Horoscope and Astrology
Horoscope and Astrology Sakal
सप्तरंग

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 13 जून 2021

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

रविवार : ज्येष्ठ शुद्ध ३, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन/कर्क, चंद्रोदय सकाळी ८.०९, चंद्रास्त रात्री ९.४८, सूर्योदय ५.५८, सूर्यास्त ७.१०, रंभाव्रत, भारतीय सौर ज्येष्ठ २३ शके १९४३.

दिनविशेष -

१९६९ : अष्टपैलू साहित्यिक, विडंबनकार, शिक्षणतज्ज्ञ, चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक, पत्रकार, आमदार, वक्ते अशा अनेक अंगांनी प्रसिद्ध असलेले आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचे निधन. त्यांच्या ‘श्‍यामची आई’ चित्रपटास राष्ट्रपतींचे सुवर्णपदक व ‘महात्मा फुले’ चित्रपटास रौप्यपदक मिळाले. ‘कऱ्हेचे पाणी’ या पाच खंडांतील आत्मचरित्रात त्यांनी आपली जीवनकथा सांगितली आहे.

१९९४ : ग्रंथालय प्रसार चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि पुण्यातील सिद्धार्थ ग्रंथालयाचे संस्थापक गणपतराव पवार यांचे निधन.

१९९५ : भारत आणि फ्रान्स यांच्यात गुंतवणूक सुरक्षिततेचा करार.

२००३ : वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आशिया खंडातील सर्वांत मोठ्या बाजार संकुलाची उभारणी केल्याबद्दल सिडकोला ‘नगर नियोजन आणि आराखडा प्रकल्प अंमलबजावणी’ या संवर्गाअंतर्गत पंतप्रधानांचा द्वितीय पुरस्कार जाहीर.

दिनमान -

मेष : उत्साह, उमेद वाढेल. तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभेल.

वृषभ : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. आर्थिक लाभ होतील.

मिथुन : महत्त्वाची कामे पार पडतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे.

कर्क : महत्त्वाची कामे दुपारनंतर पार पडतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

सिंह : नवीन परिचय होतील. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

कन्या : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

तूळ : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. सार्वजनिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

वृश्‍चिक : महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. वाहने सावकाश चालवावीत.

धनू : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मकर : मनोरंजनाकडे कल राहील. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल.

कुंभ : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी करावीत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मीन : गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. संततिसौख्य लाभेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT