Dhing-Tang 
satirical-news

ढिंग टांग : नानांत नाना साहेबनाना...!

ब्रिटिश नंदी

डिअर मि. नानासाहेब, गुड मॉर्निंग. 
महाराष्ट्रात आपल्या पक्षासाठी सक्षम अध्यक्ष शोधायला हवा, हे मी मागेच बोलले होते. त्यासाठी मि. एचके पाटील यांना निरीक्षक म्हणून मुंबईत पाठवले होते. त्यांनी आपल्या सगळ्या आमदारांच्या आणि नेत्यांच्या (एकेकट्याला गाठून) भेटी घेतल्या. नवा अध्यक्ष स्मार्ट, हॅंडसम आणि चतुर असणे गरजेचे आहे, असेही मी कळवले होते. आपले सध्याचे अध्यक्ष मि. बाळासाहेब यांनाही मी सांगून ठेवले आहे. स्मार्ट, हॅंडसम आणि चतुर अध्यक्ष हवाच आहे, तर नवा कशाला हवा? असे त्यांचे मत होते. पण पिझ्झा ओव्हनमध्ये फिरवला नाही तर करपतो, असे म्हणतात. तुम्ही त्याला भाकरी फिरवणे म्हणता ना? तेच ते. तशी भाकरी फिरवणे भाग होते. मा. राहुलजी यांच्याही कानावर मी हा विचार घालून ठेवला होता. त्यांनी तर रीतसर ‘ऑडिशन्स घेऊनच अध्यक्ष निवडा’ असे सुचवले होते. सूचना अगदीच वाईट नव्हती. परंतु, आपले पक्ष निरीक्षक मि. पाटील यांनी ऑडिशन्स घेतल्या की नाही, हे कळले नाही. पण मुंबईहून परतल्यानंतर अचानक त्यांनी तुमचे नाव मात्र सुचवले. स्मार्ट, हॅंडसम आणि चतुर या तिन्ही निकषांवर तुम्ही पास झाला आहात! अभिनंदन!!

तुम्ही अध्यक्षपदाला अगदी योग्य उमेदवार आहात, असे दिल्लीतील हायकमांडचे मत पडले. तुमच्या नावाची अधिकृत घोषणा लौकरच करु. (काळजी नसावी!) तुमचे नाव विचारात घेतले जात आहे, याची कुणकुण लागली की काय कुणास ठाऊक, पण राष्ट्रवादीवाले सारखे फोन करत आहेत. मी एकही घेतला नाही! नाहीतरी (तुमच्या) महाविकास आघाडीत आपले लोक फार पडेल चेहऱ्याने वावरतात. आपल्या पक्षातल्या काही लोकांना तर आपण सत्तेत आहोत, हेच मुळी लक्षात येत नाही. तुमच्यामुळे त्यांच्या जिवात जीव येईल, असे वाटते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महाराष्ट्रात किमान सहमती कार्यक्रमानुसार तीन पक्षांचे सरकार चालवायचे, असे आधी ठरले होते. त्याचे काय झाले? शिवसेनेचे मि. ठाकरे हे तर स्टेअरिंगचे चाक माझ्याच हातात आहे, मीच गाडी चालवतो, असे वारंवार सांगत आहेत. राष्ट्रवादीवाले शेजारच्या सीटवर बसलेले आहेत. पण टायर पंक्‍चर झाले तर गाडी कशी चालवणार, हे त्यांना कोणी विचारणार आहे की नाही? हे काम तुम्हालाच करायचे आहे. पुन्हा एकवार अभिनंदन.
महामॅडम (हायकमांड)

आदरणीय मा. महामॅडम यांसी लक्ष लक्ष दंडवत, आपले पत्र मिळाले. वाचून जोरात ‘ओय’ असे ओरडलो. कारण मीच स्वत:ला चिमटा काढून बघितला होता. आपल्या पक्षाचा प्रदेश अध्यक्ष होण्याचा सन्मान तुम्ही मला देत आहात, हे वाचून कृतज्ञतेने माझी मान लवली आहे. माझ्या प्रणामाचा कृपया स्वीकार करावा व आशीर्वाद द्यावा ही विनंती. हा माझ्यासाठी सुखद धक्का आहे. मी ऋणी आहे. या पदासाठी माझी निवड होईल, याची अजिबात कल्पना नव्हती.

मा. मि. बाळासाहेबांचा फोन सकाळीच आला होता. त्यांनी दोनचार सुस्कारे सोडत ‘कस्काय?’ एवढेच विचारले. तेव्हाही मला अंदाज आला नाही.
तुमचे पत्र मिळाल्यावर त्यांच्या सुस्काऱ्यांचा अर्थ कळला. असू दे, असू दे. किमान सहमती कार्यक्रमानुसारच कारभार चालला पाहिजे, यासाठी मी (आघाडीतील अन्य दोन सहकारी पक्षांमध्येच) प्राणपणाने संघर्ष करीन, असे वचन देतो. अधिक काय लिहू?
सदैव आपला नम्र. 
नानासाहेब. (स्मा. हॅं. च.!)

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates :दोन गट हातात कोयता घेऊन आमनेसामने; पोलिसांच्या तत्परतेने अनर्थ टळला

Nagpur News : ऑनलाइन बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश; २० कोटींचे व्यवहा, छत्तीसगढ पोलिसांकडून नागपुरात सहा जणांना अटक

बाहुबली: द बिगिनिंगला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत, आता बाहुबली: द एपिक रिलीज होणार 'या' तारखेला !

Success Story: पेंडकापारचा ‘आशीर्वाद’ चमकला शिकागोमध्ये; प्रतिकूल परिस्थितीवर केली मात बेला परिसरात कौतुक

Thane Rickshaw Driver Girl Video: भाडे नाकारले, हात उचलला, ठाण्यात रिक्षाचालकाची मुजोरी | Sakal News

SCROLL FOR NEXT