satirical-news

ढिंग टांग : बाय बाय बायडेन!

ब्रिटिश नंदी

व्हाइट हाउस,  
पेनसिल्वेनिया, वॉशिंग्टन डीसी.
फ्रॉम द ऑनरेबल प्रेसिडेण्ट्‌स डेस्क-
डिअर जो, हे पत्र तुमच्या टेबलावरच ठेवलेले आहे. टेबलावरचा पेपरवेट उचलावा, मिळेल!! मावळत्या अध्यक्षाने उगवत्या अध्यक्षासाठी असे एक गोपनीय पत्र लिहून ठेवण्याची आपली अध्यक्षीय प्रथा असल्याचे मला सांगण्यात आले. त्याप्रमाणे मी तसे पत्र लिहून ठेवले, पण ते तुम्हाला मिळणार कसे? बरेच डोके खाजवून शेवटी आणखी एक पत्र लिहून ते अध्यक्षीय सैपाकघरातील अध्यक्षीय फ्रिजमध्ये अध्यक्षीय अंड्यांपाशी ठेवलेले आहे. अध्यक्षीय आमलेट करण्याच्या हेतूने तुम्ही अंडी उचललीत की आधी मी लिहिलेले पत्र मिळेल!  त्यात डेस्कावरील पत्राबाबत क्‍लू दिला आहे. आहे की नाही मी हुशार? लोक उगीच मला नावे ठेवतात. असो.

तुम्ही हे पत्र वाचत असाल तेव्हा मी फ्लोरिडातील माझ्या इस्टेटवर मस्त उन्हे खात पडलेला असेन. आपली भेट होऊ शकली नाही. मी सकाळीच सामान भरले आणि फ्लोरिडाला आलो. तुमच्या शपथविधी कार्यक्रमाला मी उपस्थित राहिलो नाही, कारण मला शपथ घेता येणार नाही, असे मला सांगण्यात आले. मी म्हटले, ‘कमॉन, मी शपथ घ्यायची नसेल तर जायचेच कशाला?’ माझ्या टर्ममध्ये मी भरपूर चांगले काम करुन ठेवले असल्याने तुम्हाला फार अडचण  पडणार नाही. मी अध्यक्ष झालो तेव्हा ओव्हल ऑफिसचा फोन सारखा वाजत राहायचा. मी ती कटकट बंद करुन टाकली. आता कुणीही फारसा त्रास देत नाही. व्हाइट हाऊसच्या दारावर उभे असलेले दारवान अत्यंत चापलूस आहेत, त्यांच्यापासून जपून राहावे. मी आलो, तेव्हा मला न चुकता सलाम करत होते. परवा व्हाइट हाऊस सोडताना लेकाच्यांनी चक्क दुर्लक्ष केले. मग मीदेखील दुर्लक्षच केले!! सरळ हेलिकॉप्टरमध्ये बसून ‘फ्लोरिडा की तरफ  लेना’ असे सांगितले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जागतिक राजकारणातल्या एका व्यक्तीपासून तुम्ही सावध राहायला हवे. ते इंडियात राहतात, आणि माझे फ्रेंड आहेत. (नाव नंतर सांगीन!) गृहस्थ चांगले आहेत, पण मला एकदोनदा ‘डोलांडभाई’ म्हणाले, ते मला तितकेसे आवडले नाही. शिवाय ते भयंकर जोरात शेकहॅंड करतात. तुम्ही अध्यक्ष झाल्यामुळे तुम्हालाही ते भेटायला येतील, तेव्हा हात आखडता ठेवा- खांद्यापासून निखळेल!!  त्यांनी मला इंडियात बोलावले होते, तुम्हालाही बोलावतील. तेव्हाही सावध रहा. इंडियामध्ये ताजमहाल नावाची एक जुनी प्रॉपर्टी त्यांनी मला दाखवली होती. वेल, मला काही ती फार इंप्रसिव वाटली नाही. इंडियात एक प्रकारचा खारट केक लोकप्रिय आहे. त्याला ढोकळा असे म्हणतात. तो लागतो टॉप, पण जरा जपूनच खा! तुमच्या वयात जास्त ढोकळा पोटाला बरा नाही!! 

डिअर जो, व्हाइट हाऊसमध्ये राहाणे तितकेसे सोयीचे नाही, हे तुम्हाला लौकरच कळेल. मुळात येथे दूधवाला, पेपरवाला, सफाईवाला असे कोणीही फिरकत नाहीत. सगळीकडे प्रचंड शांतता असते. मला तर सुरवातीला आपण लायब्ररीत राहातोय, असेची फीलिंग येत होते. असो. उत्तरेकडील बाजूच्या शय्यागृहाचा वापर मुळीच करु नये. तिथे प्रचंड गळते!! आणखी काय लिहू? सर्व महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला मी दिल्याच आहेत. मी पुन्हा येईनच!! 
कळावे. बाय बाय बायडेन. तुमचा कधीही नसलेला, ट्रम्पतात्या.
ता. क. : अध्यक्षीय फ्रिजमधील दूध व अंडी दोन्ही संपली आहेत. आणून ठेवण्यास सांगणे!

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhosari Purandar Airport : भोसरीतून थेट पुरंदर विमानतळापर्यंत भुयारी मार्गाची योजना; ‘पाताळ लोक’ प्रकल्पासाठी पुणे महापालिकेने उचलले पुढचे पाऊल

Kimberly Powell: कोण आहेत एनव्हिडियाच्या सीईओची 'विकेट' घेणाऱ्या किंबर्ली पॉवेल? इंटर्न ते थेट कंपनीच्या उपाध्यक्षा

Nvidia CEO Exit: ३३ वर्षांच्या प्रवासाला २ अफेअर्समुळे 'ब्रेक'! जगातील बलाढ्य कंपनीच्या सीईओचा तडकाफडकी राजीनामा; एआय जगताला हादरा

Khopoli Bus Accident : बाजारपेठेत अर्धा किलोमीटर मृत्यूचा थरार! अनियंत्रित बसने अनेक वाहनांना उडवले; एका तरुणाचा करुण अंत!

AI Cancer Cure: पुढील १० वर्षांत कर्करोग इतिहासजमा होणार? अँथ्रोपिकच्या प्रमुखांची मोठी भविष्यवाणी

SCROLL FOR NEXT