संपादकीय

बुडत्याला तरणतंत्राचा आधार

प्रफुल्ल हरिश्‍चंद्र म्हात्रे (लेखक ज्येष्ठ जलतरणपटू व तरणतंत्र

अमेरिकी नौदलाच्या "यू एस नेव्ही सील्स‘ या "मरीन कमांडो‘ पथकाला प्रतिकूल परिस्थितीत पाण्यात तरंगत राहण्याचे हे तंत्र चक्क हातपाय बांधून शिकवले जाते! आपल्यालासुद्धा, अर्थात सुटे राहून, "ड्राउन प्रूफिंग‘चे हे तंत्र सहज शिकता येऊ शकते. बुडत्याचा पाय नेहमीच खोलात जाण्याची परिस्थिती तद्नंतर येणार नाही.

बरोबर सहा महिन्यांपूर्वी महाराष्ट्र सरकारने राज्यातील शैक्षणिक संस्थांना समुद्र व नदीच्या किनारी सहली नेण्यावर सरसकट बंदी घातली. हा निर्णय सरकारला पुण्यातील एका महाविद्यालयातील काही विद्यार्थी रायगड जिल्ह्यातील मुरुडच्या समुद्रात दगावल्यावर घ्यावा लागला. तरीही एकूणच पावसाळ्यात धरणे, धबधबे, तलाव, कालवे, ओढे, नद्या, खाड्या व समुद्रकिनाऱ्यावर "मॉन्सून गेटअवे‘साठी जाणाऱ्यांची शहरी तरुणांची संख्या भरपूर असते. अनेकदा त्या उल्हासात आणि उन्मादात त्यांच्या हे लक्षात येत नाही की मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यात भूतलावरील पाण्याचे रूपही तितकेच रौद्र असते. त्यामुळे कोणत्याही अनोळखी जलाशयात फाजील आत्मविश्वास बाळगून उतरू नये, हा सर्वांत महत्त्वाचा नियम आहे; पण तरीही पोहताना दम लागल्यास किंवा बुडण्याची स्थिती निर्माण झाल्यास स्वतःचा जीव वाचवण्यासाठी "ड्राउन प्रूफिंग‘चे तंत्र आपण आत्मसात करायला काहीच हरकत नाही.

जागतिक आपत्ती निवारण तज्ज्ञांच्या मते बुडण्याचा घटना या एकतर अतिशय थकल्याने किंवा खूप घाबरल्याने घडत असतात. त्यांच्या असे लक्षात आले, की नवशिके असोत वा पट्टीचे पोहणारे; सर्वच जण आपले डोके पाण्याबाहेर ठेवण्यासाठी धडपडत असतात. अर्थात, उर्वरित देह जड असल्यामुळे आणि त्या धडपडीने थकल्यामुळे, ते तसे फार वेळ करू शकत नाहीत. धीर आणि दम दोन्ही संपल्यावर अखेर ती व्यक्ती बुडते. फ्रेड लानो यांनी मधे "जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नोलॉजी‘ इथे या तंत्राचा शोध लावला व स्वतः वीस हजार विद्यार्थ्यांना हे तंत्र शिकवले. पुढे अमेरिकी नौदलाच्या अभ्यासक्रमात याचा अंतर्भाव करण्यात आला तो आजपर्यंत टिकून आहे. "कामासाठी असो वा मजेसाठी, पाण्याशी आपला संपर्क येणार असेल, तर त्याचे त्यासंबंधीचे सुरक्षा नियमसुद्धा समजावून घेतले पाहिजेत. जलाशयांची भीती बाळगण्यापेक्षा त्यांचा आदर करावा,‘ असे त्याचे मार्गदर्शक तत्त्व आहे.

"ड्राउन प्रूफिंग‘चा सोपा शास्त्रीय सिद्धांत असा आहे की, हाडे बुडतात आणि मांस तरंगते. माणसाच्या शरीरात द्रवरूपी व वायुरूपी अनेक घटक असतात, आणि म्हणूनच आपल्यापैकी बहुतेक जण (विशेषतः स्त्रिया) मूलतः "फ्लोटर्स‘ आहेत. तेव्हा सर्वांत पहिल्यांदा, पाण्यात सरळ उभे राहण्याचा हळूवार प्रयत्न करत डोके पाण्याच्या वर ठेवावे. या कृतीसाठी हलकेच पायांचा व हातांचा उपयोग करावा. एखाद्या टेबलावर किंवा कठड्यावर चढण्यासाठी आपण जसे सुरवातीला दोन्ही हात दाबतो व टाचा उंचावतो, तशी अधांतरी कृती करावी. या दरम्यान कोणताही आटापिटा करू नये. पुरेसा श्वास घेतल्यावर अंग शिथिल सोडून श्वास रोखून पाण्यामध्ये डोके न्यावे व काही सेकंदांनी पुन्हा श्वास घेण्यासाठी वर सांगितल्याप्रमाणे डोके पाण्यावर काढावे. एका मिनिटात ही कृती साधारण पाच ते सात वेळा करता येते. आपली ऊर्जा व जीव फुफ्फुसातील हवेच्या मात्रेवर अवलंबून असते, हे लक्षात असूद्यात.
कमीतकमी श्रम करून जास्तीत जास्त वेळ (निदान आपल्यापर्यंत मदत पोचेपर्यंत) "ड्राउन प्रूफिंग‘च्या साह्याने आपण तरंगू शकतो. हे तंत्र आपल्याला अल्पावधीत, अगदी स्वतःहूनही शिकता येते व त्याचा सराव आपण आपल्या माहितीच्या तरणतलावात किंवा घरच्या विहिरीतही करू शकतो. अर्थात, अशा वेळी, किमान सुरवातीला, आपल्यासोबत एखादी व्यवस्थित पोहता येणारी व्यक्ती असणे आवश्‍यक आहे. यासाठी कोणत्याही विशेष सोयी किंवा सहायक उपकरणे लागत नाहीत. आपत्कालीन परिस्थितीत जीवरक्षक व साहाय्य नौका यायला काही अवधी जावा लागतो. अनेकदा पाण्यात अडकलेल्या व्यक्तींना धडपड करून पायात पेटके (क्रॅम्प) येतात किंवा दगडावर आपटून ते जखमी होतात आणि त्यामुळे अधिकच जायबंदी होतात. सुरवातीलाच योग्य त्या स्वप्रशिक्षणाने आपण आपला जीव वाचवू शकतो. शक्‍य झाले तर इतरांनासुद्धा या अत्यंत सोप्या तंत्राची माहिती देऊ शकतो.

"ड्राउन प्रूफिंग‘चे फायदे
बुडल्यावर आपल्या फुफ्फुसांमध्ये पाणी शिरले, तर मिनिटांत माणूस दगावतो. "ड्राउन प्रूफिंग‘मुळे आपल्यापर्यंत बचावकार्य पोचण्यास बराच अवधी मिळतो.
. पोहण्याबरोबर "ड्राउन प्रूफिंग‘चे प्रशिक्षण दिले तर पाण्याबद्दल वाटणारी भीती मुळातच कमी होते आणि पोहणे शिकण्यातला पहिला महत्त्वाचा अडथळा लवकर दूर होतो.
. "ड्राउन प्रूफिंग‘ शिकल्यावर "ऍक्वा एरोबिक्‍स‘ (पाण्यातील शरीर आसने) हा व्यायामप्रकार सहज शिकता येतो. सांधे व स्नायू बळकट करण्यासाठीचा हा सर्वोत्तम उपाय आहे.
"ड्राउन प्रूफिंग‘च्या मर्यादा
. पाण्याखाली खोल अडकून पडल्यावर हे तंत्र अवलंबता येत नाही.
. पाण्यात पडल्यावर गंभीर जखमी झाल्यास ही क्रिया करता येत नाही.
. गंभीर प्रकारचे श्वसनविकार असणाऱ्या व्यक्तीस ही क्रिया अवघड वाटू शकते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT