Dhing Tang Sakal
satirical-news

ढिंग टांग : घरातले अभंग!

देखिता आभाळ । देखतची राही । काहीचिया बाही । दिसो लागे ।।

-ब्रिटिश नंदी

देखिता आभाळ । देखतची राही ।

काहीचिया बाही । दिसो लागे ।।

मेघे साकारिले । तुझे रुप माये ।

वेडावुनी जाये। जीव माझा ।।

आभाळ अंगण । आभाळ ओसरी ।

आभाळ पंढरी । झाली झाली ।।

देखिला किरीट । गळा तुळशीमाळ ।

कानींचे कुंडल । लोंबती गे ।।

कासे पितांबर । कर कटेवरी ।

नभात पंढरी । सजली गे ।।

वाहे चंद्रभागा । वरतूनी खाली ।

सुस्नात हो झाली । प्रिथिमी माय ।।

कडकडे वीज । कोसळे आवेगीं ।

जणू तुझ्यालागी । एक झाली ।।

विठू माझा आता । डोलतो शिवारी ।

घेतो भार शिरी । भक्तांसाठी ।।

रोज कोठे कोठे । भेटतो गा देव ।

मनीं भक्तीभाव । दाटे तेव्हा ।।

देव घरीदारी । देव इस्पितळी ।

शुभ्र वस्त्रांतळी । देव आहे ।।

सावळे सुंदर । रुप मनोहर ।

ऐसा विश्वंभर । उभा ठेला ।।

युगे अठ्ठावीस । विटेवरी उभा ।

मागे दिव्यशोभा । झळाळते ।।

विठुच्या अंगणी । कैवल्याचे झाड ।

त्यासी येई पाड । अमृताचा ।।

रत्नकीळ प्रभा । साकळे अंतरी ।

देह हा पंढरी । झाला काय ।।

तेजाचा तो पुंज । आनंदाचा कंद ।

भक्तिचाच छंद । जडवितो ।।

तरी विश्वंभरा । न ये तुझी साद ।

जाहलो मोताद । दर्शनाला ।।

पडिले अंतर । नाही दृष्टभेट ।

पंढरीची वाट । दूर राहे ।।

दूरता तुझी ना । होतसे सहन ।

मग अंतरभान । कैसे पाळू?।।

शिवशिवती पाऊले । मन घेई ओढ ।

जित्याची गा खोड । जात नाही ।।

अवखळ वासरु । माये देते ढुशा ।

तैसी माझी मनशा । तुला छळे।।

हट्टी माझे मन । धावे तुझ्या पायी ।

ऐकतचि नाई । काई केल्या ।।

मनींची हुरहूर । उतावीळ गत ।

माझे मनोरथ । सोळखांबी ।।

करोनी प्रपंच । सारे यथासांग ।

फेडायाचे गा पांग । वारीमध्ये ।।

ऐसे घोकुनिया । बैसलो घरात ।

देखिले मनात । तुझे रुप ।।

आता माझे मन । झाले गा पंढरी ।

वाहते अंतरी । चंद्रभागा ।।

तुझे आणि माझे । नुरे काही मत ।

भक्तीचे अद्वैत। साकारिले ।।

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Paithan Road Accident : पैठणमध्ये पिकअपची दुचाकीला धडक, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Pune: पुण्यासह जिल्ह्यात ‘नीट’ परीक्षा शांततेत; पोलिसांचा ६३ केंद्रांवर कडक बंदोबस्त; सीसीटीव्हीची करडी नजर

Latest Marathi News Live Update : विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीकडे राज्याचे लक्ष; आज १७ पैकी ११ जागांचे निकाल

आजचे राशिभविष्य - २२ जून २०२६

एकतर्फी निकाल की धक्कादायक उलथापालथ? काँग्रेसच्या तटस्थ भूमिकेचा फायदा कुणाला? अमरावती विधानपरिषदेचा आज फैसला

SCROLL FOR NEXT