marathi
marathi 
satirical-news

ढिंग टांग : मराठी में बोलो!

ब्रिटिश नंदी

सदू : (फोन फिरवत) हलो...ऽ...जय महाराष्ट्र!

दादू : (अनवधानाने) कौन बोल रहेला हय?

सदू : (कपाळाला आठी घालत) का? आपल्या भाषेत विचारता येत नाही?

दादू : (ओशाळून) सदूराया, तू होय! अरे, हल्ली मला इतके अठरापगड फोन येतात नं, की आवाजच ओळखता येत नाही!

सदू : (नापसंतीनं) पण आपल्या भाषेत बोलायला काय जातं? काही स्वाभिमान, अस्मिता नावाची गोष्ट आहे की नाही? महाराष्ट्राच्या कारभाऱ्यानंच मायमराठीला वाऱ्यावर सोडलं तर कसं चालेल?

दादू : (आक्रमक होऊन) खामोश! वा रे वा! कान के पीछे से आये, और तिखट हो गये? इथं आम्ही आहोत म्हणून मराठी अस्मिता टिकून आहे...क्‍या समझे?

सदू : (कुत्सितपणे) हेसुद्धा तुम्हाला परप्रांतीयांच्या भाषेतच सांगावं लागतं ना? हात तुमची!!

दादू : (खवळून) सद्याऽऽ... गाठ...गाठ...(गोंधळून) गाठीला हिंदीत काय म्हंटात रे सदूराया?

सदू : (विचारपूर्वक उत्तर देत) गाँठ! गाँ...ठ...असं म्हणतात!

दादू : (‘चालेल’ अशी मान डोलावून) बरं! गाँठ हमारे साथ हय!!

सदू : (थंड सुरात) गाठ राहू दे! तू कामाला कधी लागणार आहेस?

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दादू : (उसळून) म्हंजे काय? मी काम करत नाही असं म्हणायचंय का तुम्हाला? मी घरात बसून जितकं काम करतो, तितकं कुणी बाहेर उगाच हिंडूनही करत नाही!

सदू : (थंड सुरात) तुमच्या नाकर्तेपणामुळे लोक हल्ली माझ्याकडे येऊ लागले आहेत! इथे येऊन बघ, किती गर्दी होते ते! बघावं तेव्हा तुमच्याविरुध्द तक्रारी घेऊन लोक माझ्या घराशी उभे असतात! डबेवाले, रिक्षावाले, जिमवाले, हॉटेलवाले, मराठीवाले, सगळे माझ्याकडेच येऊन दाद मागतात!! तुमचा होतो आराम, आणि माझ्या मागे नसती कटकट !

दादू : (एकदम आठवून) त्या ज्वेलरवाल्याला का रे उगीच खट्याककन वाजवलात?

सदू : (उसळत्या त्वेषात) माझ्या मुंबईत मराठीत न बोलणाऱ्याची यापुढे अशीच गत होईल! तरी बरं माझ्यामुळे हल्ली मराठीत दुकानाच्या पाट्या तरी लावतात! तो लेकाचा मराठीत न भांडता हिंदीत भांडत होता!

दादू : (समजूत घालत) बरं नाही दिसत ते! एकदम कायदा हातात घेऊ नये, सदूराया!

सदू : (बर्फाळ आवाजात) मराठीचा हा अपमान आम्ही सहन करणार नाही! तुम्ही करायचा तर करा!! नाही तरी तुम्ही हल्ली पार्टी बदलली आहे!

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दादू : (पोक्तपणाने) मारामाऱ्या करुन का मराठी वाढणार आहे सदूराया? माणसानं कसं समन्वयानं आणि एकोप्यानं राहावं! आम्ही हल्ली अस्मितेपेक्षा एकोप्याला जास्त महत्त्व देतो!!

सदू : (सात्त्विक संतापाने) खड्ड्यात जाऊ दे तुमचा एकोपा! ज्यांना मराठी येत नाही, त्यांना आम्ही आमच्या पद्धतीनं शिकवू महाराष्ट्राची भाषा!! ज्यादा होशियारी नही मांगता!!

दादू : (बेसावधपणे) लेकिन आईसा एकदम हमरीतुमरी पर आने से क्‍या फायदा! प्रेमसे समझावो ना!!

सदू : (मराठी प्रेमाने बेभान होत) जो नही बोलेगा मराठी, उसके पाठीत लाठी! यही हमारा खाक्‍या है! जय महाराष्ट्र!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT