Dhing-Tang 
satirical-news

ढिंग टांग : हाताची घडी, तोंडावर बोट!

ब्रिटिश नंदी

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे बुद्रुक.
वेळ : रात्री निजानीज टाइम!
चि. विक्रमादित्य : (दार ढकलून खोलीत शिरत) हे देअर बॅब्स…मे आय कम इन!
उधोजीसाहेब : (खुणेनेच जोराजोरात ‘नाही’ असे सांगत) हुंहुं…हुंफ…फूफूफुक!!
विक्रमादित्य : (संभ्रमात पडून) कॅय? कॅय म्हणालात? व्हॉट डु यू मीन बाय दीज हातवारेज?
उधोजीसाहेब : (माश्या वारल्याप्रमाणे) बो…बो…बुक बुक!
विक्रमादित्य : (कान टवकारत) कॅय?
उधोजीसाहेब : ( वैतागून मास्क वर करुन) ‘खोलीत येऊ नकोस, परत जा’ असं सांगतोय मी केव्हापासून!
विक्रमादित्य : (प्रकाश पडत) हात्तिच्या! सोशल डिस्टन्सिंग पाळायला सांगताय! मग असं सांगा ना सरळ ! या हातवाऱ्यांनी काय कळणार आम्हाला?
उधोजीसाहेब : (हाताची घडी, तोंडावर बोट ठेवत) चूप! कुणीही बोलायचं नाही या खोलीत!!
विक्रमादित्य : (चक्रावून कमरेवर हात ठेवत) आप हल्ली कुछ बातही नहीं कर रहे हो! क्या प्रॉब्लेम हय?
उधोजीसाहेब : (पाटीवर लिहीत) बो- लू न-का!
विक्रमादित्य : (मोठ्यांदा) का?
उधोजीसाहेब : (पाटीपेन्सिल फेकून देत) छे, तुम्ही लोक साधं मौनव्रतसुध्दा पाळू देत नाही!
विक्रमादित्य : (आनंदाने) ओह आय सी! तुम्ही मौनात आहात का? मग तसं सांगा ना!!
उधोजीसाहेब : (अनवधानाने) मी मौनात आहे, असं कसं सांगणार? मौनव्रत मोडतं ना!!
विक्रमादित्य : (गंभीरपणे) लोकांच्या तक्रारी वाढल्या आहेत हां! एवढं घडत असूनही तुम्ही एक शब्द बोलत नाही, ही गंभीर बाब आहे!
उधोजीसाहेब : (संतापून) कोण म्हणतं असं?
विक्रमादित्य : (सहज सांगितल्यागत) देवेंद्र अंकलचा फोन आला होता नागपूरहून! ते म्हणाले, ‘तुझ्या बाबांना सांग, काहीतरी बोला! बोलत नाही हे काही योग्य नाही!’’
उधोजीसाहेब : (संतापाचा कडेलोट होत) त्यांनाच गप्प बसायला सांग!
विक्रमादित्य : गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही, असं त्यांनी ऑलरेडी जाहीर केलंय!!
उधोजीसाहेब : (पालथी मूठ दाखवत) मग बोंबला!
विक्रमादित्य : (उत्साहात) एग्झॅक्टली! .. इन फॅक्ट, होळीच्या दिवशी तरी तुझे बाबा फेसबुक लाइव्ह करणार आहेत का, असंच विचारत होते ते!!
उधोजीसाहेब : एकेकाला बघून घेईन!! फेसबुक लाइव्ह हवंय लेकाच्यांना! इथं कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढतंय, त्याचं कुणाला काही नाही! उचलली जीभ लावली टाळ्याला!! याला काय राजकारण म्हंटात? ह्या:!!
विक्रमादित्य : (आवाज खाली आणत) तुम्ही आळीमिळी गुपचिळी धरलीये, हेसुध्दा राजकारणच आहे, असंही म्हणतात लोक!
उधोजीसाहेब : (गांभीर्यानं) जेव्हा हजार जिभा वळवळत असतात तेव्हा स्थितप्रज्ञानं मौन बाळगावं, असं शास्त्रात म्हटलं आहे!!
विक्रमादित्य : (टोटल न लागल्याने) कोण स्थितप्रज्ञ?
उधोजीसाहेब : (घाईघाईने) कोणीही नाही! तू झोपायला जा बघू!!
विक्रमादित्य : (दाराशी जात) पण तुम्ही गप्प का? याचं उत्तर तरी द्या ना!!
उधोजीसाहेब : उत्तर न देना यह भी एक उत्तर होता हय!
विक्रमादित्य : (गोंधळून) काहीही होवो, तुम्ही गप्पच बसणार असाच याचा अर्थ ना?
उधोजीसाहेब : (खचलेल्या सुरात) मौन आणि बोलती बंद होणं यातला फरक तुला समजतो का? गुड नाईट!!

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case: ऐनवेळी प्लॅन बदलला! संतोष देशमुख प्रकरणातील आरोपीला १० कमांडोंच्या गराड्यात गावात नेलं अन्...

स्टार प्रवाहवरील अभिनेत्रीची झी मराठीच्या 'सनई चौघडे' मध्ये एंट्री; पहिल्यांदा साकारणार आईची भूमिका

Pre Sleep Habits: दिवसभराचा थकवा आणि चिडचिड घालवायची असेल, तर झोपण्यापूर्वी 'या' गोष्टींना करा कायमचा टाटा!

Latest Marathi News Live Update: ५०० चौरस फुटापर्यंतच्या सदनिकेचा करमाफीचा प्रस्ताव फेटाळला

LPG Gas: उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आलोय, मला सिलिंडर द्या...; अधिकारी असल्याचे भासवले; एजन्सीमधून सिलिंडर घेऊन पळून गेले

SCROLL FOR NEXT