Dhing-Tang
Dhing-Tang 
satirical-news

ढिंग टांग : मा. कु. मा. ज : एक साहित्यिक पाठिंबा!

ब्रिटिश नंदी

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या अभिनव सामाजिक चळवळीला पाठिंबा देणे, हे साहित्यिक म्हणून आमचे कर्तव्यच आहे, आणि आम्ही ते नम्रपणे पार पाडू. गेला बाजार इतर अनेक साहित्यिकांनी या चळवळीला पाठिंबा जाहीर केला असल्याने आम्हीही मागे राहू इच्छित नाही. साहित्यिक हा समाजाचे काही देणे लागतो, हे आम्हाला ओळखणारा कुणीही छातीठोकपणे सांगेल. उधार उसनवारीशिवाय मराठी साहित्यिकाचा निभाव समाजात लागणे कठीण! त्यात लॉकडाऊनचा काळ आला! साहजिकच साहित्यिक म्हणून आमचे समाजाला असलेले देणे वाढले! ते अल्पस्वल्प का होईना, परत करावे, या हेतूने
आम्ही ‘मा. कु. मा. ज.’ या अभिनव चळवळीला पाठिंबा देत आहो!
कुठल्याही चळवळीला, ज्याला आपण सामाजिक अथवा लोकचळवळ असे ढोबळमानाने म्हणतो, त्या उपक्रमात साहित्यिकांचा अंतर्भाव नसेल तर ती चळवळ, योग्य त्या दिशेने जात नाही, असे सर्वसाधारणपणे म्हणावेसे वाटते. (काय कळले?) किंबहुना, कुठल्याही लोकचळवळीत साहित्यिक उतरले की मगच त्या चळवळीला क्रांतीचे स्वरुप प्राप्त होते, असा जागतिक इतिहासाचा धांडोळा घेतला असता लक्षात येते. (घ्या, घ्या लेको धांडोळा!)

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यादृष्टीने पाहू गेल्यास ‘मा. कु. मा. ज.’ ही लोकचळवळ आहेच, पण तिच्यात साहित्यिकांच्या सहभागामुळे क्रांतीची बीजे पेरली गेले आहेत, असे म्हटले तर वावगे होऊ नये. (म्हणा, म्हणा!) साहित्यिक सहभागाने विनटलेली कुठलीही चळवळ म्हटले की त्यात दोन गोष्टी आल्याच! एक काव्य, आणि दुसरी प्रीती!! लोकचळवळीला लोकगीतांची जोड देण्याचे काम कविकुळच करु शकते. आणि चळवळीत उतरुन प्रीतीचे धागे जुळवण्याकडे
आमचा साहित्यिक कल राहिला आहे. मागल्या खेपेला एका वाचक चळवळीला आम्ही पाठिंबा देऊन
‘ पुस्तक, तू बांधणी कापडी’,
मी भात नि तू शेवग्याचि कढी
सत्त्वर सखये कुकर लाव तू, जेवण करुया छान,
वाचिके, वाच की मधले पान!’

...हे काव्य केले होते. ते चांगलेच लोकप्रिय झाले होते. किंबहुना, हे काव्य पुढे क्रांतिगीत ठरले. त्या क्रांतीची झळ पोहोचून आम्ही पंधरा दिवस इस्पितळात होतो. (खुलासा :वरील काव्य ज्या ‘क्रांती‘साठी आम्ही रचिले, तिच्या खडूस बापाने...जाऊ दे! ईश्वर त्या
कंटकास कधीही माफ करणार नाही!!) ‘मा. कु. मा. ज’ ही चळवळ मात्र त्याहूनही अभिनव असल्याचे आमचे मत आहे. ‘मा. कु. मा. ज.’ ही चळवळ नसून एक मोहीम आहे, असे काही लोक म्हणतात. आमच्या मते ती मोहीम होऊ शकत नाही. कां की साहित्यिकांचे मोहिमेत काय काम? ते
क्रांतिकार्यातच शोभतात. किंबहुना साहित्यिक जे काही करतात ते क्रांतिकारकच असते. म्हणूनच मा. कु. मा.ज. या चळवळीला क्रांतीचे स्वरुप यावे, या उदात्त हेतूने आम्ही पाठिंबा देऊ केला आहे. फूल ना, फुलाची पाकळी या उक्तीनुसार आम्ही ‘मा. कु.मा.ज.’च्या क्रांतिकार्यास पूरक अशी ‘लेखण्या मोडा, थर्मामीटर घ्या’ ही चळवळ उत्स्फूर्तपणे हाती घेत आहो. घरोघरी जाऊन लोकांच्या कपाळावर थर्मल गन रोखणे, ऑक्‍सिमीटरच्या
चिमट्यात बोटे धरणे आदी कार्ये आम्ही पार पाडणार आहो. आपल्या घरी पोहोचतोच आहो!- कृपया वाट पहा! क्रांती चिरायु होवो! 
जय मा. कु. मा. ज.!! आणि हो...एक राहिलेच...जय महाराष्ट्र!!

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील यांच्यात 'टशन'; माजी मंत्र्यांच्या भूमिकेमुळे निवडणूक बनली लक्षवेधी

Sunidhi Chauhan: भर कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकानं बॉटल फेकून मारली; पण ती डगमगली नाही, सुनिधी चौहाननं दिलं सडेतोड उत्तर

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

'आम्ही सुद्धा थोडं क्रिकेट खेळलोय...' भारताच्या सर्वश्रेष्ठ फलंदाजाने विराटवर ओढले ताशेरे, चॅनलला देखील दिला इशारा

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

SCROLL FOR NEXT