Dhing-Tang
Dhing-Tang 
satirical-news

ढिंग टांग : आहार संहिता!

ब्रिटिश नंदी

वाचकहो, ज्याची गेली साताठ महिने वाट बघितली, तो क्षण आता निकट आला आहे. काही तासातच आपल्या शहरगावातील लाडकी खाद्य व मद्यगृहे खुली होणार आहेत. ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत आपण हळू हळूवारपणे सारे काही उघडत आहोत. काही कवाडे हळूचकन उघडून पट्टकन बंद करत आहोत, तर काही खिडक्‍या पट्टदिशी उघडून हळूचकन बंद करीत आहोत. संकटच असे आहे की असे वागावे लागते. संकट अजून टळलेले नाही, तरीही आपण हाटेले आणि बारगृहे उघडतो आहोत. कारण उघडल्याशिवाय काही इलाजच नाही. उघडलेच पाहिजे!  लोकशाहीत लोकाग्रहाला किती टाळणार?

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पार्सल सर्विस सुरु असली तरी त्यात ‘ती’ मजा नाही, हे कुठलाही खवय्या (आणि पिवय्या) कबूल करेल. पण आता उजाडेल! नवी पहाट उगवत्ये, तशी नवी संध्याकाळ उगवेल! त्यासाठी आम्ही एक आचारसंहिता निर्माण केली आहे. खाण्यापिण्याशी संबंधित असल्याने तिला आहार संहिता असे आपण म्हणू या. या आहार संहितेतील काही नियम खाली देत आहोत. त्याचे कृपया (जमेल तसे) पालन करावे, ही विनंती.

लॉकडाऊनमध्ये नाही म्हटले तरी साताठ महिने (वाया) गेले आहेत. सोमवारी उपाहार अथवा मद्यगृहात जाताना दाढी-आंघोळ करोन शुचिर्भूत होवोनि जावे! 

अर्धी प्यांट आणि मळखाऊ टीशर्ट हा लॉकडाऊनमधला गणवेष होता. त्याचा त्याग करण्याची हीच वेळ आहे!

आपल्या नेहमीच्या हाटेलीत किंवा बारमध्ये गेल्या गेल्या नेहमीसारख्या आगाऊपणाने ऑर्डरी सोडू नये. आपल्या तोंडाला मास्क आहे, कोणीही ओळखणार नाही, हे ध्यानी घ्यावे! उगीच अनवस्था प्रसंग ओढवेल!

मद्यगृहात पन्नास टक्के गिऱ्हाईके एकावेळी अलौड आहेत. उरलेली पन्नास टक्के दाराबाहेर वेटिंगमध्ये आहेत याचे भान ठेवावे व लौकर आटपावे!

टेबलाशी बसल्यावर एकदमच  सगळी ऑर्डर द्यावी. पापड, तलेली चणा डाळ, मुगडाळ, तुकडा चकली या पक्वान्नांसोबत शेजवान चटणी  किंवा कांदा लागलीच मागवावा. पुन्हा पुन्हा वेटरला पिटाळू नये.

बारमध्ये घटकाभरानंतर (खरेतर घुटकाभरानंतर) मास्क उतरवून शेजारच्या सवंगड्याला ‘तू माझा भाव’...’ असे म्हणत गळामिठी घातल्यास बगलेत हात घालून झोळणा करुन सडकेवर नेऊन ठेवण्यात येईल. जास्ती इमोशनल होण्याची गरज नाही. 

मेजावर आलेली सोड्याची बाटली, गिलासे यावर सॅनिटायझरचा फवारा मारण्याची गरज नाही. 

सवंगड्यांशी सुरक्षित अंतर ठेवावे. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्यास, पुन्हा मद्यगृहे बंद करण्यात येतील, याची खात्री असू द्यावी. अति तेथे माती!

उगीचच वेळ आणि गूळ काढत हाटेलात बसू नये! दोन कटिंगवर दोन तास काढण्याचे दिवस आता गेले आहेत, याचे भान ठेवावे!

वॉश बेसिनशी जाऊन मोठमोठ्या आवाजात खाकरे काढणाऱ्याला तर भटारखान्याच्या मागील बाजूस नेऊन (अक्षरश: ) दंडात्मक कारवाई करण्यात येईल!

उडप्याच्या हाटेलात गेल्यास शक्‍यतो इडली, वडासांबार, उपमा असे सुटसुटीत पदार्थ मागवावेत. मसाला डोशा, म्हैसूर डोशा मागवू नये. तो खाताना हाताची कोपरे शेजारील व्यक्तीस लागण्याची शक्‍यता असते. 

मिसळपाव खाताना नम्र सूचना : पाव हातात घेऊन खावा. पावाला वेगळी प्लेट, कांदालिंबू वेगळ्या प्लेटीत, रस्सा (पक्षी : कट, तर्री, सॅंपल, हळदीकुंकू आदी विशेषणांनी युक्त द्रवपदार्थ) वेगळा असे लाड आता परवडणारे नाहीत.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : चाहरनं सीएसकेला पाडलं खिंडार, ऋतुराज पाठोपाठ दुबेलाही केलं बाद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT