dhing tang sakal
satirical-news

ढिंग टांग : इति रोडशो माहात्म्य…!

जयाच्या रथा फीरती चार चाके । जयाच्या पुढे सर्व ब्रह्मांड वांके । नमवीत भूमी पहा तोच गेला । नमस्कार माझा अशा रोडशोला ॥

ब्रिटिश नंदी

जयाच्या रथा फीरती चार चाके ।

जयाच्या पुढे सर्व ब्रह्मांड वांके ।

नमवीत भूमी पहा तोच गेला ।

नमस्कार माझा अशा रोडशोला ॥

दिठीचेच अपुल्या फिटे पारणे हो ।

बघा याचि डोळा हा सोहळा हो ।

मुखदर्शनामात्र मम मोक्षा आला ।

नमस्कार माझा अशा रोडशोला ।

गुढ्या तोरणे आणि झेंडे पताका ।

फुले चौक सारा, सजला की नाका ।

कुणी झांकिला बाजुचा दिव्य नाला ।

नमस्कार माझा अशा रोडशोला ॥

फुलांनी सजे तो रथ दिव्य साचा ।

बघोनि कुणाची बसलीच वाचा ।

असे बंद हा मार्ग का वाहतुकीला ।

नमस्कार माझा अशा रोडशोला ॥

दुतर्फा उभी भीड ही दर्शन्मात्रे ।

बघोनीच होती भली तृप्त गात्रे ।

असा विश्वनेता कधी नाही झाला ।

नमस्कार माझा अशा रोडशोला ॥

पहा आमुचा कीर्तीवंत विश्वनेता ।

महानायका तूचि रे जगज्जेता ।

आम्ही पारखे तूझिया गा कृपेला

नमस्कार माझा अशा रोडशोला ॥

गर्दीतुनी फेकिती पुष्पशेले ।

पहा विश्वनेता कसे तेहि झेले ।

पहा हार झेलोनि त्वरें फेकलेला ।

नमस्कार माझा अशा रोडशोला ॥

दुथडीस गर्दी मधुनी वरात ।

नेता निघाला हलवून हात ।

नमो नमो वंदु या नायकाला ।

नमस्कार माझा अशा रोडशोला ।

रथाच्या पुढे भक्त जत्थाच धावे ।

पुढे जाम रस्ते वाहतूक वनवे ।

फुकाफुकी कोण गर्दीत मेला ।

नमस्कार माझा अशा रोडशोला ॥

पहा विश्वनेता कसा डौल त्याचा ।

गळ्याभोवती रेशमी दिव्य पंचा ।

तेजस्वी ऐसा, जणू सूर्य आला ।

नमस्कार माझा अशा रोडशोला ।

आहे कुणाची इथे अन बिशाद ।

वीरोधकांची मते सर्व बाद ।

स्वत: देई उ:शाप तो कावळ्याला ।

नमस्कार माझा अशा रोडशोला ॥

रेखीव श्मश्रू, तेजस्वि कांती ।

इथे मावळे सर्व चिंता नि भ्रांती ।

आयेगा तो फिरसे यह आनेवाला ।

नमस्कार माझा अशा रोडशोला ॥

बाजूंस दोन्ही जय अन विजय ते ।

मधोमधी उभे आमुचे विश्वनेते ।

रणांआधि जाहीर करिती निकाला ।

नमस्कार माझा अशा रोडशोला ॥

तिठ्याला नि चौकात ताशे नगारे ।

जयघोष, चित्कार आणि हाकारे ।

पहा वीर त्याने टणत्कार केला ।

नमस्कार माझा अशा रोडशोला ॥

भक्तांचिया एवढ्या ओढिसाठी ।

पहा विश्वनेता येई धावोनि हाटी ।

गर्दीत येवोन उभा ठाकलेला ।

नमस्कार माझा अशा रोडशोला ॥

कुठे बंद गाड्या, कुठे बंद रस्ते ।

वाहतूक कोंडी नेहमीच अस्ते ।

रडक्या जनांनो, तुम्ही झाडपाला ।

नमस्कार माझा अशा रोडशोला ॥

पहा घरघराटी हेलिकॉप्टरांचे ।

नेत्यासवे करिल उड्डाण सांचे ॥

हेलिकॉप्टरातून नेता उडाला ।

नमस्कार माझा अशा रोडशोला ॥

काही म्हणा तुम्ही काही म्हणा हो ।

असा रोडशो नाही झाला म्हणा हो ।

कसले इलेक्शन कसला हा कल्ला ।

नमस्कार माझा अशा रोडशोला ॥

खरे हेच की ही खरी लोकशाही ।

जिथे प्रजा अल्प धारिष्ट पाही ।

जयाने नजरबंद लिंबु घुमविला ।

नमस्कार माझा अशा रोडशोला ॥

लखलाभ तुम्हा असे रोडशो गा ।

चकाचौंध डोळे बुध्दी फिरे गा ।

प्रतिमेहुनि मोल ये प्रत्यक्षाला ।

नमस्कार माझा अशा रोडशोला ॥

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : चाकणमध्ये भाईगिरीचा थरार! फक्त हॉर्न वाजवल्याच्या रागातून मुंबईकडे जाणाऱ्या एसटी बसची तोडफोड

60 कोटींचा बंगला, आलिशान गाड्या, लंडनमध्ये घर; तब्बल 'इतक्या' कोटींची आहे अजय देवगणची संपत्ती, आकडा ऐकून थक्क व्हाल

Honey Trap Case : पाकिस्तानी महिला हेराच्या जाळ्यात अडकला नौदलाचा जवान

श्री तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा सुरू; १० ऑक्टोबरपर्यंत मिळणार नाही दर्शन! जाणून घ्या 'या' प्रथेमागील नेमकं कारण...

Latest Marathi News Live Update : पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी संपर्क असल्याच्या आरोपावरून गुवाहाटीत तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT