संपादकीय

विशेष संपादकीय : अस्थैर्य संपविण्यासाठी स्वागतार्ह पाऊल 

सकाळवृत्तसेवा

लॉकडाउन २.० कशा पद्धतीने अमलात आणला जाईल, याच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारच्या गृहखात्याने आज जारी केल्या. या सूचनांचे स्वागत केले पाहिजे. शेती, अर्थ, सामाजिक, शिक्षण, सार्वजनिक सेवा, मालवाहतूक, अत्यावश्‍यक वस्तू, औद्योगिक, पायाभूत सुविधा, बांधकाम अशा विविध क्षेत्रांचा बारकाईने विचार त्यामध्ये आहे. कोरोना विषाणूच्या साथीमुळे अनपेक्षित, अभूतपूर्व प्रसंगांना सामोरे जात असलेल्या जगामध्ये ‘लॉकडाउन’ अथवा संपूर्ण कुलुपबंदीचा पर्याय गेले चार आठवडे विविध ठिकाणी वापरला गेला.

या पर्यायाने कोरोनाच्या संसर्गाचा वेग जरूर नियंत्रित केला; तथापि पूर्णतः नायनाट शक्‍य झालेला नाही. अशा परिस्थितीत सर्व व्यवहार दीर्घकाळ कुलुपबंद करणे परवडणारे नव्हते. विशेषतः शेती, मालवाहतूक, कामगारांचे प्रश्न जटील बनले असते. ‘सकाळ’ने केंद्र-राज्य सरकारचे लक्ष त्याकडे वेधले. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत. त्यासह आरोग्याच्या नव्या नियमांचे काटेकोर पालन करून व्यवहार टप्प्याटप्प्याने सुरू केल्यास नागरिकांमध्ये कोरोनाविरोधी लढण्याचा आत्मविश्‍वास तयार होईल, ही ‘सकाळ’ची भूमिका राहिली.

आजच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये त्याचे प्रतिबिंब दिसते आहे. तीव्र बाधित क्षेत्रात तीन मेपर्यंत बंधने जरूर राहतील, तथापि अन्यत्र एकाचवेळी साथीचा मुकाबला आणि सार्वजनिक आरोग्याचे नवे नियम पाळून व्यवहार सुरू होण्याची मानसिकता तयार होईल, असे अपेक्षित आहे. असे घडले, तरच संपूर्ण समाज म्हणून आपण कोरोनाच्या आणि त्यापाठोपाठ येऊ घातलेल्या आर्थिक आणि पर्यायाने सामाजिक अस्थैर्याच्या संकटातून सुखरूप बाहेर पडणार आहोत. आजच्या मार्गदर्शक सूचना त्यादिशेने पडलेले पाऊल आहे, असे मानता येईल. 

१. सार्वजनिक आरोग्याचे नवे नियम काटेकोर पाळा. 
२. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा. 
३. कोरोनापाठोपाठ येऊ घातलेले आर्थिक संकट रोखा. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Congress: चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा दुसरा गट स्थापन होणार; पक्षातला अंतर्गत वाद दिल्ली दरबारी

7 Minute 11 Second व्हायरल MMS पासून ते 'धुरंधर 2' सीन लीक क्लिपपर्यंत...जानेवारीमध्ये 'हे' टॉप 10 व्हिडिओ होते ट्रेंडिंग

"आमच्या प्रेमात ज्ञानदाने खूप सोसलं" होणाऱ्या नवऱ्याने सांगितली लव्हस्टोरी "आमच्या कास्ट वेगळ्या.."

Latest Marathi News Live Update: मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात पुणे पोलिसांकडून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

Palghar Fire: पालघरमध्ये आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट! फर्निचर कंपनीला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल, Viral Video

SCROLL FOR NEXT