Shivraj Gorle writes Career and motherhood google
संपादकीय

करिअर आणि मातृत्व

‘आई होणं हा आयुष्यातला सर्वांत मोठा आनंद होय,’ अभिनेत्री जुही चावला म्हणते. ‘माझ्या मुलीला- वामिकाला सायकलवर मागे बसवून मी पहिली चक्कर मारली, तो माझ्या आयुष्यातला सर्वांत आनंदाचा क्षण होता,’ अनुष्का म्हणते...

शिवराज गोर्ले

‘आई होणं हा आयुष्यातला सर्वांत मोठा आनंद होय,’ अभिनेत्री जुही चावला म्हणते. ‘माझ्या मुलीला- वामिकाला सायकलवर मागे बसवून मी पहिली चक्कर मारली, तो माझ्या आयुष्यातला सर्वांत आनंदाचा क्षण होता,’ अनुष्का म्हणते. बहुतेक सर्वच अभिनेत्री, झगमगत्या चित्रपट सृष्टीतील ‘ग्लॅमरस’ करिअरला ब्रेक देऊन मातृत्वाचा अनुभव आणि आनंद घेताना दिसतात. पण खरा प्रश्‍न आहे तो इतर अनेक म्हणजे आयटी, उद्योगविश्‍व, बॅंकिंग, जाहिरात, माध्यम अशा क्षेत्रांत करिअर करणाऱ्या आजच्या तरुण मुलींचा. त्यांचा ‘मातृत्वा’कडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे, यावरच उद्याच्या कुटुंब संस्थेचं भवितव्य ठरणार आहे. नेमकं हेच जाणून घेण्यासाठी डॉ. गीतांजली राणे- घोलप यांनी पंचविशीतील काही तरुणींशी संवाद साधला.

त्यातील काही तरुणींची ही मनोगतं आहेत. वकिली करणाऱ्या नेहा सावंत- मोरे म्हणतात, ‘‘आई होणं म्हणजे कुटुंबाला पूर्णत्वाच्या आनंदाची भेट देणं. पण आजची ‘फास्ट आणि करिअर ओरिएंटेड लाइफ स्टाइल’ बघता स्वतःसाठी पुरेसा वेळ देता येत नाही. अशा वेळी अपत्याची अगदी शंभर टक्के जबाबदारी घ्यायची तर सगळं नीट सांभाळता येईल का, हा प्रश्‍न भेडसावतो.’’

सामाजिक क्षेत्रात काम करणारी अमृता काळहाने- शिंदे म्हणते, ‘‘आपण आपलं शिक्षण, करिअर या जबाबदाऱ्या कुटुंबाच्या साथीनं पूर्ण करू शकतो, तर मातृत्वासारखी मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी पूर्ण करण्यात कुटुंबाची साथ का मिळणार नाही? करिअरसाठी मूल न होऊ देण्याचा विचार म्हणजे स्वार्थीपणा झाला. आपल्याला सृष्टी जगवायची असेल तर मुलं होणं देखील गरजेचं आहे. मुलं ही आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहेत, त्याला आपण नाकारू शकत नाही.’’

माध्यम क्षेत्रात कार्यरत तन्वी बालिगा म्हणते, ‘‘मातृत्व ही एकट्या त्या तरुणीची जबाबदारी नसून आई-वडील अशा दोघांचीही असते. बाळामुळे करिअरला ब्रेक लागू शकतो, पण तो काही काळापुरता. परदेशात तर मोठ्या संख्येनं स्त्रिया एकल मातृत्व, करिअर करूनही निभावताना दिसतात. माझ्या मते मातृत्व ही काही यशस्वी करिअरच्या आड येणारी बाब नसावी.’’

जाहिरात क्षेत्रातली प्राची म्हणते, ‘‘बाळंतपण म्हणजे करिअरला स्वल्पविराम किंवा पूर्णविराम. आधी हा एवढा मोठा त्याग आणि मग त्या मुलांचं संगोपन, संस्कार, शिक्षण यासाठी लागणारा मोठा काळ आणि जबाबदारी. मातृत्व जितकं सुखद आहे तितकंच आव्हानात्मक आहे. ही गंभीर जबाबदारी मला पेलवेल का, याबाबत सध्या तरी मी साशंक आहे.’’

या सर्वच मुली करिअरला महत्त्व देणाऱ्या असल्या तरी मातृत्व ही संकल्पना नाकारीत नाहीत. ते जितकं सुखद, तितकंच आव्हानात्मक असल्यानं ती जबाबदारी पेलण्यासाठी जोडीदाराची, परिवाराची साथ हवी, अशी मात्र त्यांची रास्त अपेक्षा आहे. अर्थात हे सारं असलं तरी ती मुख्यतः स्त्रीची जबाबदारी असल्यानं मातृत्व आणि करिअर यात समतोल साधणं जमेल का, याविषयी काहीजणी साशंक आहेत. ते स्वाभाविकच आहे, पण या साशंकतेवर त्या निश्‍चित मात करू शकतात, हा समतोल ज्यांनी साधला आहे, अशा स्त्रियांच्या अनुभवांवरून.. त्यातून प्रेरणा घेऊन. तशी तर असंख्य उदाहरणं आहेत, पण इथे मी एकच एक उदाहरण आवर्जून देऊ इच्छितो. निवृत्त पोलिस अधिकारी मीरा बोरवणकर यांचं.

स्त्रीच्या दृष्टीनं सर्वांत आव्हानात्मक असणाऱ्या ‘पोलिसिंग’ क्षेत्रात धडाडीनं करिअर करत असतानाच दोन मुलांच्या मातृत्वाची जबाबदारीही त्या तितकीच उत्तम निभावू शकल्या. कामाच्या विचित्र वेळा, सततची पोलिस ऑपरेशन्स, छापे यामुळे त्यांची प्रतिमा ‘झाशीची राणी’ अशी झाली होती. रात्री छोट्या मुलाला पाठीशी बांधून त्या मोटरसायकलवरून गस्तीला जात, अशी वदंता होती! ‘मातृत्व निभावताना अनेकदा कस लागलाच,’ त्या म्हणतात, ‘‘पण मुलांच्या बालपणाचा आनंद मी पुरेपूर लुटला. माझ्या दोन्ही मुलांचे जन्म मला आयुष्यातल्या मोठ्या वरदानासारखे वाटतात.’’ असंच कर्तृत्व गाजविणाऱ्या अनेक स्त्रियांच्या मते केवळ करिअरसाठी मातृत्व नाकारण्याचा निर्णय एकांगी ठरू शकतो. एक तर निश्‍चित, करिअरमधलं अगदी उत्तुंग असं यशही मातृत्वाच्या आनंदाची भरपाई करू शकत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif: कागलमध्ये समेट! हसन मुश्रीफांच्या सून बिनविरोध; शिंदे गटाने घेतली माघार

PM Kisan 21st Installment : मोठी बातमी! पंतप्रधान मोदींनी किसान सन्मान योजनेचा २१वा हप्ता केला जारी

U19 World Cup 2026 स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर! भारताचे सामने कुठे आणि कधी होणार? जाणून घ्या

Post Office : तुम्हाला वर्षभरात लखपति बनवू शकते पोस्टाची ही स्कीम! थोडीशी गुंतवणूक करून झटपट व्हाल श्रीमंत?

Video: प्राजक्ता–गश्मीर पुन्हा एकत्र येणार? व्हिडिओ शेअर करत केल्या मोठ्या घोषणा, म्हणाले...'फुलवंतीनंतर आता...'

SCROLL FOR NEXT