Dhing Tang Sakal
satirical-news

ढिंग टांग : आपण आणि...ते!

बेटा : (नेहमीच्या उत्फुल्लतेने) ढॅणटढॅऽऽण, मम्मा, आयम बॅक! मम्मामॅडम : (कामात अतिशय व्यग्र असूनही...) व्हेरी गुड! आता स्टीम घे, काढा पी, मास्क आल्यासरशी धुऊन टाक, आणि सॅनिटायझर तळहाताला लाव!

-ब्रिटिश नंदी

बेटा : (नेहमीच्या उत्फुल्लतेने) ढॅणटढॅऽऽण, मम्मा, आयम बॅक!

मम्मामॅडम : (कामात अतिशय व्यग्र असूनही...) व्हेरी गुड! आता स्टीम घे, काढा पी, मास्क आल्यासरशी धुऊन टाक, आणि सॅनिटायझर तळहाताला लाव!

बेटा : (कुरकुरत) मला वाटलं होतं, आल्या आल्या मला इथं ‘पास्ता खाणार का?’ असं विचारलं जाईल! पण मला काढा पी, असं सांगण्यात येतंय! हॅ:!!

मम्मामॅडम : (कामात बिझी...) आपण कोरोनाशी लढतोय ना, मग हे सगळं करायला नको का? आपल्याला ही लढाई एकजुटीने जिंकायची आहे!

बेटा : (चिडून) हे जरा ‘त्यांना’ सांगा ना!

मम्मामॅडम : (बुचकळ्यात पडून) कोण ते?

बेटा : (तिरस्काराने) ते...ते...सत्तेत बसलेले भांडवलदारांचे हस्तक!

मम्मामॅडम : (समजूत घालत) ही लढाई आपण आणि कोरोना यांच्यातली आहे! त्यांच्यातली आणि आपल्यातली नाही! ते आणि आम्ही ही भाषा आता बंद करायला हवी!!

बेटा : (सात्त्विक संतापानं) पण हे आधी त्यांना सांग! मी पहिल्यापासूनच भाईचारा आणि प्रेमाची भाषा करतो आहे! काय मिळालं मला बदल्यात? यथेच्छ चेष्टा! हॅ:!!

मम्मामॅडम : (समंजसपणे) जाऊ देत! तू लक्ष देऊ नकोस! हसतील त्याचे दात दिसतील!

बेटा : (रागारागाने) त्या कमळवाल्यांच्या प्रपोगंडाचा हा देश बळी ठरता कामा नये! हे सरकार कोरोनाबळींचे आकडे लपवण्यात फक्त यशस्वी ठरलंय! बाकी सर्व आघाड्यांवर एकदम फेल आहे कारभार! हॅ:!!

मम्मामॅडम : (पुन्हा आठवण करुन देत) मी काय सांगितलं आत्ता? नो टीका, नो ट्विटरटिप्पणी!! असं करुन चालणार नाही! उलट त्यांनी हाक मारली, तर आपण ओ दिली पाहिजे! त्यांनी साद घातली तर आपण प्रतिसाद दिला पाहिजे! त्यांनी मदत मागितली तर आपण दिली पाहिजे! आफ्टरऑल आपल्या पक्षाकडे असल्या संकटांशी झुंजण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे!!

बेटा : (सात्त्विक संतापानं) म्हंजे? हे सरकार टोटल फेल गेलंय त्याबद्दल काहीच बोलायचं नाही? ये तो बहुत नाइन्साफी है! हॅ:!

मम्मामॅडम : (शिकवणी घेत) बोलायचं, पण हळू आवाजात! संकटकाळात धावून जाणं हे आपलं कर्तव्य नाही का?

बेटा : (दोन्ही हात उडवत) कमॉन!! औषधं नाहीत, ऑक्सिजन नाही, इस्पितळात जागा उरली नाही! ही काय व्यवस्था आहे? हेकाय सरकार आहे? निव्वळ जुमलेबाजी चालली आहे! हॅ:!!

मम्मामॅडम : (शांतपणाने) ही वेळ राजकारण करण्याची नाही, बेटा!

बेटा : (दोन्ही खांदे उडवत) गेली दहा वर्ष मी हेच सांगतोय!

मम्मामॅडम : (निर्णायक सुरात) मी पंतप्रधानांना पत्र पाठवून हेच सांगितलं! राजकारण बाजूला ठेवा! ही काही निवडणूक नाही! एकजुटीने संकटाशी सामना करु या!

बेटा : (आश्चर्यानं थक्क होत) तू थेट मोदीजींना पत्र लिहिलंस? कमाल आहे!!

मम्मामॅडम : (प्रगल्भ चेहरा करत) देशावर जेव्हा संकट येतं, तेव्हा आपसातले मतभेद विसरुन एकजुटीने लढायचं असतं! माझी ताजी मुलाखत वाचली नाहीस का? मी देशवासीयांना त्यातून हाच संदेश दिला आहे, शिवाय मुलाखतीचं कात्रणही पंतप्रधानांना पाठवलंय!

बेटा : (थक्क होत्साता) रिअली? मग त्यांनी पत्राला उत्तर दिलं का काही?

मम्मामॅडम : (खुर्चीत बसत) दिलं ना! त्यांनी कळवलंय, सर्वात आधी हा संदेश तुमच्या सुपुत्राच्या कानावर घाला!

बेटा : (मूठ आवळत) हॅ:!!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : दिवाळीच्या दिवशी मुख्यमंत्री दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर; खोरी जलसिंचन प्रकल्पाचीही करणार पाहणी

IND U19 vs PAK U19, Live Streaming: भारताने जिंकला टॉस! पाकिस्तानचे हिशेब चुकते करण्याची संधी, Playing XI मध्ये द्रविड-सेहवाग

'माझी तुम्हाला विनंती नाहीतर तो...' रामायणबद्दल बोलताना सनी देओल बोलला की, 'बॉलिवूडसारख्या..'

Latest Marathi News Live Update: लालकृष्ण अडवाणींच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांचे नवी दिल्ली येथील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात हवन

Nashik Crime News :सशस्त्र दरोड्याचा २४ तासांत छडा; चार संशयित जेरबंद

SCROLL FOR NEXT