corona-ayodhya 
satirical-news

ढिंगटांग :  चलो अयोध्या! 

ब्रिटिश नंदी

स्थळ : , लोककल्याण मार्ग, न्यू डेल्ही. 
वेळ : जाग्या त्याथी सवार! 

मोटाभाई : (प्रवेश करत) जे श्री राम! नमोजीभाई घरे छे के? 

नमोजीभाई : (ठणकावून) तमे कोण? 

मोटाभाई : (विनम्रपणे) हूं मोटाभाई! हूं अंदर आऊं के? 

नमोजीभाई : (चेहऱ्यावरुन गमछा हटवत) अरे, मोटाभाई, ओळखला नाय के? हूं, तुमच्या समोरच उभा छूं! 

मोटाभाई : (चेहऱ्यावरुन मास्क हटवत) अरे त्तो! आ तो लोच्या थई गयु!! मास्कमुळे आजकाले आपला माणस ओळखताज नाय येत ने! राजस्थानमधी एमने एमज लोच्या झ्याला!! 

नमोजीभाई : (चिंतातुर आवाजात) काय झालं? 

मोटाभाई : (पडेल आवाजात) कोंग्रेसना विधायक समजून आपल्याच विधायकनी साथे निगोशिएशन करी नाखी!! 

नमोजीभाई : (डोळे मिटून ध्यान एकवटत) हुंऽऽजवां दो! हवे राजस्थान रहवा दो! आगळथी काळजी घ्या!! 

मोटाभाई : (विषय बदलत) तुम्ही बेग भरला काय? 

नमोजीभाई : (चमकून) शुं? 

मोटाभाई : (खुलासा करत) बेग, बेग!...बॅग!! 

नमोजीभाई : (उजळलेल्या चेहऱ्याने) क्‍यां जावानुं छे? फोरेन? 

मोटाभाई : (समजूत घालत) फोरेन नथी,अयोध्या जावानु छे!! 

नमोजीभाई : (उत्साहात) तो च्यालो, अयोध्या जईये! कित्ती महिना झ्याला मी कुठे गेलाज नाय!! कवाशीक जायच्या हाय? 

मोटाभाई : (बोटे मोडत) पांच ओगस्टना मुहूरत छे!! 

नमोजीभाई : (घाईघाईने) बेगमधी काय काय घेऊ? त्रण गमछा, सेनटायझर, हेण्डग्लव्ज, पीपीइ किट? 

मोटाभाई : (शांतपणे) एनी काई जरुरत नथी! फावडा, कुदळ, घमेला असा सामान घ्यावा लागेल!! 

नमोजीभाई : (हादरुन) फावडा? 

मोटाभाई : (डोळे मिटून) करेक्‍ट फावडाज!! भूमिपूजनना प्रोग्राम छे!! खड्डा तो करवु पडशे!! 

नमोजीभाई : (भक्तिमय सुरात) मुदित महिपती मंदर आए& सेवक सचिव सुमंत्र बुलाए&.आहा!! रामचरित मानस&म ाझा ह्रिदय एकदम भरुन आला!! आत्ताच्या आत्ता बेग भरुनशी निघायच्या मन होते!! हूं तो कोरोना, चायना सब एकसाथ भुली गया!! 

मोटाभाई : (भक्तिभावाने) चोक्कस! मने पण एमने एमज गमे छे!! 

नमोजीभाई : (चौकशी करत) तो च्यालो, कोण कोण आवे छे मारी साथे? 

मोटाभाई : (गंभीरपणे खिश्‍यातून यादी काढत) बहु लंबी लिस्ट छे!! मुंबईथी पण रिक्वेस्ट मेसेज आव्या छे! 

नमोजीभाई : (ममतामयी सुरात) आपडो देवेंदरभाईना मेसेज छे के? एने कहो, तमे वेटिंग लिस्ट उप्पर छो!! धीरज राखो!! 

मोटाभाई : (रदबदली करत) मंदिरच्या भूमिपूजनमधी बध्दा लोगांना शरीक व्हायची इच्छा छे! आखिर काई झ्याला तरी, राष्ट्रना अहम मुद्दा छे!! कोरोना, चायना तो किरकोळ छे!! (जरासे खाकरुन) आपडो उधोजीभाईना मेसेज छे के एने पण अयोध्या आवानु छे! 

नमोजीभाई : (च्याट पडत) आपडो उधोजीभाई? 

मोटाभाई : (गडबडून) जी!! गेल्या वरसमधी उधोजीभाई बे-त्रण वेळा अयोध्येला जाऊन आले!! भूमिपूजनाला आम्हाला पण न्योता पाहिजे, असं ते म्हणतात!! आ तो साच्ची वात छे! इन फॅक्‍ट, ते अयोध्येला ज्याऊन आल्यावर प्रोब्लेम सॉल्व झ्याला!! एकेकाचा पायगुण असते ने!! 

नमोजीभाई : (विचारात पडत) आ तो फॅक्‍ट छे! आपडो उधोजीभाई बहु पॉवरफुल भक्त छे!! 

मोटाभाई : (डोळे बारीक करत) चोक्कस!! तो बुलावा भेजू एने? 

नमोजीभाई : (थोडा विचार केल्यावर) ना, अमणा नको!...ऑक्‍टोबरनंतर बोलवा! कछु सांभळ्यो? 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: जय शाह - शाहिद आफ्रिदीने खरंच एकत्र बसून पाहिला IND vs PAK सामना? जाणून घ्या Viral Video मागील सत्य

रितेश देशमुखची शाळा पाहिलीत का? ना मुंबई, ना लातूर; 'या' ठिकाणी शिकलाय अभिनेता, मैदान पाहाल तर पाहतच राहाल

Latest Marathi News Updates : पंजाबच्या पुरग्रस्तांना वणीकरांचा मदतीचा हात

Sillod Rain : तीन तासाच्या पावसाने सर्वत्र दाणादाण; आमठाणा मंडळात 70 मिलिमीटर पाऊस, नऊ गावांचा काही तासासाठी तुटला संपर्क

UPI Cash Withdrawal: आता कॅशसाठी एटीएममध्ये जाण्याची गरज पडणार नाही, स्कॅन करताच रोख रक्कम हातात येईल, पण कसं?

SCROLL FOR NEXT