Dhing Tang Sakal
satirical-news

ढिंग टांग : बिहार में का बा..?

बिहारमुकुटमणी हरहमेशराजसिंहासनविराजित सुशासनबाबू रा. रा. पलटूराम यांसी कृतानेक नमस्कार विनंती विशेष. कामगिरी फत्ते केलीत, याखातर त्रिवार अभिनंदन.

ब्रिटिश नंदी

बिहारमुकुटमणी हरहमेशराजसिंहासनविराजित सुशासनबाबू रा. रा. पलटूराम यांसी कृतानेक नमस्कार विनंती विशेष. कामगिरी फत्ते केलीत, याखातर त्रिवार अभिनंदन.

बिहारमुकुटमणी हरहमेशराजसिंहासनविराजित सुशासनबाबू रा. रा. पलटूराम यांसी कृतानेक नमस्कार विनंती विशेष. कामगिरी फत्ते केलीत, याखातर त्रिवार अभिनंदन. आमच्या महाविकास आघाडीचा प्रयोग बिहारमध्ये रिपीट होत आहे, यापरता दुसरा आनंद नाही. आपल्या दिग्विजयामुळे महाराष्ट्रात किमान तीन घरांमध्ये दिवाळी साजरी होत आहे, याची आपणांस कल्पना आहे काय? स्वत:चेच सरकार पाडून लागलीच

नवे सरकार स्थापण्याचा नवा प्रस्ताव त्याच बैठकीत द्यायचा, आणि चोवीस तासात पुन्हा स्वत:चा शपथविधीही उरकून घ्यायचा, म्हंजे कमाल झाली! सध्या (आमचे) दिवस बरे नाहीत, तरीही बिहारमधील खबरी ऐकोन जीव थंडावला, हे सांगितले पाहिजे. आमच्या मसलतीनुसार आणि सलाहमशवऱ्यानुसार आपण बिहारात महाविकास आघाडीचा प्रयोग फत्ते केलात. ऐकोन बहु संतोष जाहला. अडीच वर्षांपूर्वी आम्हीही ऐसी धोबीपछाड घालुनु कमळासुरास सफई आडवा केला होता, त्याची याद आली…

कमळासुराला कायम गाडाभर अन्न लागते. वर ते अन्न आणणाऱ्यासही तो खावोन टाकितो, ऐसा त्याचा दुर्लौकिक!! तरीही आपण किंचितही तमा न बाळगता त्याचा बिहारभूमीत पाडाव केलात, हे भले कौतुकाचे! शाब्बास!! कायम नंबर दोन आणि तीनला राहूनही, फारशा सीटा न मिळवूनही मुख्यमंत्री आपणच असता, ही विशेष कौतुकाची बाब आहे. हा इल्लम तुमच्याकडोन शिकून घ्यायला हवा. असो. तथापि, महाविकास आघाडीचा फार्म्युला हा आमचा कॉपीराइट आहे. पूर्वपरवानगीशिवाय त्याचा प्रयोग करणे ठीक वाटत नाही. एवंच, रॉयल्टी पाठवून देणे. आणखी काय लिहू? पुनश्च अभिनंदन!

मुंबईत (सध्या वांद्रे) या, आमच्या हातचे सलकडे तुमचे हातात घालूं! कळावे.

आपला. उधोजी.

ता. क. : मला महाराष्ट्रातील नितीशकुमार ऐसे लाडाने म्हणतात! असो.

माननीय महोदय उधोजीसाहेब, आपका चरणस्पर्श. इस नाचीज बिहारी बालक पलटूराम के पीछे अदृश्य रुपमें खडे रहने के लिए बहुत बहुत धन्यबाद! गेले दोन-अडीच महिने माझ्या डोक्यात असे काही तरी करण्याचे घोळत होते. कमळासुराला धक्का कसा द्यावा, याचाच सतत विचार करत होतो.

साधारणपणे दोन-अडीच वर्षे झाली की मला माझ्या सहकारी पक्षांचा विलक्षण कंटाळा येतो. आपण हे काय करत आहोत? काहीच कसे घडत नाही? असे वाटू लागते. मग मी सरकार पाडायला घेतो. मग ते स्वत:चे का असेना!! त्यानुसारच मी आत्ता वागलो. हे वेगळ्या प्रकारचे ऑपरेशन करताना तुमचाच फोटो समोर ठेवला होता, हे सांगायला विशेष आनंद होतो. आमच्या लालटेनवाल्या तेजस्वीबाबूंना भेटून मी सांगितले की, जरा महाराष्ट्रात काय घडले ते पहा, त्यानंतर आपण तसे करायचे का ते ठरवू!’’ ते म्हणाले, ‘‘ मी पाहिले आहे, लगेच ऑपरेशन करुन टाकू!’’ मग काय! झटपट महाआघाडी बनून गेली. काँग्रेसवाले नेहमीच तयार असतात! तुमच्या मार्गदर्शनाशिवाय हे शक्य झाले नसतेच. पुन्हा एकदा आभार!

पुढे मी नेमके काय करीन, हे आत्ताच सांगता येणार नाही. कदाचित पुन्हा कमळवाल्यांसोबत जाईन! खुर्ची सोडायची नाही, हे माझे ब्रीद आहे! आपल्या पाठबळाबद्दल आभार, आभार आभार!! रॉयल्टी म्हणून डबाभर लिट्टी चोखा पाठवला आहे, आमच्या बिहारी आघाडीचा महाप्रसाद म्हणून ग्रहण करावा, ही विनंती.

ता. क. : लोक मला लाडाने पलटूराम म्हणतात. पण हल्ली, बिहार का उधोजीबाबू असेही म्हणू लागले आहेत! असो.

- ब्रिटिश नंदी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Union Diwali gift to Farmers : नेत्यांमध्ये अध्यक्षपदावरून जुंपली असतानाच 'गोकुळ'चा दूध उत्पादकांना मोठा दिलासा! दिवाळीच्या तोंडावर खात्यात जमा होणार 'इतके' रुपये

Marathi News Live Updates : जाणून घ्या दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी !

Kolhapur Sugarcane Rate Meeting Chaos : पालकमंत्र्यांसमोरच ऊस दर बैठकीत मोठा राडा! पहिल्या उचलीच्या 'त्या' आकड्यावर शेतकरी ठाम; कारखानदारांची उडाली झोप

मुंबईच्या नॅशनल क्रिकेट क्लबच्या 'टॅलेंट हंट'मधून ४५ प्रतिभावान युवा क्रिकेटपटूंची निवड!

Dhoni ने स्मृती मानधनाला वर्ल्ड कप जिंकल्यावर WhatsApp वर केला खास मेसेज; कॅप्टनकूल म्हणाला, 'फक्त तिचाच नंबर माझ्याकडे...'

SCROLL FOR NEXT