Dhing Tang Sakal
satirical-news

ढिंग टांग : निष्ठेचे खोके!

राजाधिराज उधोजीमहाराज उत्सुकतेने खजिन्याच्या खोलीत प्रविष्ट होतात. अवघ्या दौलतीची दौलत येथे साठविलेली आहे.

ब्रिटिश नंदी

राजाधिराज उधोजीमहाराज उत्सुकतेने खजिन्याच्या खोलीत प्रविष्ट होतात. अवघ्या दौलतीची दौलत येथे साठविलेली आहे.

स्थळ : मातोश्री महाल. वेळ : खोके उघडण्याची.

राजाधिराज उधोजीमहाराज उत्सुकतेने खजिन्याच्या खोलीत प्रविष्ट होतात. अवघ्या दौलतीची दौलत येथे साठविलेली आहे. जडजवाहिर, भेटवस्तू, नजराणे सारे काही येथे जमा होते, येथोनच रयतेच्या कल्याणार्थ त्यांचा विनियोग होतो. राजे कोठल्यातरी वस्तूला अडखळताती. धडपडताती. किंचितसे कळवळताती. अब आगे...

उधोजीराजे : (ब्याटरीचा फोकस मारत) अयाईग्गं! ही शिंची खोकी कोणी येथे आणोन टाकिली? हा खजिना आहे की गोदाम? हॅ:!! (चडफडत) कोण आहे रे तिकडे?

मिलिंदोजी फर्जंद : (अंधारातून आवाज देत) मी आहे महाराज! तुमचा एकनिष्ठ फर्जंद!

उधोजीराजे : (संशयाने) मुजरा केलास का फर्जंदा? आम्हांस काळोखात कसे दिसणार?

मिलिंदोजी : (विनम्रतेने) अलबत महाराज! मुजऱ्याशिवाय कसा राहीन?

उधोजीराजे : (बॅटरीचा झोत वरखाली करत) ही रद्दी खोकी इथे कोणी आणून टाकली? जवाहिरखान्यात खोक्यांचं काय काम? मला तर ही संशयास्पद वस्तू वाटते! ताबडतोब बॉम्बशोधक पथकाला बोलवा!

मिलिंदोजी : (अदबीने) नाही, महाराज, संशयास्पद वस्तू? छे, छे, हीदेखील जवाहिरच आहे महाराज! किंबहुना याच्याइतकं बहुमोल जवाहिर उभ्या दौलतीत सांपडणे अशक्य आहे!! याच बहुमोल नजराण्यासाठी जगभरातल्या पातशाह्या जीव पाखडतात!!

उधोजीराजे : (चिडखोरपणाने) अति बोलतोस! कुणी केला रे तुला फर्जंद, आँ?

मिलिंदोजी : (दुप्पट अदबीने) आपणच महाराज!!

उधोजीराजे : (फर्मान काढत) खजिन्याच्या खोलीतून ही रद्दी खोकी ताबडतोब उचला आणि राजगोदामात नेऊन टाका!! उदईक रद्दीवाल्यास बोलावून घ्या, आणि खोकी त्याला देवोन टाका! रद्दीचा काय भाव आहे हल्ली?

मिलिंदोजी : (कळवळून) गैरसमज होतो आहे, महाराज! ही रद्दी नव्हे, अवघा दौलतखाना ओवाळून टाकावा, अशी नायाब चीज आहे ही!

उधोजीराजे : (संतापून) खामोश! आम्हांस शिकवो नका! कडेलोट करीन!! रद्दी व जवाहिर यातला फरक आम्हांस कळत नाही होय रे, फर्जंदा!!

मिलिंदोजी : (आर्जवी सुरात) खोके उघडून तर बघा, स्वारीची तबियत खुलेल!!

उधोजीराजे : (खोक्यांकडे संशयाने बघत) आंब्याचा सीझन तर गेला...मग यात काय असेल?

मिलिंदोजी : (पैजेवर सांगत) देवगडचा हाप्पूससुद्धा याच्यापुढे लंगडा ठरेल, महाराज!

उधोजीराजे : (तुच्छतेने) देवगड काय, लंगडा काय...फालतू कोट्या करु नकोस! या खोक्यात काय आहे, हे गुमान सांग!

मिलिंदोजी : (अभिमानाने) ही निष्ठेची खोकी आहेत, महाराज! या खोक्यांमध्ये निष्ठाच निष्ठा ठासून भरल्या आहेत!! निष्ठेपेक्षा बहुमोल काय आहे या जगात?

उधोजीराजे : (चक्रावून) निष्ठा ही काय खोक्यात भरण्याजोगी वस्तू आहे? काहीतरीच तुझं!!

मिलिंदोजी : (सद्गदित कंठानं) आपल्या कडवट मावळ्यांकडून शपथपत्रं लिहून घेतली होती, त्याचे गठ्ठे या खोक्यांत आहेत, महाराज!!

उधोजीराजे : (अविश्वासानं धडाधड खोकी उघडत) इतकी? विश्वास बसत नाही!! ओहो!!

मिलिंदोजी : (आदरपूर्वक) हे सारं आपल्या चरणी रुजू आहे, महाराज! मऱ्हाटी दौलत चिरायु होवो!!

उधोजीराजे : (आनंदातिरेकाने) पहा, पहा! ही पहा, आमची खरी दौलत! अरे तुमच्या त्या पेट्या, खोकी, कपाटं ठेवा तुमच्यापाशी! त्या तसल्या दौलतीला विचारतो कोण? ज्याच्याकडे ही निष्ठेची दौलत आहे, त्याला तुमच्या त्या औटघटकेच्या सत्तेची काय पर्वा अं? आमच्याइतका धनाढ्य पृथ्वीतलावर कोणीही नसेल!!

मिलिंदोजी : (किंचित पॉज घेत) पण महाराज...या खोक्यांचं करायचं काय?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: दोघेही 'क्लास वन' अधिकारी, स्पाय कॅमेरे लावून पत्नीचे खासगी व्हिडीओ केले शूट; पुण्यात खळबळ

Matheran: माथेरानमध्ये टॅक्‍सीसेवा बंद, घाटमार्गावर पर्यटकांची पायपीट!

ENG vs IND, 4th Test: अंशुल कंबोजचं पदार्पण नक्की? कर्णधार गिलने स्पष्ट संकेतच दिले; रिषभ पंत खेळणार की नाही, हेही सांगितलं

Sanitation Workers Strike: सफाई कामगारांच्या आंदोलनाला यश, अखेर संप मागे!

Latest Maharashtra News Updates : घाटकोपरच्या जुन्या स्तंभावरुन नागरिकांचा संताप

SCROLL FOR NEXT