं’ असं म्हटलं तर ‘क्या?’ असं एक वाढपी ओरडला. मराठी लेखकासाठी ‘भाकरीची भाषा’ तूर्त तरी हिंदीच आहे, हे उदगीरच्या मांडवात लक्षात आलं. पुढलं संमेलन जरा कमी तिखट करा, असा सल्ला आत्ताच देऊन ठेवत्ये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

Banmeet Narula: डार्क वेबद्वारे ड्रग्ज विकणारांना ईडीने उचलले; 130 कोटी रुपयांचे बिटकॉईन जप्त

तुम्‍ही सत्तेत असताना इथले उद्योग गुजरातला का गेले? नारायण राणेंच्या प्रचारसभेत राज ठाकरेंचा उद्धव यांना थेट सवाल

Latest Marathi News Live Update : "पंतप्रधान मोदी यांच्या हातात देश, सीमा आणि सैनिक सुरक्षित नाहीत," समाजवादी पक्षाचा हल्लाबोल

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT