Dhing Tang
Dhing Tang Sakal
satirical-news

ढिंग टांग : ऑन ड्यूटी चोवीस तास!

ब्रिटिश नंदी

गेले दोन सीझन ‘वर्क फ्रॉम होम’ याने की घरात बसून कर्तव्य करणेची चाल पडली हाहे. जो तो घरात बसून लोळताना दिसतो.

डिअरम डिअर मा. होम्मिनिष्टरसाहेब यांसी म. पो. काँ. बबन फुलपगार बक्कल नं. १२१२ (कदकाठी ५ फू. साडे पा. इं., वजन बुटासकट किलो ५६, उमर ५६, छाती (फुगवूनसुद्धा) ५६ इं. ) याचा खाडकन साल्युट विनंती विशेष. लेटर लिहिनेस कारन कां की, आपल्या डिपार्टमेंटमधील काही ज्येष्ठ पो. ना विशेष काळजीची बाब म्हणून ‘वर्क फ्रॉम होम’ करणेची ऑर्डर प्राप्त झाल्याचे समजले. पोलिस दलातील लोकांनी ‘वर्क फ्रॉम होम’ कसे करावे, याची सूचना मात्र अध्यापि प्राप्त न झाल्याच्या कारनाने संभ्रम निर्मान झाला हाहे. तरी हा संभ्रम दूर करावा, ही विनंती.

गेले दोन सीझन ‘वर्क फ्रॉम होम’ याने की घरात बसून कर्तव्य करणेची चाल पडली हाहे. जो तो घरात बसून लोळताना दिसतो. मानूस घरात बसला की फार कामसू आणि बाहेर टहलत असला तर बेकार, असा उलटा मामला झाला हाहे. मागल्या टायमाला दोन अज्ञात युवकांना राऊण्डपमध्ये धरले असता त्यांनी खोटेच सांगितले की, ‘ड्यूटीवर जात हाहे!’ ड्यूटीवरचा मानूस घराबाहेर काय करतो? असा वहीम आल्याने त्यांना सत्यशोधक पट्ट्याची माहिती दिली. त्यावेळी ते बेरोजगार असल्याचे समजले. तात्पर्य येवढेच की, समाजातील बहुतेक जंटलमन नागरिक हल्ली ‘वर्क फ्रॉम होम’ करीत असल्याने घरात बसून हाहेत, व फुल प्यांटीची फॅशन पार गेली हाच त्याचा सज्जड पुरावा हाहे. मानसाने होताहोईतो घरी बसून पगार घ्यावा, हे योग्यच, कां की त्यामुळे कायदा-सुव्यवस्था चांगली राहाते. चोर चोऱ्या करणेसाठी हिंडू शकत नाहीत. दरोडेखोरांना रिकामी घरे सापडत नाहीत. असो.

जंटलमन नोकरदार व पुढारी यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करने सोपे आनि सिंपल जाते. बरीच कामे हल्ली ‘ऑनलाइन’ होतात.परंतु, कायदा-सुव्यवस्थेचे काम ऑनलाइन कसे होनार? पोलिसगडी वर्क फ्रॉम होम कसे करनार? हा खरा शंभर नंबरी सवाल हाहे. पोलिस डिपारमेंटमधे काही लोकांना जास्त वजन, मोटापा, ब्लड पेशर, साखरवाढ अशा सहव्याधी वाढत असल्याचे दिसून आले हाहे. त्यांनी विशेष काळजी घ्यावी, यासाठी ज्येष्ठ पो. शिपायांनी घरातूनच कर्तव्यावर राहावे, असे सांगणेत आले. सूचना स्तुत्य आहे, परंतु, घरात बसून कर्तव्य करणेच्या कामी काही अडचनी आहेत त्या थोडक्यात मांडत हाहे.

उदाहरनार्थ, आमच्या पो. ठाण्यात एक सरफिरे नावाचा पो. ह. हाहे, त्यास सहव्याधी हाहे. ‘वर्क फ्रॉम होम’ करतावेळी नाक्यावरील नाइटबर्ड बार एण्ड रेस्टोरंट (चिली चिकन आणि बैदा राइस चांगला बनवतो) चा शेठ मा. बाबूअण्णा शेट्टी हप्ता घरपोच करनार का? असा सवाल मजला सरफिरे याने विचारला. माझ्याकडे उत्तर नव्हते! अशी कितीतरी उदाहरने मी देऊ शकीन. सकाळी उठून वर्दी चढवून खिडकीत उभे राहून कायदा-सुव्यवस्था चांगली कशी ठेवावी? बारा घंटे कर्तव्यावर खाकी वर्दीत घरातल्या घरात हिंडून जीव उबगला तर काय करावे? असे काही प्रश्न निर्मान झाले आहेत. त्याची तड कशी लावावी हे समजत नसलेच्या कारनाने आपन मार्गदर्शन करावे, ही विज्ञापना.

आपला णम्र बबन फुलपगार पो. काँ. ब. नं.१२१२.

वरील निवेदण रोजी ५ माहे जानवारी तारखेस दोन पारी २ वा. ३४ मि. या वेळेसनशापानी न करता लिहिले असे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT