dhinh tang sakal
satirical-news

ढिंग टांग : मुंगीचे महाभारत!

तुला सारे ठावे अनंता । सर्वज्ञ तूचि ।। विषाणू, पेशी, सूक्ष्मजीव । जगङव्याळ स्थूल ब्रह्मार्णव ।

ब्रिटिश नंदी न्यूज नेटवर्क

आता ऐका करुणाकरा । थोडी तरी उसंत धरा ।

आमुच्या अविवेकाचा डांगोरा । त्रिखंडात ऐका ।।

तूचि सृष्टीचा नियंता । तूचि आद्य अभियंता।

तुला सारे ठावे अनंता । सर्वज्ञ तूचि ।।

विषाणू, पेशी, सूक्ष्मजीव । जगङव्याळ स्थूल ब्रह्मार्णव ।

सजीव आणि निर्जीव ।सर्वत्र तूचि ।।

तरीही तूचि एकमेव । ऐसे न मानावे देवाधिदेव ।

तुझ्या पल्याडचे पाही मानव । जाणून ऐसा ।।

विज्ञान आणि तंत्रज्ञान । तर्क आणि तत्त्वज्ञान ।

अध्यात्म, योग आणि ध्यान । मानवे निर्मिली ।।

कुणी विचारी देव कोठी? । श्रध्दा- अंधश्रध्दांच्या पेठी ।

का धरिता तर्कशास्त्र वेठी । जाणिजे हो ।।

देवासमान होत्साते । मानवा गिळिले अहंतें ।

थेट आव्हान कृतांतें । देवो लागला ।।

माणसाचे डोळे अंध । नेत्रीं विज्ञानाची धुंद ।

श्रेष्ठत्त्वाचा भलता फंद । साचला ऐसा ।।

मानवाचा तल्लख मेंदू । तो उत्क्रांतीचा आदिकंदु ।

उलटसुलट संवादु । घडवितो येथ ।।

चंद्रावरी लावियली शिडी । मंगळामाजी घेतली उडी ।

मनगटी काळाची घडी । अवधारिली जी ।।

समुद्रे घातले पालाण । कोटीच्या कोटी उड्डाण ।

वसुंधरेची दाणादाण । उडविली सकळ ।।

अचपळ मनाची संहिता । नावरे रे आवरिता।

हावऱ्यांचिया हाता । खराटाचि आला ।।

वनारण्ये सफाचाट । पर्वते टेकड्या सपाट ।

बिलोरी नगरांचा थाट । झगमगे तेव्हा ।।

माणसाची दृष्टीच वक्र । अश्रू ढाळितो शहाजोग नक्र ।

त्यासी फसोनि ऋतुचक्र । विसरली सृष्टी ।।

वेडेवांकुडे माझे शब्द । मनींचे मांडिती अब्द अब्द ।

सांगती तुवा फुटके प्रालब्ध । ऐकू न ये का तुजलागी।।

विज्ञानाचे डिंडिम । वाजवितो आम्ही ढमढम ।

मानवाचा शब्द अंतिम । भ्रमजाळ ऐसे ।।

खगोलामाजी उपग्रहे। सोडिली मानवें आग्रहे ।

विज्ञानाच्या अनुग्रहे । माजलो आम्ही ।।

जीवघेणी विषाणुव्याधी । समस्त जगतासि बाधी ।

तरीही त्यात स्वार्थ साधी । मानवे ऐसी ।।

आणि आता परम दयाळा । कारे उघडिला तिसरा डोळा ।

माणसाचा लोळागोळा । क्षणार्धात झाला ।।

धबाबा आदळे तोय । वाडेहुडे धरणीठाय ।

कुणाची लागली हाय । कळेना काही।।

आभाळी दाटले दुर्दैव । पनौतीचे फुटले पेव ।

मेटाकुटीला येई जीव । टांगला ऐसा ।।

विषाणूने बाधिले । पर्जन्याने झोडिले ।

भूमीने ठाव सांडिले । जावे कोठे ।।

दरडींचा पर्जन्य कोसळे । प्रपाताचा पर्जन्य आदळे ।

चक्रवात आणि वादळे। पाचवी पुजेली ।।

मुंगी जाहली येथ शिंगी । शिंगे वांकुडी आणि जंगी ।

डंखासाठी परजते नांगी । तिचे नाव मानव ।।

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Seena-Madha Irrigation: ‘गाढवाचंही लग्न होतंय, आमच्या पोरांचं काय?’; तुळशी ग्रामस्थांचा उद्विग्न सवाल; सीना-माढा योजनेत समावेशासाठी उपोषण

केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या ताफ्याला ओव्हरटेक करणं भोवलं, ३२ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल; पुणे पोलिसांनी पाठवली नोटीस

Ayodhya Ram Temple security upgrade: राम मंदिरासह महत्त्वाच्या आस्थापनांच्या सुरक्षेला बळ; महिला स्नायपर्स, PAC बटालियन आणि गनर्ससाठी अत्याधुनिक शस्त्रसाठा मंजूर

Gold Rate Prediction: सोन्याचा भाव 2030 पर्यंत 2 लाखांच्या पुढे जाणार! काय आहे तज्ञांचा नेमका अंदाज?

Latest Marathi News Update : अमित शहा शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार, हुपरीत जंगी कार्यक्रम

SCROLL FOR NEXT