sunita tarapure 
संपादकीय

क्षणभेटीचा आनंद

सुनीता तारापुरे

सध्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघ मस्त खेळतोय. रविवारी ऑस्ट्रेलियाला लोळवल्यानंतर दिसेल त्याला चॉकलेट देत सुटले. माझ्या आनंदाचं कारण सांगितल्यावर ‘काय हा पोरकटपणा’ पासून..‘म्हणजे काही विश्वकरंडक नाही पटकावला, दिल्ली अभी बहुत दूर है...’ पर्यंतचे शेरे ऐकावे लागले. वाटलं, आपलं सगळं लक्ष नेहमी अंतिम परिणामाकडेच का असतं? तो मनाजोगता असला तर आणि तरच आनंद व्यक्त करायचा असा नियम आहे काय? तिथवरच्या वाटचालीतही आनंदाची बरसात करणारे अनेक क्षण असतात. ते अनुभवायचे नाहीत? गिरिभ्रमणाच्या छंदानं एक धडा दिलाय, जो मला कायम मार्गदर्शक ठरतो. अमुक एका पर्वतमाथ्यावर पोचायचं आहे. ठीक आहे. मात्र तिथे काही अनमोल खजिना दडलेला असतो, तिथे पोचताच तो आपल्याला गवसतो आणि त्यामुळं अपार आनंद होतो, असं मुळीच नसतं. उलट तिथे जाण्यासाठी उचललेल्या प्रत्येक पावलागणिक छोटे-मोठे अनुभव येत असतात. काही सुखावतात. काही दुखावतात. त्या अनुभवांना कडकडून भिडणं महत्त्वाचं. क्वचित काही कारणानं शिखर गाठता नाही आलं, तरी आपली अनुभवांची पोतडी तट्ट फुगलेली असते. याउलट, डोंगरमाथ्याकडेच नजर लावून तो गाठण्याच्या घाईत पावलापावलांवर विखुरलेल्या अनुभवांशी गळाभेट राहून जाते. छोटे-मोठे सुख-दु:खाचे क्षण हातून निसटतात. कित्येकदा लक्ष्य गाठण्याचाच इतका ताण येतो, की प्रत्यक्षात तो प्राप्त झाल्याचा आनंदही आपण गमावून बसतो. ‘गाठलं एकदाचं शिखर’ अशी सुस्काऱ्याची भावना दाटते मनात.

चौदा जुलैला विश्वकरंडक कोण्या एका संघाला मिळेल. पण तोवर खेळल्या जाणाऱ्या हरेक सामन्यातल्या रोमांचक क्षणांनी हर्षभरित व्हायला, तो इतरांबरोबर वाटून घ्यायला काय हरकत आहे. रोहित-शिखरच्या शतकांनी जेवढा आनंद दिला, तेवढाच आनंद वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांचा तोफखाना ऑस्ट्रेलियाविरुद्ध धडाडताना पाहून झाला. मार्शल, होल्डिंग, गार्नर, ॲम्ब्रोजचा तो सुवर्णकाळ डोळ्यांसमोर साकारला. ते तुफानी चेंडू तेव्हा खेळाडू म्हणून प्रत्यक्ष अनुभवलेल्या समालोचक सुनील गावसकरांपासून ते सामना पाहण्यासाठी उपस्थित चाहत्यांपर्यंत सारे स्मरणरंजनाचा आनंद अनुभवत होते. त्या सामन्यात अखेर ऑस्ट्रेलिया विजयी होऊनही तो थरार उणावला नाही. विश्वकंरडक स्पर्धेत काय किंवा आयुष्यात काय, क्षणाक्षणाला काही ना काही घडत असतं. हर्ष-खेदाचं पारडं हेलकावत असतं. त्या त्या वेळी त्या त्या अनुभवांना कडकडून भेटण्यातच खरी गंमत आहे, नाही?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: भारताच्या पोरीचं वर्ल्ड चॅम्पियन! फायनलमध्ये द. आफ्रिकेला पराभूत करत जिंकला पहिला वर्ल्ड कप

Women’s World Cup Final : २५ वर्षानंतर स्वप्नपूर्ती! भारतीय संघाच्या विजयाचे पाच टर्निंग पॉइंट्स... शफाली, दीप्ती अन् श्री चरणी...

World Cup 2025 Final: शफाली वर्माने मॅच फिरवली! बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही ठरतेय भारताची संकटमोचक, घेतल्या दोन विकेट्स

Women’s World Cup Final : 'वळसा' महागात पडला, अमनजोत कौरच्या डायरेक्ट हिटने 'करेक्ट' कार्यक्रम केला; Video Viral

Deputy CM Eknath Shinde: शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही; कार्तिकी यात्रा सोहळा

SCROLL FOR NEXT