japan visit devendra fadanvis politics ajit pawar eknath shinde  sakal
satirical-news

ढिंग टांग : निकले है जापान...समझ गये ना?

प्रिय कर्मवीर भाईसाहेबसान आणि दादासाहेबसान यांसी शतप्रतिशत प्रणाम. तुमचा निरोप घेऊन जपान दौऱ्यावर निघालो

ब्रिटिश नंदी

प्रिय कर्मवीर भाईसाहेबसान आणि दादासाहेबसान यांसी शतप्रतिशत प्रणाम. तुमचा निरोप घेऊन जपान दौऱ्यावर निघालो खरा; पण पहिल्याच दिवशी होमसिक झालो! तुम्हा दोघांची सवय झाली आहे ना! जाऊ दे…टोक्यो येथे सुखरुप पोचलो.

जपानने मला स्टेट गेस्ट, म्हणजे विशेष अतिथीचा दर्जा बहाल केला असल्याने पाहुणचार उत्तम चालू आहे. आल्या आल्या मी सध्या श्रावण असल्याचे जाहीर करुन टाकले. (नंतर उगीच गडबड नको!) मागल्या वेळेला सुशी नावाचा पदार्थ खाल्ला होता.

‘तुमच्याकडे सुशी आहे, तर आमच्याकडे सुशीला आहे,’ असा विनोदही मी केला होता. पण जपानी लोकांना विनोदबुद्धी नसावी! याबाबतीतही ते आपल्यापेक्षा बरेच मागे आहेत, असे माझे मत झाले. असो.

माझ्याआधी फक्त वंदनीय नमोजींनाच विशेष अतिथीचा दर्जा जपानने बहाल केला होता. मी दुसरा! तेव्हा वंदनीय नमोजींनी ढोल, बासरी, पिपाणी आदी वाद्ये वाजवून दाखवली होती. मी प्रॅक्टिस करुनच आलो आहे.

संधी मिळाली की ढोल वाजवून दाखवणार आहे. पण जपान्यांना संगीताचे एवढे वेड नसावे, असे वाटते. लेकाचे काहीही ऐकतात! याबाबतीतही ते आपल्यापेक्षा बरेच मागे आहेत, असे मला वाटते. असो.

विशेष अतिथींना बुलेट ट्रेनमधून फिरवून आणण्याची जपानमध्ये प्रथा आहे. मलाही ती संधी मिळाली. बुलेट ट्रेनचा महाराष्ट्रातील पहिला लाभार्थी म्हणून माझी इतिहासात नोंद झाली. कारण मी त्यातून प्रवास केला. शिंकान्सेन नावाची एक बुलेट ट्रेन येथे आहे.

‘वंदे भारत’ टाइप गाडी वाटली. शिवाय गाडीत ना सामोसा मिळतो, ना बटाटावडा! ‘लँज’ आणि ‘डिनेर’ ची नोंद नाही की काही नाही. बाहेरची शोभा दिसत नाही. कुणी कुणाशी बोलत नाही. मी एका सहप्रवाश्याशी संवाद साधून गप्पा मारल्या.

त्यानेही डोळे मिटून ऐकून घेतल्या. त्याला मराठी येत नव्हते, मला जपानी! एका रेल्वे अधिकाऱ्याने मात्र नम्रपणे वाकून वाकून वाकूऽऽन नमस्कार केला. मला वाटले की, तिकिट तपासनीस इतका नम्र कसा? पण तो नुसताच शिष्टाचार अधिकारी होता. त्याने विचारले, ‘‘ देवेनसान, तुमच्याकले बुलेत त्रेन नाही का?’’

‘‘आहे, आहे! त्याला शिंदान्सेन बुलेट ट्रेन म्हणतात!’’ मी ठोकून दिले. एकानातो शिंदोजी नामक महान नेत्याने शिंदान्सेन ट्रेन सुरु केली असून लौकरच आजितादो बारामाती यांची तुफानी गाडीही सुरु होणार असल्याचे मी सांगून टाकले आहे.

पाच दिवसांनी मी पुन्हा येईन! (या वाक्याचा मलाच आता कंटाळा आला आहे! असो. तोवर एकमेकांशी भांडूतंडू नका. खरे सांगायचे तर मनावर मणभर दगड ठेवून मी जपान दौऱ्यावर आलो आहे. सामोपचाराने घ्या! तुमच्या दोघांपायी माझा जपानमध्ये जीव लागेनासा झाला आहे. माझ्या पाठीमागे काही गडबड केलीत, तर निकले थे जापान, पहुंच गये चीन, अशी माझी अवस्था होईल!

सांभाळून घ्या... फक्त पाचच दिवस!! सायोनारा!!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रातील विद्यापीठांवर राज्यपालांची कडक नजर! त्रैमासिक अहवाल सादर करणे अनिवार्य; प्रशासनाला नवा धक्का

R Ashwin ने कसोटीतून निवृत्तीसाठी गौतम गंभीरला ठरवले जबाबदार? पर्थ कसोटीत काय घडले ते सांगितले... मन मोकळे केले...

"साडी चुरगळू नये म्हणून ती.." प्रसिद्ध डिझायनरचा ऐश्वर्याविषयी धक्कादायक खुलासा; म्हणाला..

Gudipadwa: गुढीपाडव्याला घरपोच पुरणपोळी! महापालिकेचा उपक्रम; ऑर्डर करण्याची प्रक्रिया काय?

Latest Marathi News Live Update : महापौर रितू तावडेंच्या अडचणी वाढल्या ! शिक्षक मारहाण प्रकरणात दोषमुक्तीला न्यायालयाचा नकार

SCROLL FOR NEXT