lok sabha election 2024 politics
lok sabha election 2024 politics Sakal
satirical-news

ढिंग टांग : किडनी, लिव्हर, हार्ट वगैरे...!

-ब्रिटिश नंदी

एक कार्यकर्ता मोठ्ठ्या आवाजात

म्हणाला : माझ्या हातात मशाल आहे,

आणि हृदयात घड्याळ आहे...

पायात ईडीची बेडी आहे,

दंडात बेटकुळी आहे, आणि

कमरेत गुलामीची साखळी आहे...

तुतारी फुंकून दुसरा कार्यकर्ता

दुप्पट मोठ्या आवाजात म्हणाला :

माझ्याही हातात घड्याळ आहे,

आणि हातात तुतारी आहे...

इडीची बेडी तुटली आहे,

दंडातली बेटकुळी फुगली आहे...

तिसरा कार्यकर्ता हळूच म्हणाला :

मी मेंदूत ठेवतो हे कमळ

आता सगळं झालंय निर्मळ

हृदयात आहे धनुष्यबाण

दाखवू का छाती फाडून छान?

चौथ्याने म्हटले, ‘‘बघू, बघू’’ तर

त्याला हिंसक जमावाने घोळसले,

हाफ मर्डरची केस टाकू, असे

चारचौघात धमकावले!

एका मध्यमवयीन पक्षाच्या

पोक्त नेत्याने तोंड पुसत सांगितले :

‘‘असं करा, धनुष्यबाण ठेवा किडनीत,

आणि रेल्वे इंजिन असू द्या हे इकडे..लिव्हरमध्ये!’’

‘‘लिव्हर डावीकडे नसतं लेका,

उजव्या बाजूला बर्गडीखाली हे इकडे!

काहीही सांगता राव तुम्ही

अनाटॉमीचे घ्या जरा धडे!’’

एका विद्वान नेत्याने उपटले कान

शरीरशास्त्राचं पाजळलं ज्ञान.

एक नेता सरसावून म्हणाला :

‘‘मोदीजी म्हंजे भुताटकी

हुकूमशाहीची पोराटकी

हे कसले आणणार अच्छे दिन,

हे तर आहेत देशी पुतिन!’’

दुसरा नेता गंभीरपणे म्हणाला :

भुताटकी तर भुताटकी,

आम्ही आहोत जुने मांत्रिक

हुकूमशाहीची ही चेटकीण

मी तिला बाटलीत भरीन!

ॐ र्हिं फट स्वाहा!

ॐ ऱ्हीं फट स्वाहा!

कमळ हुंगत आणखी एकजण म्हणाला:

देवाच्या करणीला भुताटकी म्हणता?

अवतारी पुरुषाला नावं ठेवता?

नरकात जाल रे, नरकात जाल!

ईडीच्या कढईत तळून निघाल!

मशाल पेटवण्यासाठी काड्या उजळत आणखी एकजण म्हणाला : फडतूस लेकाचे,

गद्दार, चारसोबीस, चोरटे, हरामखोर,

विश्वासघातकी, खंजीरखुपश्ये...

खोकेबहाद्दर, पक्षचोर, बापचोर,

रद्दीचोर... कोथळा काढीन, मुंडकं उडवीन,

तोफेच्या तोंडी देईन, हत्तीच्या पायी देईन,

कडेलोट करीन, यंव करीन,

त्यंव करीन

गाठ आहे माझ्याशी!

बरेच जण समूहाने खीककन हसले,

आणि म्हणाले : बरं, बरं, ओक्के!

पुन्हा भेटू, पुन्हा भेटू, पुन्हा भेटू!

पुढला एकजण मागे जात म्हणाला :

मी कधीच हरत नाही, कारण

मी कधी लढत नाही.

मी कधीच लढत नाही, कारण

मी कधी पडत नाही

मी कधी पडत नाही, कारण

मी कधी नडत नाही.

मी कधी नडत नाही, कारण

तसं काही घडत नाही...

मैं और मेरा इंजिन,

अक्सर ये बाते करते है...

मागचा एकजण पुढे येऊन म्हणाला :

माझ्या मागे आहे महाशक्ती,

तिची करावी नमोभावे भक्ती

नड्डाजी नववे आणि आमचे शहा,

म्हंजे तर आश्चर्य नंबर दहा!

पुढचा एकजण पुढेच राहून म्हणाला :

मॅकियावेली माझाच विद्यार्थी,

अरिस्टॉटल तसा डोक्यानं बरा होता,

चाणक्याचा आगाऊपणा सोडला,

तर बाकी बच्चा होनहार होता

या सगळ्यांना मीच दिले लोकशाहीचे धडे

आणि मीच शिकवले त्यांना

सत्तेचे पाढे!

वृत्तवाहिन्या ओकत राहिल्या

सोशल मीडिया भुंकत राहिला

जाहिरातीची होर्डिंग किंचाळत राहिली

प्रचारफेऱ्यांची झिंग वाढत राहिली

लाखोल्यांचे साचले ढीग

शिव्याशाप शिगोशीग

कभिन्न कोलाहलात दोन्ही कानांवर

हात ठेवून एक मूक मतदार मुक्यानेच ओरडला :

‘‘बास, बास, बास...नाही होत सहन आता

लौकर आटपा रे निवडणुका, लौकर आटपा!’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi Death: इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या हेलिकॉप्टर अपघातामागे षडयंत्र आहे का, नेमकं काय घडलं? इस्रायलच्या भूमिकेबाबत मोठा दावा!

Rohit Sharma : क्रिकेटपटूंची गोपनीयता जपा! ; मुंबई इंडियन्सचा खेळाडू रोहित शर्मा आयपीएल ब्रॉडकास्टरवर भडकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान

Kalyan News: देशाच्या विकासासाठी मतदार महायुतीच्याच बाजूने, विश्वनाथ भोईरांचे वक्तव्य

Akshay Kumar : अक्षयचा दिलदारपणा; जॉली एलएलबीचं शूटिंग पूर्ण होताच केली 500 मुलींना मदत

SCROLL FOR NEXT