Hous of Bamboo
Hous of Bamboo Sakal
संपादकीय

हौस ऑफ बांबू : दिवाळी अंक : एक गायडन्स!

कु. सरोज चंदनवाले

नअस्कार! पावसाळा सुरु झाला आहे. गेले काही दिवस झिम्माड सरी कोसळाव्यात, तशा सरासरा कविता सुचत आहेत. पावसाळ्यात झालेल्या कविता पुढे दिवाळीच्या हंगामात उपयोगी पडतात. रात्री अपरात्री होणाऱ्या कविता लिहून ठेवायच्या. सकाळी त्याची वर्गवारी करुन फायलिंग करुन ठेवायच्या, अशी शिस्त मी लावून घेतली आहे. परवा रात्री दोन अडीचच्या सुमारास कवितेसाठी उठावं लागलं! अर्धवट झोपेतच-

पीएमटीच्या बसस्टॉपसमोर

साचलेल्या डबक्यातले

तुझे प्रतिबिंब

भरधाव गेलेल्या बाईकने

माझ्या अंगावर उडवले, तेव्हा-

…असल्या सुंदर रोम्यांटिक ओळी सुचल्या. किती मोहरुन गेले! कविता अजून अर्धवट आहे. तिचं भविष्य पुढल्या आषाढसरीतच ठरेल. रोम्यांटिकच राहिली तर मुंबईच्या मान्यवर दिवाळी अंकाला पाठवीन. कवितेनं कोविडचं वळण घेतलं तर पुण्यातच कुठंतरी छापून आणीन! सामाजिक अंगानं गेली तर औरंगाबादच्या दिवाळी अंकाला पाठवण्याचा विचार आहे.

लेखकहो, सावध रहा! जरा मार्केटचा कानोसा घ्या…

बंद कमरे में बैठकर

कबतक प्रतीक्षा करोगे

वसंत ऋतु की?

बाहर तो वसंत आ चुका है…

अशी प्रसिद्ध हिंदी कवी रामदरश मिश्र यांची एक गाजलेली कविता आहे. त्यानुसार साहित्यिकहो, दिवाळी अंकाचा सीझनरुपी वसंत ऑलरेडी सुरु झाला आहे! तिसऱ्या-चौथ्या लाटेच्या दरम्यान भराभरा दिवाळी अंकांची कामे उरकण्याकडे सर्वांचा कल आहे, असं दिसतं. काही मान्यवर दिवाळी अंकांनी आपापल्या पठडीतल्या लेखकांना गाठायला सुरवात केली आहे, तर काही लेखकांनी दिवाळी अंकाच्या प्रकाशकांशी गपचूप संपर्क साधला आहे. काही कवींनी तर संपादकांच्या घरच्या पत्त्यावर कवितांचे गुच्छ धाडून दिल्याच्या खबराही कानावर येत आहेत. या नाजूक काळात होतकरु दिवाळी-साहित्यिकांसाठी थोडा गायडन्स इथं देत्ये.

कविकुलासाठी : होतकरु कवींना माझं सांगणं आहे, की त्यांनीही क्याटेगरी करुन कविता विषयवार मांडून ठेवाव्यात. सोपं जातं. हे थोडंसं स्टार्टपसारखंच आहे…मी यंदा कोविड कवितांना प्रतिनग १२५ रु, (व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, आणि रेमडेसीविर या टायटलच्या तीन कविता ऑलरेडी तयार आहेत. इच्छुकांनी संपर्क साधावा.) नातेसंबंध कविता ५० रु, (या मालाला फारसा भाव येत नाही हल्ली!) सामाजिक कविता १००रु, आणि निसर्ग कविता १५१ रुपयांना दोन असा रेट लावला आहे. निसर्ग कविता एकावर एक फ्री द्यायला परवडतं, पण कोविड कविता ही नवी क्याटेगरी असल्यानं सप्लायची ग्यारंटी देता येत नाही. (इथं लसीची ग्यारंटी नाही, कवितांची कुठून देणार? असो.) एका संपादकांनी कोविड कविता लसीसारख्या फ्री का नाहीत? असा प्रश्न विचारला आहे. त्यांना (दिवाळीनंतर) जळजळीत उत्तर पाठवणार आहे.

कथाबाह्य लेखकांसाठी : हे लोक पर्यावरणापासून साध्या वरणापर्यंत कश्शावरही कध्धीही लिहू शकतात. नेहमीपेक्षा थोडा जास्त लांबीचा लेख धाडून देणं यापलिकडे त्यांना काही करावं लागत नाही. लकी लोक! त्यांना कसला गायडन्स?

कथाकारांसाठी : आपल्या कथाकारांना मात्र दिवाळीसाठी वेगळी बैठक जमवावी लागते. एका दगडात दोन पक्षी मेले पाहिजेत! एक तर दिवाळी अंक डोळ्यासमोर ठेवून कथा मारावी लागते. हे म्हंजे माणूस बघून पायजमा शिवायला घेण्यासारखंच असतं. बघून माप घेता आलं पाहिजे! शिवाय कथा छापून आली की त्या कथांचं ताबडतोब पुस्तक काढण्याची खटपट करावी लागते! अर्थात इथं पब्लिक रिलेशन कामी येतं. अधूनमधून संपादकाला फोन करीत राहाणं, सकाळी त्याला गुडमॉर्निंगचे मेसेज पाठवत राहाणं, वगैरे.

…तेव्हा इच्छुकांनो, कामाला लागा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT