Dhing Tang
Dhing Tang Sakal
satirical-news

ढिंग टांग : सागर लाँड्री : एक धुलाई केंद्र!

ब्रिटिश नंदी

नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे.) माणसाने कसे नेहमी स्वच्छ राहावे. साधी आणि स्वच्छ राहणी हीच मुळात उच्च विचारसरणी आहे, असे माझे नम्र मत आहे.

आजचा दिवस : श्रीशके १९४५ श्रावण कृष्ण जयंती.

आजचा वार : बुधवार (इस्तरी करणेचा दिवस)

आजचा सुविचार : मित्रों, स्वच्छता एक जीवनशैली है, उसे अपनाएं!!

नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे.) माणसाने कसे नेहमी स्वच्छ राहावे. साधी आणि स्वच्छ राहणी हीच मुळात उच्च विचारसरणी आहे, असे माझे नम्र मत आहे. स्वच्छतेचा हा निदिध्यास मला गेल्या काही वर्षात लागला. त्याआधी मी नागपुरात होतो! (खुलासा : आम्ही नागपूरकर स्वच्छतेच्या बाबतीत थोडे ढिलेढाले असतो, असा अर्थ कोणीही घेऊ नये!) आमचे परमप्रिय जगतगुरु मा. नमोजींनी मला स्वच्छतेचा संदेश दिला. माणसाचे व्यक्तिमत्त्व काही कारणाने मलिन होत जाते. हे कलियुग आहे. या युगात आपल्या हातून अनेक पापे कळत नकळत होतात. परिणामी जीवनाला मालिन्य येते. ते कसे टाळावे? याची युगत मला मा. नमोजींनी सांगितली. स्टार्टपचे महत्त्वही विशद केले. स्वच्छता आणि ‘मेक इन इंडिया’ योजनेअंतर्गत स्टार्टप याची सांगड घालून मी लाँड्री सर्विस सुरु केली. त्याला आता काही वर्षे लोटली आहेत. या मोजक्या वर्षात माझा व्यवसाय तीनशे टक्क्यांनी वाढला!! याचे श्रेय माझे गुरु मा. नमोजी यांनाच द्यावे लागेल.

सागर लाँड्री सर्विस हे नाव आता महाराष्ट्रात पसरु लागले आहे. व्यवसाय सुरु केला तेव्हा माझ्याकडे स्वत:ची अशी जागा नव्हती. मग महाविकास आघाडी सरकारमधील काही सहानुभूतीदार मित्रांनी मुंबईतील मलबार टेकडीवर मला छोटीशी जागा (भाड्याने) दिली. भाडे काही मी दिले नाही, पण मविआमधील काही जणांचे कपडे मात्र विनाशुल्क धुऊन दिले.

राजकारणात तुम्ही कसेही असा, तुमचे कपडे अतिशय निष्कलंक आणि स्वच्छ असावे लागतात. हे गुपित ओळखूनच मी लाँड्री व्यवसायात शिरलो. हल्ली माझ्याकडे कापडांचे बोचके घेऊन रात्री अपरात्री गिऱ्हाईके येतात. आमची सेवा चोवीस तास सुरु असते. कोणीही कधीही यावे, आणि कपडे धुऊन घेऊन जावे!! एकदा एक गिऱ्हाईक घाईघाईने आले. कपडे कमालीचे मळके होते. चिखलाने माखलेले. मला म्हणाले, ‘‘मालक, द्या की धुऊन चटकिनी!’’ मी छान ब्लीचिंग पावडर, रिठ्याचे पाणी, उत्तम डिटर्जंट वापरुन त्यांचे कपडे चकाचक इस्तरी करुन दिले. आता ते गृहस्थ स्पॉटलेस अवस्थेत हिंडत असतात, आणि आमच्या लाँड्रीची जाहिरात करत असतात. एका गृहस्थांना मी त्यांचा मळका कुडता आणि सलवार धुऊन दिला. पण धुतल्यानंतर तो काहीच्या काहीच आखूड झाला. ते गृहस्थ हँगरसह सदरा घातल्यासारखे अवघडलेल्या अवस्थेत हिंडताना दिसतात. (नाव सांगणार नाही!) कापडच चांगले नसेल तर त्याला धुलाईकार काय करणार?

एकेकाळी मळखाऊ कपडे चालत होते, आता पांढरेशुभ्रच लागतात. आमचे कांग्रेसवाले मित्र मा. बाळासाहेब जोरात परवा भेटले. म्हणाले, ‘‘कशी चालली आहे लाँड्री?’’ मी म्हटले, ‘‘झक्कास! सगळं एकदम ओक्केमध्ये आहे...!’’ त्यावर ते खुदखुदत फक्त हसले. मी म्हटले, ‘‘तुमचे काही असतील तर आणा, अर्जंट धुऊन देतो...!’’ तेव्हा मात्र गोरेमोरे होत, इकडेतिकडे पाहात ते हातभर जीभ काढून ‘नको नको’ असे म्हणत पळाले!!...

अनेकांसाठी आमच्या लाँड्रीचे दरवाजे सदैव उघडे आहेत. कधीही या!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT