Horoscope and Astrology Sakal
सप्तरंग

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 15 ऑगस्ट 2021

पंचांग - रविवार : श्रावण शुद्ध ७, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी तूळ/वृश्चिक, चंद्रोदय दुपारी १२.२४, चंद्रास्त रात्री १२.०३, सूर्योदय ६.१७, सूर्यास्त ७.००, भानुसप्तमी, स्वातंत्र्य दिन, आदित्य पूजन, गभस्ती सूर्य मौन पूजन, भद्रा, भारतीय सौर श्रावण २४ शके १९४३.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

रविवार : श्रावण शुद्ध ७, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी तूळ/वृश्चिक, चंद्रोदय दुपारी १२.२४, चंद्रास्त रात्री १२.०३, सूर्योदय ६.१७, सूर्यास्त ७.००, भानुसप्तमी, स्वातंत्र्य दिन, आदित्य पूजन, गभस्ती सूर्य मौन पूजन, भद्रा, भारतीय सौर श्रावण २४ शके १९४३.

दिनविशेष -

१७६९ - फ्रान्समधील पराक्रमी वीरपुरुष नेपोलियन बोनापार्ट यांचा जन्म.

१८६७ - मराठी रंगभूमीवरील गेल्या शतकातील नामवंत नट गणपतराव जोशी यांचा जन्म. त्यांची हॅम्लेटची भूमिका अतिशय गाजली होती.

१८७२ - आधुनिक भारतातील प्रख्यात तत्त्वचिंतक, क्रांतिकारक, योगी व कवी अरविंद घोष यांचा जन्म. ग्रीक, लॅटिन, इंग्रजी या भाषांवर त्यांचे असामान्य प्रभुत्व होते. फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश, इटालियन या भाषाही ते शिकले. बंगालमधील क्रांतिकारक चळवळीचे ते एक प्रवर्तक होते. ‘सावित्री’ हे त्यांचे आध्यात्मिक स्वरूपाचे इंग्रजी महाकाव्य, हा त्यांच्या प्रतिभेचा मनोज्ञ आविष्कार आहे.

१८८६ - एकोणिसाव्या शतकातील विख्यात सत्पुरुष रामकृष्ण परमहंस यांचे निर्वाण. त्यांचे पूर्ण नाव गदाधर क्षुदिराम चटर्जी. स्वामी विवेकानंद हे रामकृष्णांचे शिष्य होत. रामकृष्णांचे भक्तगणांशी तासन्‌तास चालणारे संवाद महेंद्रनाथ गुप्ता यांनी ‘एम’ या टोपणनावाने ‘रामकृष्ण कथामृत’ या ग्रंथात संकलित केले आहेत. त्या ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद स्वामी निखिलानंदांनी ‘द गॉस्पेल ऑफ श्री रामकृष्ण’ या नावाने केला आहे.

१९१२ - पॅसिफिक व अटलांटिक महासागर जोडणारा पनामा कालवा सुरू झाला.

१९४७ - ब्रिटिश राजवट संपून ‘भारत’ स्वतंत्र झाला. देशाची फाळणी झाली. पश्‍चिम पंजाब, सिंध, बलुचिस्तान, वायव्य सरहद्द प्रांत, पूर्व बंगाल हे पाकिस्तानात समाविष्ट झालेले प्रदेश वगळता देशाचा उर्वरित प्रदेश (संस्थाने वगळून) स्वतंत्र भारत म्हणून अस्तित्वात आला. पंडित जवाहरलाल नेहरू स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले.

दिनमान -

मेष : भागीदारी व्यवसायातील निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत. हितशत्रुंवर मात कराल.

वृषभ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

मिथुन : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

कर्क : जिद्दीने कार्यरत राहाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

सिंह : आर्थिक लाभ होतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.

कन्या : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.

तुळ : एखादी जबाबदारी येवून पडेल. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

वृश्‍चिक : अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास.

धनु : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. नोकरीत समाधानकारक स्थिती.

मकर : हाती घेतलेल्या कामात सुयश. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

कुंभ : जिद्दीने कार्यरत राहाल. वाहने सावकाश चालवा.

मीन : खर्चाचे प्रमाण वाढेल. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs MI Live: तिलक वर्माची विकेट अन् रोहित शर्मा संतापला; मुंबई इंडियन्स कसेबसे सन्मानजनक धावांपर्यंत पोहोचले Video Viral

संकटाचा काळ! वर्षभर परदेशगमन, सोनं खरेदी करू नका; खाद्यतेलही कमी खा, मोदींनी असं आवाहन का केलं?

Iran-US War: चर्चा म्हणजे शरणागती नाही... अमेरिकेविरोधात इराणचा आक्रमक सूर, दोन्ही देशांमधला संघर्ष अधिक तीव्र?

इंधन गरजेनुसार वापरा, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; देशहितासाठी PM मोदींचं आवाहन

RCB vs MI Live: भुवनेश्वर कुमारचा दरारा... रोहित शर्मा, सूर्याला दोन चेंडूंत गुंडाळले; पर्पल कॅप नावावर अन् मोठा विक्रम Video

SCROLL FOR NEXT