Dhing-Tang 
satirical-news

ढिंग टांग : नको रे..!

ब्रिटिश नंदी

मरे एक त्याचा दुजा शोक वाहे
कळेना उद्या कोण रांगेत आहे
एकेक मोती गळाले गळाले
तरी श्रीहरि अल्पधारिष्ट पाहे

नको रे असा देऊ अम्हा अंतराय
नको रे विठो, जाऊ सोडोनि ठाय
नको रे नको रे नको रे नको रे
नको रे भयाने जीव करपोनि जाय

दणाणून गेले दिशाकोन सारे
आटे हा दधिची, सुकले किनारे
फुंफाटिला येथ वैशाख वणवा
जळाया निघाले तुझे विश्व का रे?

पहावे तिथे मृत्यूचा मत्त नाच
थिजे अश्रू डोळ्यांत,
उरे फक्त खाच
निर्जीव नेत्रांमध्ये आमुच्या बा
लल्लाटीचा लेख नि:शब्द वाच

ओसाड गावे, उद्ध्‌वस्त वाडे
निष्पर्ण वृक्षावरी बा गिधाडे
निर्जीव निष्प्राण सृष्टीमध्ये या
कसे गाऊ दैवा तुझे मी पवाडे
कितीएक होते, निमाले निमाले
कितीएक खांद्यावरोनीच गेले
कितीएक रांगेत तिष्ठले वा क्रमाने
कितीएक भीतीभयानेच मेले

कशापायी केला सृष्टीचा हा पसारा
कशाला हवा भक्तीचा अन उबारा
दुश्वार दुनियेत या नश्वरांच्या
कशाला हवा बेगडी तो निवारा

जिथे जन्मली गा विज्ञानवाचा
जिथे शास्त्रशस्त्रे अन्‌ खाचखोचा
जिथे अंतराळी याने उडाली, 
तिथे वाढिला वंश हा दुर्बळांचा?

जणू जाय बर्फात गोठून काळ
जणू ठाणिला वाहता तो खळाळ
जणू काय उदरात उद्रेक झाला,
गर्भाशयाआत तुटलीच नाळ 
नको देवराया, नको पाहू अंत
म्हणावे तुला ईश की मृत्यूदूत
स्मरणात राहो तुझ्या अन सदैव
तुझ्या भूमिकेचाच अन्वय नि अर्थ

जयाच्या मुळाशी स्वयं मृत्यू राहे
जयाच्या बीजामाजी मृत्यूच आहे
चढे मांडवावेरी ही विषवल्ली
विषाचे घडे तेथ रे लोंबताहे

अनंता, तुला काय मागू मी माझे
कसे वाहू हे प्रार्थनेचेच ओझे
अम्हा मर्त्य जीवांस काही नको रे
करी सिद्ध आता अस्तित्त्व तूझे

मरे एक त्याचा दुजा शोक वाहे
कळेना उद्या कोण रांगेत आहे
एकेक मोती गळाले गळाले
तरी श्रीहरि अल्पधारिष्ट पाहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी खिलाडूवृत्ती दाखवली असती! Run Out वर सलमान अली आघाची प्रतिक्रिया; सचिनला बाद केले तेव्हा विसरलेले sportsmanship

FASTag Annual Pass वार्षिक टोल पास झाला महाग, १ एप्रिलपासून नवे दर लागू

Nashik LPG Supply : नाशिककरानो घाबरू नका! जिल्ह्यात पुरेसा गॅस साठा; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

Nutritionist Health Tips: तुम्हाला 35 वर्षानंतरही राहायचंय फिट आणि निरोगी? न्यूट्रिशनिस्टच्या ‘या’ टिप्स नक्की फॉलो करा

Iran Israel War मुळे भारतात दारूचा दुष्काळ? उन्हाळ्यात थंड बिअरही मिळणार नाही? उत्पादनावर काय परिणाम होणार

SCROLL FOR NEXT