satirical-news

ढिंग टांग : पायपीट

ब्रिटिश नंदी

प्रपंच फुंकुनि कुणि निघाला 
प्राक्तन ओझे घेऊनि माथी 
पुढ्यात कोणी कबीर नाही, 
नाही त्याच्या हाति लुकाठी 

अनिकेतांचे जथे निघाले 
सोडुनि सारे मागे निर्मम 
सुखदु:खाचे देणेघेणे 
हिशेब सारा स्थावर जंगम 

अरे विणकरा, अम्ही अडाणी 
अम्हास काही कळतचि नाई 
कसे कळावे नश्वर-ईश्वर, 
अद्वैताची नवी बुनाई 
निष्प्राणांचा कळप निघाला 
दूर राहिला पाणवठा 
पाठ वळवुनी सूर्य पळाला 
उपरा झाला उंबरठा 

अरे कबीरा, उभा तिथे तू, 
जथा निघाला पहा इथे 
फुकाच रचिले तुवाच दोहे 
सांगून गेली दिवाभिते 

मजल्दर्मजल चालत येते 
अंगावरती उजाड गाव 
इथे न वस्ती माणुसकीची 
अप्पलपोटी तिचीच हाव 

नको कबीरा, नकोच राहू 
उभा, उन्हाच्या तीव्र झळा 
उजाड गावे, बकाल बस्त्या, 
पहाल तेथे मरणकळा 

डावे पाऊल आहे सोबत 
उजवे पडते त्याचसवे 
उजवे आहे, म्हणून डावे 
पुढे ढकलते रातदिवे 

अरे कबीरा, प्रिय विणकरा 
तुला न कळले वस्त्र नि वीण 
तुला न कळले गुह्य भुकेचे 
पायपीटीचा व्यर्थचि शीण 

मसणवटीचे भोग भोगिता 
कुणा न स्मरतो परमात्मा 
माती असशी मातीत मिळशी 
पुटपुटतो गा मम आत्मा 

फिरत गरारा निघती चक्रे 
फितुर रुळांवर अन उद्दाम 
दुर्बळ भेकड कुणी झोपले 
जन्ममृत्यूचा तुटे लगाम 

कबीर भोळा, संत बिचारा 
उभाच अन मागे राहील! 
कुणी तयाला सांगा बंधो, 
जथ्यामध्ये हो सामील! 

-ब्रिटिश नंदी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : मोटार वाहन विभागावर ‘लक्ष्मीची कृपा’; महापालिकेकडून नवीन वाहने, यंत्रांच्या खरेदीवर ५८ कोटींचा निधी मंजूर

अग्रलेख : आभासी आनंद, खऱ्या वेदना!

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT