ganesh 
satirical-news

ढिंग टांग : विघ्नहर्त्या, तुझे स्वागत...!

ब्रिटिश नंदी

आधी वंदू गणाधीश। 
जो सर्वभूतांचा ईश।
जेणे सुफळ होईल मिष। 
सकळांचेनि।।

या भूमंडळाचे ठायी।
येकवटले संकट काई।
जेणे विटंबिली ध्याई। 
आजारले विश्व हे।।

विश्वालागी मृत्यूचे तांडव। 
देखतां गळाठिला मानव।
ज्यापुढे असुर दानव। 
फिकेचि होती।।

कितीयेकांचा श्वास कोंडिला।
कितीयेकांचा जीव गेला।
कितीयेकांचा ग्रंथ आटोपिला।
कितीयेक मृत्यू।।

येक य:कश्‍चित विषाणू। 
तेणे व्यापिला अणूरेणू।
कंठाशी आणिला प्राणु। 
सर्वनाशु।।

सर्व शास्त्रवेत्ते नेते। 
विश्वगाडा नेती पुढते।
त्यालागी घाली मोडतें। 
विषाणू कैंचा।।
महाज्ञानी वैज्ञानिक । 
अवघेचि चर्चक चिंतक।
नाना तऱ्हेचे वैचारिक। 
गोंधळां आले।।

काळजाने सोडिला ठाव। 
उजाड जाले गाव गाव।
जिवाला नुरला भाव। 
मौत सस्ती जाहली।।

विघ्नात विघ्न मिसळले। 
जै कालकूट निर्मियले।
विश्वामाजी कालवले। 
संहार जाला ।।

जै मुंगीयांचे पुंजके। 
कल्लोळिती वारुळीं सुखे।
तयांवरी शिंपली जंतुनाशके। 
तैसे जाले मानवाचे।।

शववाहिका धावती रस्त्यावर। 
इस्पितळांची भरली कॉरिडॉर।
रुग्णाईतांचा गुणाकार। 
दिसामाजी होतसे।।

गणनायका तू विश्वंभर ।
का रे होसी कठोर।
नच फुटे हृदयासी पाझर। 
का न काई।।

ही कैसी ओढविली प्राणबाधा।
पंचभूतांची उडाली त्रेधा।
ही कोठलिया आपराधा।
शिक्षा देसी आम्हाला।।

तुझिया नामाचा डांगोरा।
पिटतो आम्ही जोरजोरा।
आणि तुचि पाठमोरा।
ऐसे कैसे चालेल।।

विघ्नहर्त्या, तुझे स्वागत।
ऐकोनि घ्यावे मनोगत।
हात जोडोनी तुझ्याप्रत।
मागणे आहे।।
मिटव हे जीविताचे ग्रहण।
जगो नित्य माणूसपण।
पुरे जाहले अता मरण।
आम्हालागीं।।

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Research Funding: पुणे-मुंबईसह देशातील संशोधकांना मोठी संधी; युरोपचे ९३.५ अब्ज युरोचे दार उघडणार!

Political Storm in Kolhapur : "हा मोर्चा गोकुळसाठी नव्हे तर प्रदेशाध्यक्षपदासाठी"; उच्च न्यायालयाच्या निकालानंतर मुश्रीफांचा सतेज पाटलांवर गंभीर आरोप

Kapil Sharma Show : "लाल मंच्युरियन पिले पड गये..."; महाराष्ट्राचे 'डॅशिंग' IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांच्यावर सुनील ग्रोव्हरची भन्नाट कविता, VIDEO तुफान व्हायरल!

Gokul Dairy Chairman Election High Court Ruling : 'गोकुळ'च्या अध्यक्ष निवडीत सर्वात मोठा ट्विस्ट; मतदानापूर्वी कोर्टाचा निकाल, बदलले सत्तेचे गणित!

Climate Summit: जगाची चिंता वाढली! युद्ध आणि AIमुळे हवामान बदलाचे आव्हान झाले आणखी अवघड

SCROLL FOR NEXT