Success Story farmer son crack exam Indian Revenue Service IRS education sakal
संपादकीय

Success Story : शेतकरी मुलाची ‘आयआरएस’ पदाला गवसणी

स्वप्नील पाटील यांची घरची परिस्थिती बेताचीच. शेतीशिवाय उत्पन्नाचा दुसरा कोणताही मार्ग नव्हता.

अक्षय गुंड

स्वप्नील पाटील यांची घरची परिस्थिती बेताचीच. शेतीशिवाय उत्पन्नाचा दुसरा कोणताही मार्ग नव्हता.

स्वप्नील पाटील यांची घरची परिस्थिती बेताचीच. शेतीशिवाय उत्पन्नाचा दुसरा कोणताही मार्ग नव्हता. परंतु सतत पडत असलेल्या दुष्काळामुळे आणि पाण्याची उपलब्धता नसल्याने शेती बेभरवशाची झाली होती. स्वप्नील पाटील यांचे वडील शरदराव पाटील हे ट्रॅक्टर चालक आणि ते ऊस वाहतूक करत. मुले हुशार असल्याने त्यांच्या शिक्षणात कोणतीही कमतरता राहू नये, अशी त्यांची प्रबळ इच्छा.

त्यामुळे ते रात्रंदिवस काबाडकष्ट करत असत. स्वप्नील यांचे प्राथमिक शिक्षण उपळाईच्या जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण महाळुंग या मामाच्या गावी झाले. अकरावी बारावीचे शिक्षण सोलापूरच्या दयानंद कॉलेज येथे झाले. परिस्थितीमुळे शिक्षण घेऊन नोकरी स्वीकारण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्याय नव्हता.

चिकाटीच्या जोरावर त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत पूर्ण केले. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण होताच त्यांना विविध कंपन्यांतून नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या. या काळात त्यांच्या मनात स्पर्धा परीक्षेचा कोणताही विचार नव्हता.

कारण त्यांच्यासह दोन बहिणीचे शिक्षणाचा खर्च व कुटुंबाचा आर्थिक गोष्टीचा ताण वडिलांवर असल्याने स्वप्नील हे नोकरीसाठी आग्रही होते. वडिलांना आपल्या शिक्षणाचा अजून भार द्यायला नको म्हणून ते कंपनीत नोकरीसाठी रुजू होण्याची तयारी करत होते.

पण गावातील अधिकारी झालेले व सध्या मुंबईतील पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांची स्वप्नील यांच्याशी अचानक भेट झाली. स्वप्नील यांची शैक्षणिक गुणवत्ता बघून डॉ. भाजीभाकरे यांनी त्यांना स्पर्धा परीक्षा देण्याबाबत प्रोत्साहित केले. ‘‘तुझ्यात तेवढी क्षमता आहे.

तू प्रशासकीय अधिकारी होऊ शकतो. तुला लागेल ते सहकार्य करतो’’, असा सल्ला व खंबीर साथ दिली. प्रथमतः स्वप्नील यांनी स्पर्धा परीक्षा देण्यास नकार दिला. वडिलांवर आर्थिक खर्चाचा बोजा वाढेल म्हणून ते स्पर्धा परीक्षेसाठी उत्साही नव्हते. परंतु डॉ. भाजीभाकरे यांनी एकदातरी प्रयत्न करावा, अशी इच्छा बोलून दाखवली. त्यामुळे कधीही न बघितलेले स्वप्न कुणीतरी दाखवले होते.

डॉ. भाजीभाकरे यांची प्रेरणा व मार्गदर्शन घेऊन स्वप्नील पाटील यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास सुरू केला आणि पहिल्या प्रयत्नातच त्यांची २०११ साली ‘आयआरएस’पदी निवड झाली.

या निवडीमुळे त्यांच्या कुटुंबीयांसाठी आनंद गगनात मावेनासा झाला. पुढे प्रशिक्षण काळ पूर्ण झाल्यानंतर त्यांना प्रथम गुजरात आणि नंतर लातूर, पिंपरी चिंचवड येथे सहाय्यक प्राप्तीकर आयुक्त म्हणून सेवा बजावली. पुण्याच्या प्राप्तीकर उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती.

सामाजिक बांधिलकी

ज्या मायभूमीतून आपण घडलो त्याचे काहीतरी देणे लागतो या सामाजिक बांधिलकीतून त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील उपळाई बुद्रूक परिसरातील शाळांच्या भौतिक सुधारण्यासाठी दीड वर्षांत सीएसआर फंडातून एक कोटी ५० लाखांच्या आसपास खर्च करून जिल्हा परिषदेच्या शाळा हायटेक व स्मार्ट करण्यासाठी प्रयत्न केले.

मोठ्या पदावर विराजमान होऊन देखील त्यांनी गावाची नाळ तोडली नाही. गावातील प्रत्येक सामाजिक कामात ते सतत अग्रेसर असतात. शेतकऱ्याच्या या मुलाची गेल्यावर्षी प्राप्तीकर विभागात सह आयुक्त म्हणून बढती मिळाली. सध्या ते दिल्ली येथे केंद्रीय मंत्र्याचे खासगी सचिव म्हणून कार्यरत आहेत.

ध्यास, धडपड, सातत्य, प्रामाणिकपणा, कौशल्य, बुद्धिमत्ता, जिद्द आणि प्रचंड इच्छाशक्ती यांच्या जोरावर माणूस यशाच्या शिखरावर विराजमान होतो आणि अशी अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. यापैकीच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे उपळाई बुद्रूक (ता.माढा) येथील स्वप्नील शरदराव पाटील होय. आर्थिक परिस्थितीमुळे नोकरीशिवाय पर्यायच राहिला नसताना त्यांनी चिकाटीने स्पर्धा परीक्षेचा निर्णय घेतला. पहिल्या प्रयत्नातच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून ‘आयआरएस’ पदाला गवसणी घातली.

- अक्षय गुंड, उपळाई बुद्रूक (जि.सोलापूर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra political news : ‘राष्ट्रवादी’च्या विलीनीकरणाला खो! दिल्लीतील दोन मोठ्या नेत्यांच्या सल्ल्यानंतरच निर्णय

Indian Cricketer Abroad: मराठमोळा अष्टपैलू जपानच्या क्रिकेट विश्‍वात चमकतोय; आदित्य फडकेची मातृभूमी भेट, बालपणीच्या आठवणींना उजाळा!

Latest Marathi News Live Update : केंद्र सरकारच्या धोरणांच्या निषेधार्थ कामगार संघटनांचा आज 'भारत बंद'; देशव्यापी बंदमुळे जनजीवनावर परिणाम होणार!

PDCC Bank Recruitment : ‘पीडीसीसी’ बँक भरतीत गोंधळ; जाहिरात प्रसिद्ध होऊन साडेचार वर्षे पूर्ण, मात्र प्रक्रिया अपूर्ण

Rohit Sharma: 'मला ती ट्रॉफी हवीच आहे, त्यामुळे....' २०२७ वनडे World Cup बाबत रोहित अखेर थेट अन् स्पष्टच बोलला

SCROLL FOR NEXT