Ukraine
Ukraine  Sakal
संपादकीय

युक्रेनचा होऊ घातलेला ‘अफगाणिस्तान’

सकाळ वृत्तसेवा

अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या चुकीची किंमत युरोप पर्यायाने ‘नाटो’ मोजेल आणि याची परिणती म्हणजे युक्रेनचा ‘अफगाणिस्तान’ होईल.

अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या चुकीची किंमत युरोप पर्यायाने ‘नाटो’ मोजेल आणि याची परिणती म्हणजे युक्रेनचा ‘अफगाणिस्तान’ होईल. अफगाणिस्तानमधून ‘नाटो’ फौजा निघून गेल्या, तसे इथेही ‘नाटो’च्या फौजाही माघार घेतील. दोन तुकड्यात विभागलेला युक्रेन त्याची किंमत मोजेल.

- महेश अष्टेकर

‘अमेरिकेबरोबर मैत्री ही मित्रराष्ट्रांकरता जास्त धोकादायक असते.’ हे विधान आहे खुद्द अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री हेन्री किसिंजर यांचे. या पद्धतीचे अमेरिकेचे वर्तन विशेषत: दुसऱ्या महायुद्धानंतर ७५ वर्षात पाहायला मिळाले आहे. यात एक दोन वर्ष अधली मधली सोडली,तर सतत जगाला युद्धामध्ये गुंतवणे आणि त्यातून आपलाच वरचष्मा कसा राहिल, या दृष्टिकोनातून अमेरिकेचे वर्तन असते.

अमेरिका हा एकमेव असा देश आहे की, हा सर्व जगात सर्व देशांचा जणू शेजारीच आहे असे वर्तन ठेवतो. प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीमध्ये आपले स्थान मध्यवर्ती असलेच पाहिजे, अशा अहंकाराने भारलेले वर्तन घडते आणि त्याला जग आता कंटाळले आहे .

सध्या युक्रेनचे युद्ध सुरू आहे आणि त्याला अफगाणिस्तानच्या युद्धाची पार्श्वभूमी आहे. बायडेन यांनी अफगाणिस्तानमधून सैन्य काढण्याचा निर्णय घेतला. पण दुसरीकडे रशिया-युक्रेन संघर्षात युद्धाचा पर्याय निवडला. हे करताना केवळ तात्कालीक वर्तमानातला किंवा नजीक भविष्यातलाच फायदा तात्पुरत्या स्वरूपातला पाहिला.

त्यात दूरगामी योजना नव्हती. परिणामी युद्ध लांबत गेले. निर्बंधांमुळे अर्थव्यवस्था ढासळून रशियाची जनता पुतीन यांच्याविरुद्ध उभे राहील, हाही अंदाज पूर्ण फसला. याउलट रशियन रुबल वधारला. आर्थिक बाजू भक्कम असल्यामुळे युद्धाच्या शस्त्रसज्जतेत कुठलीही कमी झाली नाही. रशियाने संरक्षणाचा खर्च वाढता ठेवून हे युद्ध चालूच ठेवले. अशा प्रकारच्या युद्धाला युरोप मात्र मानसिकदृष्ट्या तयारही नव्हता.

युक्रेनच्या जनतेची परवड

दिवसेंदिवस हे युद्ध युक्रेनच्या बाजूने कसे चालू ठेवावे, हा मोठा प्रश्न ‘नाटो’ला पडला आहे. ‘नाटो’च्या मर्यादा उघड झाल्या. त्याचा फायदा चीनने घेतला. जेव्हा आक्रमण करायचं असते, त्यावेळेला एकास तीन अशा प्रमाणाची रणनिती अाखली जाते. इथे रशियाने एकास पाच अशा प्रमाणात नियोजनबद्ध प्रशिक्षित सैन्य उतरवले होते.

जेव्हा रशियाचा दिवस असतो त्या वेळेला एक रशियन सैनिक २० युक्रेनी नागरिकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरतो. या सैन्याच्या वातावरणामध्ये युक्रेनची सामान्य जनता फक्त भरडून निघाली आहे. युद्धाला होणारा विरोध झेलेंन्स्की यांनी बळ वापरून मोडून काढला आहे.

झेलेन्स्कींच्या संपत्तीत वाढ

युक्रेनचे सरकार स्वतःचे अपयश, भ्रष्टाचार ही बाब युद्धात लपवून ठेवत आहे. या युद्धात जवळपास २५० ते ३०० अब्ज डॉलरची मदत मिळवली आहे. ती वेगवेगळ्या स्वरुपामध्ये आहे. ती मदत प्रत्यक्ष युद्धामध्ये निम्मी पण युक्रेनसाठी वापरली गेली का?

हा मोठा प्रश्न आहे. दिवसेंदिवस झेलेंन्स्की आणि त्याचे काही मंत्री यांची संपत्ती मात्र वेगाने वाढत आहे. युरोपने नाटोवर गरजेपेक्षा जास्त अवलंबून राहिल्यामुळे संरक्षणसज्जता कमी ठेवली. यामुळे बेसावध असलेले युरोप या युद्धात सापडले. ब्रिटनने जी शस्त्रे पाठवली त्यापैकी निम्म्याहून अधिक वापरण्याच्या लायकीची नव्हती.

साडेतीन लाख नागरिक मृत्युमुखी

युद्ध खेळणारे युक्रेनचे सैन्य हे केव्हाच संपलं आहे. आताचे असणारे सैन्य म्हणजे सामान्य जनता असून त्यांना बळजबरीने पंधरा दिवसाचे प्रशिक्षण देत युद्धात ओढले जात आहे. या उलट रशियाने सैन्यबळात तिपटीने वाढ केली आहे. या जोरावर रशिया केव्हाही सीमेवर उतरू शकतो, अशी व्यवस्था केली आहे.

अप्रशिक्षित सैन्याच्या बळावर युक्रेन रशियाच्या आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या सैन्याचा मुकाबला करु शकत नाही. अमेरिका हवेमध्ये आणि पाण्यावर लढू शकतो हा आजवरचा इतिहास आहे. अमेरिकेने जमिनीवरची लढाई कधीही जिंकली नाही.

कारण ऐशाआरामाची सवय असलेले अमेरिकेचे सैनिक लढू शकत नाहीत. या युद्धात सुमारे साडेतीन लाख युक्रेनचे नागरिक मृत्यूमुखी पडले. दररोज सरासरी एक हजार युक्रेनचे लोक मृत्युमुखी पडत आहेत. याउलट रशियाची मनुष्यहानी तुलनेने कमी झाली आहे.

युरोपची अर्थव्यवस्था दहा वर्ष मागे

या संघर्षामुळे युरोपची अर्थव्यवस्था किमान दहा वर्षे मागे गेली आहे. या युद्धाचे दूरगामी परिणाम युरोप नाटो सदस्य देश, अमेरिका या सर्वांना भोगावे लागणार आहेत. हे युद्ध पुतीन अणुबॉम्ब टाकून संपवतील की काय? अशी भीती जगात आहे.

कदाचित त्यातून तिसरे महायुद्ध सुरू होईल की काय? अशीही धास्ती आहे. बायडेन यांच्या काळात अशा पद्धतीचे बेजबाबदार वर्तन अमेरिकेकडून होत असल्याने अमेरिकेचे नेतृत्व लयाला जात आहे. एकुणातच युक्रेन बेचिराख झालाय व युद्ध चालू राहिले तर अजून होत राहणार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT