mother sakal
संपादकीय

कुटुंब डॉट कॉम : मातृत्व - सृजनाची शक्ती

लग्न, मातृत्व व पालकत्व हे कुटुंब व्यवस्थेचे तीन आधारभूत घटक. मागील लेखांत आपण ‘लग्न संस्थे’विषयी बोललो. आता मातृत्वाकडे वळूयात.

शिवराज गोर्ले

लग्न, मातृत्व व पालकत्व हे कुटुंब व्यवस्थेचे तीन आधारभूत घटक. मागील लेखांत आपण ‘लग्न संस्थे’विषयी बोललो. आता मातृत्वाकडे वळूयात.

लग्न, मातृत्व व पालकत्व हे कुटुंब व्यवस्थेचे तीन आधारभूत घटक. मागील लेखांत आपण ‘लग्न संस्थे’विषयी बोललो. आता मातृत्वाकडे वळूयात. भारतीय संस्कृती ‘‘मातृ देवो भव’’ असं मानणारी आहे, हे तर सर्वश्रृत आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘स्त्री’ शब्द उच्चारताच हिंदूंच्या मनात मातृभावाचा उदय होतो. भारतीयांच्या दृष्टीनं सारी ‘स्त्री शक्ती’ मातृत्वात घनीभूत झालेली असते. आमच्यासाठी स्त्री असते ‘परमपावन मांगल्य निधान’. आपण मला सांगा, ज्याच्या समोर जाण्याची कामभावनेला हिंमत होणार नाही किंवा पशुत्व ज्याला स्पर्श करू शकणार नाही, असा ‘आई’ या शब्दाखेरीज अन्य कोणता शब्द आहे?’

‘प्रेमस्वरूप आई, वात्सल्यसिंधू आई...’ असा कवींनीही तिचा वारंवार गौरव केला आहे. हे सर्व असलं तरी काही अभ्यासक, विचारवंतांच्या मते मातृत्व या नैसर्गिक वास्तवाला अकारण उदात्त पातळीवर नेऊन ठेवलं आहे. पातिव्रत्य व मातृत्व हे आदर्श स्त्रीपुढे ठेवून तिला घरातच बद्ध करून समाजानं तिला तिच्या विकासापासून वंचित ठेवलं, तिला दुय्यम लेखलं, हा त्यांचा आक्षेप असतो. काही ‘डिंक जोडपी’ तर मातृत्व ही जैविक प्रेरणा नसून सामाजिक प्रेरणा असल्याचा दावा करीत असतात. आपण हेही पाहिलं आहे की आज जपानमध्ये बहुसंख्य स्त्रिया मातृत्व नाकारीत आहेत. ‘‘पुरुष मुलांच्या संगोपनात काहीच वाटा उचलत नाहीत,’’ हे त्यामागचं मुख्य कारण सांगितलं जातं. पण त्याच वेळी अमेरिकेसारख्या देशात करिअर व मातृत्व दोन्ही कुशलतेनं सांभाळणाऱ्या ‘सिंगल मदर्स’ची संख्याही लक्षणीय आहे! अर्थात हे तर खरंच की गर्भारपण, प्रसूति, संगोपन... हे स्त्रीलाच निभावायचं असतं. त्यामुळे मातृत्व हवं की नको, हा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य तिला असायला हवं. ‘मातृत्व हेच स्त्रीजीवनाचं सार्थक आहे’ हे इशारेवजा संस्कारही आता स्त्रिया स्वीकारणार नाहीत. पण हेही तितकंच खरं की मानवजातीचं भवितव्य ‘मातृत्वा’तूनच उमलणार असतं आणि बहुसंख्य स्त्रियांना मातृत्वाची नैसर्गिक आस असतेच. एवढ्या प्रस्तावनेनंतर आता थेट ‘मातृत्वा’विषयी विचार करूयात. सर्वांत महत्त्वाचा मुद्दा हा आहे- मातृत्वामुळे स्त्रीवर काही मर्यादा येतात; पण जी तिची मर्यादा मानली जाते, तीच खरी तिची सर्वोच्च क्षमता असते!

अगदी साधी गोष्ट आहे, निसर्गाच्या दृष्टीनं मानवजातीसाठी सर्वांत महत्त्वाची जबाबदारी कोणती? अर्थातच सृजनाची व संगोपनाची. त्याशिवाय मानव जात अस्तित्वातच राहणार नाही. स्त्री जर (आजही अनेक पुरुष समजतात तशी) ‘अबला’ असती तर ही सर्वांत महत्त्वाची जबाबदारी निसर्गानं तिच्यावर सोपवली असती का? हे तर खरंच ना की जगातील सर्वांत बलवान पुरुष असो की सर्वांत बुद्धीमान - तो एका स्त्रीच्या पोटीच जन्म घेत असतो, तिच्याच आधारानं वाढत असतो! मग अशी स्त्री दुर्बल कशी? कनिष्ठ कशी?

सृजनाची शक्ती निसर्गानंच स्त्रीला बहाल केली आहे. अगदी आदिम काळापासून आपल्याकडे हेच मानलं गेलं आहे. स्त्री म्हणजे शक्ती आणि शक्ती म्हणजे स्त्री. निसर्गानं सोपवलेली सृजनाची जबाबदारी पेलण्यासाठीच स्त्रीची सारी वैशिष्ट्ये विकसित झाली आहेत. वात्सल्य, ममता, प्रेम, दया, संयम, निष्ठा, चिकाटी, दूरदृष्टी, योजकता, प्रसंगावधान व अष्टावधान, सहकार्य, विवेक व सुरक्षिततेची समज... ही सारी काय स्त्रीच्या दुर्बलतेची लक्षणं आहेत?

पुरुषांना स्वतःचा वारस हवा असतो. त्यांनीही स्त्रीच्या मातृत्वाचा यथोचित सन्मान करायला हवा. ती जबाबदारी पार पाडण्यासाठी तिला सर्वतोपरी सहकार्य करायला हवं. समाजाला पुढची पिढी हवी असते. समाजानंही (विशेषतः कमावत्या) स्त्रीला, मातृत्वासाठीच्या साऱ्या सोयी सवलती सन्मानानंच द्यायला हव्यात. स्त्रियांनीही त्या मातृत्वाचा हक्क म्हणूनच स्वीकारायला हव्यात. त्याच वेळी ‘मातृत्व’ उत्तम निभावण्यासाठी लग्न व कुटुंबाचं महत्त्वही त्यांनी ध्यानात घ्यायला हवं!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ration Card : रेशनकार्डमधून १.१७ कोटी लोकांची नावे वगळणार, केंद्राने राज्यांना पाठवली यादी; तुमचं नाव तर नाही ना ?

Pune Traffic : सिंहगड रस्तावासीयांना पुन्हा मनस्ताप; पाऊस, प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे वाहतूक कोंडी

Rain-Maharashtra Latest live news update: नागपूर जिल्ह्यातील वडगाव धरण 99.75 टक्के भरले, 953.57 क्युमेक ने पाण्याचा विसर्ग सुरू

SET Exam 2025 : विद्यार्थ्यांची चिंता वाढली; सेट परीक्षेचा निकाल एसबीसी आरक्षणामुळे रखडला

Monsoon Car Tips: कारच्या एसीचा दुर्गंध घालवण्यासाठी पावसाळ्यात 'या' 4 गोष्टी ठेवा लक्षात

SCROLL FOR NEXT