ढिंग टांग sakal
satirical-news

ढिंग टांग - घरचा डागतर!

थालिपीठ हे कळेदासे झाले, तेव्हा गल्लीच्या बुखाशी असलेल्या वैद्यराज बाबाजी यांच्याकडे गेलो.

ब्रिटिश नंदी न्यूज नेटवर्क

थो डके पडसे झाले होते. त्याबुळे दाक बद्द होऊद श्वास घेडे कठीड झाले होते. गरब पाड्याच्या गुळड्या केल्या. वाफ घेतली. दाकाला औषध लावले. पड काही फरक पडेदा. बुटाची जीभ खातो आहे की, थालिपीठ हे कळेदासे झाले, तेव्हा गल्लीच्या बुखाशी असलेल्या वैद्यराज बाबाजी यांच्याकडे गेलो. (खुलासा : त्यांना मामाजी म्हंटात, पण आम्हाला पडसे झाल्यामुळे तूर्त बाबाजी म्हटले.) ‘‘आईए, क्या पीडा है?’’ गळ्यातली हृद-स्पंदन परीक्षानळी (स्टेथस्कोप) गरागरा फिरवत मामाजींनी विचारले. मामाजी हे वैद्यराज असले तरी आयुर्वेदवाले नाहीत. मध्य प्रदेशातील मेडिकल कालेजात शिकून रीतसर पदवी मिळवणारे नॉर्मल आलोपथीचे डॉक्टर आहेत. परंतु, त्यांचे संपूर्ण वैद्यकीय शिक्षण हिंदी भाषेत झाले आहे. त्यामुळे त्यांचे हरेक उच्चार हे शुद्ध तुपातील हिंदीत घोळवलेले असतात.

उदाहरण ते लिव्हरला लिव्हर न म्हणता यकृत म्हणतात. इन्फेक्शनला संक्रमण म्हणतात, आणि एखाद्याच्या अंगावर साधे पित्त उठले, तरी ‘प्रतिरोध व्यवस्था को सेंधनेवाले घटक उपरांत प्रतिक्रिया’ असे लंबेचवडे काहीतरी म्हणतात. त्यांना एम्बीबीएसची डिग्री मिळाली नसून पदवी मिळाली आहे. ‘‘ काही नाही, हो…साधं पडसा हुवा है! दाक बद्द है!!,’’ शिंका आवरत आम्ही म्हणालो. डागतरबाबू मामाजींनी चेहरा गंभीर केला, आणि खसकन आमचा दंड ओढला. दंडाभोवती पट्टा आवळत त्यांनी रक्तचाप मूल्यांकन करत असल्याचे सांगितले. रक्तचाप? हां, हां, ब्लड प्रेशर, हात्तिच्या…आम्ही काही बोलणार एवढ्यात आमच्या मुखात त्यांनी तापमापकाची नळी सारली. ‘‘पाचन की कोई पीडा?,’’ आमच्या विशाल उदरप्रदेशात ठिकठिकाणी बोटे खुपसत त्यांनी पृच्छा केली.

मुळात हे असले पोटात बोटे खुपसणे आपल्याला बिलकुल आवडत नाही. कॅहीतरीच! ह्या…पण जाऊदे. ‘‘फू:..बुबु…भ्रुक...,’’ आम्ही म्हणालो. मुखात तापमापक होता. जिज्ञासुंनी अशा अवस्थेत, ‘छे, कुठे काय,चांगलं आहे की!’’ एवढे म्हणून दाखवावे. ‘‘चयापचय में आनेवाले बदलाव के हेतु कुछ अनियमितता आ जाती है, त्वचा एवं श्लेष्म की ऊपरी झिल्ली में कोशिकाओं में पानी भर जाने के कारण सूजन आ जाती है, इसलिए कुछ प्रतिक्षम दवाई की मात्रा देनी होगी…,’’ डागतर मामाजींनी धीर-कम-उपचार दिला. त्यांच्या शुद्ध तुपातील वैद्यकीय ज्ञानामुळे आम्हाला जोरात चक्कर येऊन मस्तिष्क में होनेवाली गतिविधियों में बाधा एवं रुकावट आल्याचे वाटू लागले.

‘‘असं काहीही दुर्धर असं झालेलं नाही हो, डॉक्टर! प्यारासिटामोल किंवा तुमचं ते लाल औषध द्या, आत्ता बरं वाटेल,’’ असे आम्हाला सांगायचे होते. परंतु, घशातून शब्द काही फुटला नाही. एक तर सर्दी झालेल्या माणसाची अवस्था आपापत: खुळ्यासारखी होते. त्यात हे हिंदीचे संक्रमण! आमच्या हतबलतेचा संपूर्ण गैरफायदा घेत डागतर मामाजींनी मुखपट्टी (मास्क) आवळून हातातील ह्रद-स्पंदन परीक्षानळी बाजूला ठेवून मेजाच्या ड्रावरातून इंजेक्शन काढले. जेम्स बाँडने पिस्तुल धरावे, तद्वत इंजेक्शनची सुई आभाळाकडे धरली.

म्हणाले, ‘‘पेट के बल सो जाइए.’’ आम्हाला उपडी झोपवण्याचा त्यांचा कुटिल हेतू आमच्या लक्षात आला!! ‘‘विषाणू का संक्रमण होने की संभावना है! प्रतिजैविक सेवन करनाही पडेगा!,’’ त्यांनी जाहीर केले. आम्ही निकराने धडपडलो…पुढचे काही नीटसे आठवत नाही. कुणीतरी कांदा हुंगवीत असताना जाग आली. हिंदीची रिॲक्शन येऊन पेशंट बेशुद्ध झाल्याचे कुणीतरी कुणालातरी सांगत होते. असो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Tariff Announcement : डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी सहा देशांवर फोडला टेरिफ बॉम्ब; जाणून घ्या, आता कुणाचा नंबर लागला?

Liquor Shop Viral Video : दारूसाठी तडफड! ; दुकानाच्या खिडकीच्या ग्रिलमध्येच अडकलं दारूड्याचं डोकं अन् मग...

ENG vs IND, 3rd Test: रिषभ पंत आर्चरचा लॉर्ड्सवर सामना करण्याबद्दल म्हणाला, 'तो परत येण्याचा मला...'

Video: मी इथेच आहे, तुझ्यासोबत! पत्नी आयसीयूमध्ये, पतीने हात धरला अन्...; वृद्ध जोडप्याचा व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Viral Video: कसाबसा जीव वाचला! रस्त्याची पाहाणी करायला आलेल्या अभियंत्यासमोरच कोसळला ट्रक, जीव वाचवण्यासाठी लोकांची पळापळ

SCROLL FOR NEXT