sunita tarapure
sunita tarapure 
संपादकीय

अंगणी गुलमोहर फुलला

सुनीता तारापुरे

घरासमोरील रस्त्याच्या दुतर्फा गुलमोहराची झाडं आहेत. फांद्यांचा विस्तार एकमेकांत गुंतत त्यांची सुरेख कमान झालीय. आता ही सगळीच्या सगळी झाडं बहरलीयंत. त्या लाल-केशरी कवेत शिरल्यावर नजर सहज वरच्या दिशेने वळवावी तर माथ्यावर दिसते, आभाळाच्या निळाईत मिसळलेली लालचुटूक रंगाची फुलं, नेच्यासारख्या रचनेची मखमली पानं नि जमिनीकडं झेपावणाऱ्या फांद्या यांची विलक्षण देखणी छत्री. त्या सावलीत मी सुखावते. घराच्या सज्जातून पाहते तेव्हा हाच विस्तार कसबी कारागिराच्या कुशल बोटांनी विणलेल्या नक्षीदार गालिच्यासारखा समोर पसरलेला असतो. मी एकदम श्रीमंत होऊन जाते.

धगधगत्या उन्हाचा ताप सहन करत उभ्या गुलमोहराच्या कमानीखालून जाताना त्याला विचारते, ‘हे असं अंगभर फुलण्याचं वेड तुला का लागलं? कोणासाठी तू असा पिसाटापरि फुलत असतोस? मादागास्करमधली मुळं उपटून इथं तिथं रुजताना तुला काहीच अडचण नाही आली? समुद्रसपाटीपासून डोंगराळ भागापर्यंत कुठेही इतक्‍या सहजपणे कसा काय रुजू शकतोस? कुठल्याही मातीत सहज रुजण्याचा, बदलत्या वातावरणाशी एकरूप होण्याचा हा गुण तू आम्हा बायकांकडून घेतलायंस की आम्ही तुझ्याकडून? मुळं खोलवर जात नसल्यानं वारा-वादळात सहज उन्मळून पडतोस. मग उन्हाचा तडाख़ा कसा सहन करतोस, पाणी कसा मिळवतोस?’ तो अबोल चवऱ्या ढाळीत राहतो. पांढऱ्या पिवळ्या रेषांची नक्षी चितारलेली लाल-केशरी पाकळी वाऱ्यावर हेलकावत अलगद खाली येते, पायघड्यांसम पसरलेल्या इतर पाकळ्यांमध्ये मिसळून जाते. अशा फुललेल्या गुलमोहरांखाली अमेरिकेतल्या मायामित ‘गुलमोहर फेस्टिव्हल’ होतो, तसा १ मे दिवशी आपल्याकडं साताऱ्यातही होतो. तिथल्या पोवई नाक्‍याजवळच्या ‘गुलमोहर रस्त्या’वर गुलमोहरप्रेमी एकत्रित येतात आणि साहित्य, चित्र, नृत्य, संगीतादी कलांमध्ये रमतात, असं ऐकून आहे. पण वाटलं की हा गुलमोहर आपल्या मनात कायमच वस्तीला आहे. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर त्यानं सोबत केलीय. त्याच्या शेंगा कधी खुळखुळा बनून, तर कधी तलवार म्हणून बालपणीच्या खेळांत रंगत आणायच्या. फुलांमधली पांढरी पाकळी कधी कोंबडा, तर कधी राजा म्हणून मटकावत त्याच्याच गर्द सावलीत लंगडी, सूरपाट्या खेळताना उन्हाचा कहर जाणवलाच नाही. तारुण्यात मनाचा हिंदोळा झुलवत लालभडक फुलांनी तो अंगोपांगी उत्कट डवरला. आणि आता, ‘पानगळीनं सैरभैर होऊ नकोस, वसंताच्या स्वागतास सिद्ध हो!’ हा त्याच्या लाल लिपीतला संदेश मला जगण्याचं बळ देतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT