Dhing-Tang 
satirical-news

ढिंग टांग : खेला होबे!

ब्रिटिश नंदी

नमोजीभाई : (बिचकत फोन फिरवत) कॉण वात करे छे?
ममतादिदी : (इस्पितळातल्या खाटेवरुन…) आपनार नाम की?
नमोजीभाई : (अघळपघळपणे) हुं तमारा भाई वात करु छूं! सतप्रतिसत प्रोणाम!!
ममतादिदी : ( रागारागाने) आमार कोई भाई नॉय! फोन रखो!! जाव, जाव! खालीपिली तकलिफ देताय! ये हामारा खिलाफ साजिश हाय!
नमोजीभाई : (अजीजीने) अरे, दिदी, ओळखाण नथी लागती? हूं दिल्लीवाळा भाई!
ममतादिदी : (खवळून) उई उई उई...! हमकू डायरेक्ट फोन करनेका डेरिंग कैसा किया!!
नमोजीभाई : (रुध्द कंठाने) क्या करुं दिदी! तमारी बहु याद आवे छे! हर साल तमे मारीमाटे बंगाली कुर्ता अने शोंदेश मिठाई भेजती हती!!
ममतादिदी : त्याची ही परतफेड वाटतं! छॉन!!
नमोजीभाई : (मिटक्या मारत) मने बंगाली मिठाई बहु गमे छे! शोंदेश! रोशोगुल्ला!! खिरकोदोम! मिष्टीदोई!! बहु सरस!
ममतादिदी : (संतापाचा स्फोट होत) चूप कोरो!! बंगाली मिठाई आवडते, म्हणून सगळा बंगाल घशात घालायचा बेत आहे का तुमचा?
नमोजीभाई : (हळूवार आवाजीत ) ना दिदी, एऊ ना कहवाय! हूं तमारा भाई छूं!!
ममतादिदी : (मुद्द्यावर येत) फोन क्यूं  किया?
नमोजीभाई : (विचारपूस करत) तमारे पग ने शुं वाग्या छे? ठीक छे ने?
ममतादिदी : (कपाळाला आठ्या…) वाग्या माने?
नमोजीभाई : (खुलासा करत) तुमच्या पायाला गाडीच्या दरवाजा लागला ने? खरेखर मार लागला के असाच सीक लीवमाटे नाटक करे छे?
ममतादिदी : (खवळून) चूप कोरो!! माझा पाय खरोखर जायबंदी झालाय! डोकं दुखतंय! ताप आलाय! मला इस्पितळात यावं लागलं!! हे सगळं तुमच्यामुळे झालं! आजवर इतक्या निवडणुका लढवल्या, पण कधी असं झालं नव्हतं!! बघून घेईन!!
नमोजीभाई : (साळसूदपणे) अरेरेरे! पती गयो!!
ममतादिदी : (घुश्शात) …आणि गाडीचा दरवाजा आपोआप पायाला लागला नाही… कुणीतरी जोरात आपटला!! पाय केवढा सुजलाय, बघायला या!... आता झालं ना तुमचं शोमाधान?
नमोजीभाई : शोमाधान कसा होएल? मला तर एटला दुख झ्याला के मी पण कालपासून लंगडतोय!! ‘मन की वात’ सांगू? असा वाटते के आत्ताच्या आत्ता कोलकात्याला येऊन तुमच्या पगला दुखदबाव लेप लावावा!!
ममतादिदी : (डोक्याला हात) किती ड्रामा कराल?
नमोजीभाई : (साळसूदपणे) तमेज ड्रामा करे छे, असा कोंग्रेसवाळा कहे छे!! मने तो गमे छे, के आ पूरा मामलतनी सीबीआय इन्क्वायरी करवु पडशे!!
ममतादिदी : (दातओठ खात) झालं का सुरु तुमचं पुन्हा सीबीआय आणि इडी?
नमोजीभाई : (गंभीरपणे) मामलो तो बहु सीरिअस लागे छे! जुओ, आपडा चूंटणीना खेला एक जग्या, अने आपडा रिश्ता बिजी जग्या!! आपडा तो मतभेद छे, मनभेद नथी!
ममतादिदी : (अविश्वासाने) मी शीबीआयला बोंगालमध्ये पग ठेवू देणार नाही!!
नमोजीभाई : (नाइलाजाने) तो पछी खेला होबे?
ममतादिदी : होबे, होबे, खेला होबे!
नमोजीभाई : (डेडली पॉज घेत) हवे खेलकूद मां रमता रमता पगने थोडु वागेछ ने! कछु थया तो मरहम लगावामाटे हुं त्यां आवीश हं दिदी! जे श्री राम!!
ममतादिदी : (रामाचे नाव ऐकताच भडकून) खामोश!

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT