Dhing Tang
Dhing Tang Sakal
satirical-news

ढिंग टांग : ...मज (तु) लस मिळेना!

- ब्रिटिश नंदी

कित्येक दिवसांनी घराबाहेर पडलो आहे. निराळेच वाटत होते. फारा दिवसांनी माझा सूट, कोट आणि टाय वापरात आला, याचाच प्रचंड आनंद झाला आहे. इतक्या महिन्यांनी इस्तरी केलेले झक्क पोशाख परिधान करण्याची संधी दिल्याबद्दल मी मा. पंतप्रधान मोदीजी यांचा शतप्रतिशत आभारी आहे. त्यांनी परवा मला तांतडीने बोलावून घेतले. मी गेलो.

‘जे श्री क्रष्ण!’ ते म्हणाले. ते कायम माझे नाव चुकवतात.

‘जयशंकर सर!’ मी अदबीने चुकीची दुरुस्ती केली. त्यांनी दुर्लक्ष केले.

‘अमणा के अमणा अमरिका मां जावो अने मोहीम फत्ते करीनेज आवजो! फत्ते ना थई तो मोडु ना दिखावो!’ असे सांगून त्यांनी कामगिरी दिली. मी घाबरलो.

‘यस्सर!’ असे म्हणून तिथून निघालो, आणि ब्याग भरुन थेट अमेरिकेच्या ‘एअर इंडिया’च्या विमानाचे तिकिट काढले. दरम्यान गुजराथी भाषेत चेहऱ्याला मोडु म्हणतात, हे कळले. जीव जरा भांड्यात पडला! असो.

आज सकाळीच विशेष विमानाने वॉशिंग्टनच्या विमानतळावर पोचलो. देशासाठी विशेष मोहिमेवर आलो आहे, याचा विशेष अभिमान वाटतो आहे. भारतासाठी लस मिळवण्यासाठी मी अमेरिकेत आलो आहे. लस घेतल्याशिवाय जायचे नाही, असा घोर संकल्प केला आहे. नाही तर मा. मोदीजींना मोडु कसा दाखवणार?

वॉशिंग्टनच्या विमानतळावर उतरण्यापूर्वी विमानातील हवाई सुंदरीने ‘हम जल्दही वॉशिंग्टन हवाई अड्डेपर उतर रहे हैं, क्रिपया कुर्सी की पेटी और मुंह पे मास्क बांध लें’ अशी घोगऱ्या आवाजात सूचना केली होती. मला संशय आला! ओळखणे कठीण होते, कारण साधारणपणे नाना पाटेकर जातकुळीच्या आवाजाची ती मालकीण ऊर्फ हवाई सुंदरी पीपीइ किटमध्ये नखशिखांत झांकलेली होती.

विमानतळावर अमेरिकी इमिग्रेशन अधिकाऱ्याने ‘‘का आलास?’’ असे गुरकावून विचारले. मी म्हणालो, ‘’लस!’’ त्याने डोळे मिचकावले, आणि ‘गुडलक’ म्हणाला. त्याला नेमके काय म्हणायचे असेल? इंग्रजीत ‘लस’ म्हंजे काही भलतेच नाही ना? जाऊ दे.

‘अमरिका मां जो बायडेन आपडा दोस्त छे! एने मळीने काम फत्ते करजो! हुं चिठी आपुं छुं...’’ असे मा. मोदीजींनी सांगितले होते. चिठ्ठीही दिली होती. ‘आ जो (आपडा) बायडेनभाई!’ अशी त्यांनी मागे एकदा ओझरती ओळखही करुन दिली होती, हे आठवले.

तेवढ्या ओळखीच्या जोरावर व्हाइट हौसला हिंडत हिंडत गेलो. पाहातो तर काय! तिथे आपल्याकडे लसीकरण केंद्राबाहेर असते तशी रांग होती, आणि देशोदेशीचे परराष्ट्रमंत्री रांगेत उभे होते. वॉशिंग्टनचे पोलिस ‘दो गज की दूरी’ पाळण्याची सक्ती करत होते. ढकला ढकली सुरु होती. मधूनच काळ्या काचांची गाडी यायची, आणि ‘लस आली! लस आली!’ अशी हाकाटी व्हायची. पण त्या गाडीतून कुणीतरी तिसराच उतरायचा. मी हळूचकन मा. मोदीजींची (वशिल्याची) चिठ्ठी दाखवून लसीकरण अधिकाऱ्याला डोळा घातला. त्याने ओठांची भेदक हालचाल करुन रांगेत उभे रहा, असे फर्मावले. बराच वेळ रांगेत गेला...बराच...बराच वेळ...!

मग एका कोट-टायवाल्याने बाहेर येऊन बोर्डावर कागद चिकटवला. –‘कोणतीही लस उपलब्ध नसलेने लसीकरण केंद्र बंद राहील!’

...थोडा वेळ वाट पाहून परत मुक्कामाच्या हॉटेलवर आलो. मा. मोदीजींना मेसेज करुन कळवले की, ‘‘लस मिळाली नाही, पाच दिवस तरी थांबावे लागेल!’

...मला मोडु दाखवण्याची चिंता आहे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT