Samruddhi Mahamarg Accident esakal
Nagpur_old

Samruddhi Mahamarg Accident: 'अम्मी जा रही हू' जोयाचे शब्द ठरले शेवटचे

Buldhana Accident : मध्यरात्री दीड वाजता झालेल्या अपघातात जोया उर्फ गुडीया जमालुद्दीन शेख (वय २७) हिचा मृत्यू झाला. जाताना तिने म्हटलेले शब्द अखेरचे ठरले.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Accident News : संपूर्ण घर सांभाळून ती नोकरी करायची. कुटुंबाचे अर्थचक्रच तिच्यावर होते. शुक्रवारी दुपारी जेव्हा पुण्याला इव्हेंटच्या कामासाठी ती घरातून जायला निघाली, तेव्हा निघताना तिने आई हुस्‍नारा बेगम हिला ‘अम्मी जा रही हू’ असे म्हटले.

मात्र, नियतीने घात केला. मध्यरात्री दीड वाजता झालेल्या अपघातात जोया उर्फ गुडीया जमालुद्दीन शेख (वय २७) हिचा मृत्यू झाला. जाताना तिने म्हटलेले शब्द अखेरचे ठरले.

ताजबाग येथील निराला सोसायटीजवळ असलेल्या प्यारेखान यांच्या घरी भाड्याने हुस्‍नारा बेगम आपल्या तीन मुलांसह राहतात. त्यात मोठा मुलगा अजहरुद्दीन शेख (वय ३१), जोया उर्फ गुडीया आणि जाकीरुद्दीन (वय २४) या भावाबहिणीचा समावेश आहे. वडिलांचा आठ वर्षांपूर्वी मृत्यू झाला.

वडिलांचे छत्र हरपल्याने तिन्ही मुलांचे शिक्षण सुटले. त्यातल्या त्यात जोया ही बारावीपर्यंत शिकली. त्याचा फायदा घेत, तिने इव्हेंट कंपनीत नोकरी सुरू केली. मोठा भाऊ हा डिश-टीव्हीचे काम करीत असून लहान भाऊ टाईल्सच्या ठेकेदारासोबत मजुराचे काम करतो.

त्यामुळे घरच्या किराण्यापासून तर आई आणि भावांच्या कपड्यापर्यंतची जबाबदारी तिचीच होती. प्रत्येकवेळी इव्हेंटसाठी ती वेगवेगळ्या ठिकाणी फिरायची. दहा दिवसांपूर्वी ती उत्तरप्रदेशातून इव्हेंटचे काम करून घरी परतली होती. त्यानंतर काल तिला पुण्यात इव्हेंटच्या कामासाठी जायचे होते.

त्यासाठी तिने आदल्या दिवशी तयारी केली. शुक्रवारी (ता.३०) नमाज अदा केल्यानंतर, ‘अम्मी जा रही हू’ असे म्हणत, तिने दुपारी तीन वाजता दोन्ही भावासह बैद्यनाथ चौक गाठले. तिथे विदर्भ ट्रॅव्हल्सच्या गाडीचे तिकीट घेत पुण्याचा प्रवास सुरू केला.

शनिवारी सकाळी मोठ्या भावाच्या मुलगा सुलतान याने तिच्याबद्दल माहिती देताच, कुटुंबातील सदस्यांना जबर धक्का बसला.

अख्ख्या परिवारावर शोककळा पसरली. तिच्या मृत्यूच्या धक्क्याने लहान भावाचा आधार तर मोठ्या भावाची ‘गुडीया’ या जगात नव्हती. दुसरीकडे अझरुद्दीनही बुलढाण्याच्या दिशेने निघाला होता.

ईदी न देताच गेली दिदी

ईद मोठा सण असल्याने या सणाच्या निमित्ताने घरातील छोट्यांना ‘ईदी’ देत, शुभेच्छा दिल्या जातात.

जोयापेक्षा वयाने लहान असलेला जाकीरुद्दीन तिच्या आठवणी सांगताना गहिवरला होता. बहिण या जगात नाही, हे त्याला कळल्यावर `आता ईदी कोण देणार यावेळी ईदी न देताच, जोया निघून गेली`, असे म्हणत तो हुंदके देत होता`. विशेष म्हणजे, आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने शेख कुटुंब हलाखीचे जीवन जगत होते.

दहा दिवसांपूर्वी जोया इव्हेंटवरुन घरी आली. मात्र, तिलाही पैसे मिळाले नसल्याने घरात २९ तारखेला ईद हा सण साजरा करता आला नाही.

पोलिसांचीही दमछाक

जोया हिच्या आधार कार्डवर पांढराबोडी येथील पत्ता असल्याने अंबाझरी पोलिस शोध घेत, तिच्या घरी पोहचले. मात्र, जोया आणि त्यांचे कुटुंब दहा वर्षांपूर्वीच, ताजबाग परिसरातील निराला सोसायटीतील पेट्रोलपंपाजवळ भाड्याने राहण्यास गेल्याचे कळले. यातून सक्करदरा पोलिसांनी माहिती दिल्यावर त्यांनी घराचा शोध घेत, कुटुंबियांना माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

SCROLL FOR NEXT