सन्मान तमाशाकलेतील तपस्येचा sakal
संपादकीय

सन्मान तमाशाकलेतील तपस्येचा

महाराष्ट्र सरकारचा २०२३ चा प्रतिष्ठेचा ‘विठाबाई नारायणगांवकर जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ तमाशा कलावंत शशिकला सुक्रे यांना जाहीर झाला असून, त्यानिमित्त त्यांच्या कलाजीवनावर आधारित लेख.

सकाळ वृत्तसेवा

महाराष्ट्र सरकारचा २०२३ चा प्रतिष्ठेचा ‘विठाबाई नारायणगांवकर जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ तमाशा कलावंत शशिकला सुक्रे यांना जाहीर झाला असून, त्यानिमित्त त्यांच्या कलाजीवनावर आधारित लेख.

अर्जुन शिंदे

बेल्हे (ता. जुन्नर) येथे गेल्या सन १९८१ पासून स्थायिक असलेल्या ज्येष्ठ तमाशा कलावंत शशिकला सुक्रे (वय ७४) यांना राज्य सरकारचा २०२३ चा ‘विठाबाई नारायणगांवकर जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. लोककला क्षेत्रातील हा सर्वोच्च पुरस्कार असून, दहा लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह, मानपत्र, असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

सुक्रे यांचे सासरचे गाव खडकवाडी (ता. आंबेगाव) आहे. शामानगर (जि. सोलापूर) हे जन्मगाव आहे. त्यांचे वडील नागनाथ जाधव हे पंढरपूरमध्ये एस.टी. महामंडळात ‘आगार रोखपाल’ म्हणून कार्यरत होते. पत्नी, चार मुली व तीन मुलगे असे मोठे कुटूंब सांभाळत असत. एक दिवस अगदी क्षुल्लक कारणासाठी त्यांना कामावरून काढण्यात आले. त्यांचा संसार उघड्यावर आला. त्यांना पंढरपुर सोडून सोलापूरला उदरनिर्वाहासाठी कुटुंबासकट यावे लागले. पडेल ते काम करून ते कुटुंबाचे पालनपोषण करत होते. त्यांच्या सात अपत्यांपैकी ‘शशिकला’ त्यांची मोठी मुलगी. त्यावेळी पंढरपुरमध्ये कवठेकर हायस्कूलमध्ये इयत्ता सातवीमध्ये शिकत होती. सोलापुरला आल्यानंतर आर्थिक परिस्थिती बेताची असूनही शिक्षणाची आवड तिला स्वस्थ बसू देत नव्हती. सोलापुरातीलच छत्रपती शिवाजी विद्यालयात तिने आठवीला प्रवेश घेतला. शिक्षणाच्या खर्चासाठी तिला धुणीभांडी करावी लागत होती. हलाखीच्या परिस्थितीवर मात करून त्यांनी जुनी ११वी पर्यंत शिक्षण घेतले.

शालेय जीवनात स्नेहसंमेलनात भाग घेत असताना अभिनयाचे बाळकडू मिळाले. सोलापुरातील एका नाट्यसंस्थेकडून नाटकात काम करण्याविषयी विचारणा झाल्याने त्यांना संधी मिळाली. शशिकला यांना रोजगाराची गरज होतीच. अभिनयाची आवड असल्याने, आईवडिलांची परवानगी घेऊन त्यांनी नाटकामध्ये काम करण्यास सुरुवात केली. १९७३च्या दरम्यान एकदा सोलापुरात ‘तीन तेरा, नऊ बारा’ या नाटकाचा प्रयोग चालू असताना, काळू-बाळू कवलापूरकर या महाराष्ट्रातील आघाडीच्या तमाशा फडाचे कॉन्ट्रॅक्टर रमेश बत्तूल नाटकाचा प्रयोग पाहायला आले होते. त्यांनी शशिकला यांचा अभिनय पाहून, त्यांना तमाशातील वगनाट्यात काम करण्याविषयी सुचवले. अभिनयाची आवड, घरची नाजूक आर्थिक परिस्थिती असल्याने काळू-बाळू सारख्या नामांकीत तमाशा फडामध्ये काम करण्याची त्यांनीही तयारी दर्शवली. पण नाचणे शक्य नसल्याने ‘मी पायात चाळ बांधणार नाही,’ ही त्यांची अट होती. शशिकलाबाईंच्या अभिनयक्षमतेवर विश्वास ठेऊन सन १९७३ मध्ये त्यांना २५० (अडीचशे) रुपये मासिक वेतन (मानधन) देण्याची तयारी दर्शवली.

काळू-बाळू यांच्याकडे काम करताना त्यांचा अभिनय पाहून सन १९७५ मध्ये ‘वगसम्राट चंद्रकांत ढवळपुरीकरसह संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर’ या तमाशा फडाचे व्यवस्थापक झुंबरशेठ सुक्रे यांनी त्यांना सदर फडात काम करण्याची विनंती केली. सात वर्षे त्यांनी तमाशा फडात काम केले. सन १९७६ मध्ये फडव्यवस्थापक झुंबरशेठ सुक्रे यांच्यासमवेत शशिकला यांनी नोंदणीपद्धतीने विवाह केला. त्यानंतर शशिकला सुक्रे म्हणून तमाशात काम केले.वगनाट्यात अभिनय करून शशिकलाबाईंनी महाराष्ट्रातील तमाशाला सुवर्णकाळ दाखवण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे. या फडाचे केंद्र बेल्हे (ता. जुन्नर) हे असल्याने, सन १९८१ पासून त्या बेल्हे येथे स्थायिक झाल्या.

‘भक्त पुंडलिक’, ‘संत तुकाराम’, ‘गवळ्याची रंभा’ यांसारख्या वगनाट्यांनी त्या काळात रसिक प्रेक्षकांच्या मनावर गारूड केले होते. त्या काळात मनोरंजनाची इतर साधने कमी असल्याने तमाशाकलेला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Latest Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

Mumbai Railway Station: स्थानकांवरील कामे तत्काळ पूर्ण करा, शिंदेसेना खासदारांचा रेल्वेला आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT