Dhing Tang Sakal
satirical-news

ढिंग टांग : यूपीएचा सातबारा कुठाय?

बेटा : (नेहमीच्या प्रफुल्लित मुद्रेने एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽण... मम्मा, आयम बॅक!

ब्रिटिश नंदी

बेटा : (नेहमीच्या प्रफुल्लित मुद्रेने एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽण... मम्मा, आयम बॅक!

बेटा : (नेहमीच्या प्रफुल्लित मुद्रेने एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽण... मम्मा, आयम बॅक!

मम्मामॅडम : (ड्रावरातल्या कागदांची उचकापाचक करत) हं!...इथंच ठेवला होता, कुठं गेला असेल? एक गोष्ट धड सापडेल या घरात तर शपथ!...छे, वैताग नुसता!

बेटा : (कुतुहलाने) कसलं संशोधन चाललं आहे इतकं?

मम्मामॅडम : (कागदपत्रे उलटसुलट करत) सातबाराचा कागद शोधतेय... कुठं सापडतच नाहीए! सगळीकडे शोधला...कुठं गहाळ झालाय कुणास ठाऊक!

बेटा : (दुप्पट कुतुहलानं) यू मीन सेव्हन ट्वेल्व? सेवन प्लस ट्वेल्व इज नाइनटीन! त्या वर्षी झालेल्या इलेक्शनमध्ये बऱ्याच गोष्टी गहाळ झाल्या होत्या आपल्या!

मम्मामॅडम : (कटकटलेल्या मनस्थितीत) आपल्या सर्वांच्या यूपीएचा सातबारा शोधतेय मी!

बेटा : (खिशातून कागद काढत) हात्तिच्या, हा घे, माझ्याकडे होता!

मम्मामॅडम : (सुस्कारा सोडत)...नशीब माझं! सापडला बुवा एकदाचा!! तुझ्याकडे कसा आला?

बेटा : (संशयानं) पण आत्ता कशाला हवाय तुम्हांला यूपीएचा सातबारा?

मम्मामॅडम : (विषण्णपणे) त्याच्यावर नवीन नावं चढवा, अशी मागणी होतेय! म्हंजे मालमत्तेचे नवे वाटेकरी येणार!

बेटा : (नाराजीने) अजिबात चालणार नाही! आपल्या नावावरची मालमत्ता दुसऱ्याला का वाटायची? नथिंग डुइंग!! नो मीन्स नो! मी हे होऊ देणार नाही! आफ्टरऑल यूपीए प्लॉट इज अवर्स!!

मम्मामॅडम : (खचलेल्या मनाने) मी स्वकष्टाने जमवलेली मालमत्ता होती, पण आता तिची अवस्था फार वाईट आहे! यूपीएचा जीर्णोद्धार करण्याची गरज आहे, पण तो कोणी करायचा?

बेटा : (निर्धाराने) अर्थात मी! मैं हूं ना!!

मम्मामॅडम : (टेन्शनमध्ये येऊन) यह अपने बस की बात नहीं, बेटा! दुसऱ्या कोणीतरी मध्येच येऊन त्या मालमत्तेवर क्लेम केला म्हंजे? माझ्या मते हा व्यवहार अमिकेबली सोडवायला हवा! उगीच डोक्याला ताप नको!!

बेटा : (पाठीमागे हात बांधून येरझारे घालत) यूपीएच्या त्या साइटवर सध्या काय आहे?

मम्मामॅडम : (खुर्चीत डोकं धरुन बसत) काहीही उरलेलं नाही तिथं!! निव्वळ पडीक जमीन आहे... एकेकाळी प्रचंड मोठा राजवाडा होता! बुरुज होते, बालेकिल्ला होता! नऊ महाल होते!...कालौघात सारं गडप झालं! आता तिथं उत्खनन करावं लागेल!!

बेटा : (हवेत स्वप्नं बघत) आपण तो राजवाडा पुन्हा बांधू, मम्मा! मी स्वत: बांधीन!! पण यूपीएच्या सातबाऱ्यावर नवीन नावं घालू नकोस! ज्यांचा संबंध नाही, अशांचं तर बिलकुल घालू नकोस! इन फॅक्ट, मी तर सुचवीन की, माझ्याच नावावर पॉवर ऑफ अटर्नी दे! मग बघ, मी जीर्णोद्धारचं काय, डायरेक्ट रिनोव्हेशनच करीन!!

मम्मामॅडम : (भिंगाने काहीतरी न्याहाळत) प्राचीन अवशेषांचा जीर्णोद्धार करण्यासाठी अभ्यास करावा लागतो! प्राचीनकाळी बांधकामाची पद्धत कशी होती, त्यामागची संकल्पना काय होती, मटिरिअल काय वापरलं होतं, खर्च किती आला, या सगळ्याचा डिटेल स्टडी करावा लागतो! इतिहासात डोकवावं लागतं!!

बेटा : (बेफिकिरीने) इतिहास मी नेहमी ऑप्शनला टाकायचो!!

मम्मामॅडम : (डोळे मिटून) सातबाराच्या उताऱ्यावर नवीन नावं टाकायला माझी ना नाही! पण काही वाटेकऱ्यांनी आपलीच नावं कापण्याचं कारस्थान चालवलं आहे! त्याचं काय करायचं?

बेटा : (दिलासा देत) काहीही काळजी करु नकोस, मम्मा! यूपीएचा सातबारा आपल्याच नावावर राहील, याची दक्षता कमळवालेच घेतील, याची खात्री बाळग! हाहा!!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bengal sports minister resigns : कोलकातामध्ये मेस्सीच्या कार्यक्रमात उडालेल्या गोंधळानंतर अखेर बंगालचे क्रीडामंत्र्यांनी दिला राजीनामा!

IPL 2026 Auction live : Mumbai Indians ची अन्य फ्रँचायझीकडून होतेय कोंडी! आकाश अंबानींच्या चेहऱ्यावर निराशा... Memes Viral

IPL 2026 Auction Live : राजस्थानमधील १९ वर्षीय पोराच्या डोक्यावर CSK ने ठेवला हात! मोजले तब्बल १४ कोटी; Who is Kartik Sharma?

द फॅमिली मॅन फेम अभिनेत्याची ड्रग तस्करी प्रकरणात तुरुंगात रवानगी; फिल्म इंडस्ट्रीतील ओळखीचा करत होता गैरवापर

Mumbai: आता ऑनलाइन अपॉइंटमेंट, आरोग्य माहिती आणि प्रमाणपत्रे एका नंबरवर मिळणार! बीएमसीकडून हेल्थ चॅटबॉट सेवा सुरू, नागरिकांना दिलासा

SCROLL FOR NEXT