Brand Sakal
सप्तरंग

दुनियादारी : ब्रँड्या

‘नाही नाही हे नको. स्वस्तात मस्त टाईप्स हवंय काहीतरी अगं.’

आदित्य महाजन

‘नाही नाही हे नको. स्वस्तात मस्त टाईप्स हवंय काहीतरी अगं.’

‘‘कधी सुधारणार रे तू. कधीतरी जरा चांगल्या गोष्टी घेत जा.’’

‘‘कोण म्हटलं मी चांगले नाही वापरत ते?’’

‘‘चांगले म्हणजे चांगल्या ब्रँडचे. ट्रेंडी. सॉफिस्टिकेटेड. तू आपलं नेहमी लोकलच काहीतरी बघत असतोस.’’

‘‘काय पडलंय त्या ब्रँड्समध्ये इतकं?’’

‘‘क्वालिटी. रुबाबदारपणा. आणि चांगलं जगण्याचा स्वाभिमान.’’

‘‘मला तर हे सगळे ब्रँड्स म्हणजे नुसती लुटालुटच वाटते.’’

‘‘अरे, कसलाएस तू? स्वतःच्या कामाला तरी न्याय दे. तू स्वतः जाहिराती आणि ब्रॅण्डिंग क्षेत्रात काम करतोस, तरी तुझं हे मत?’’ निहारिका दोघं मोबाईलवर बघत असेलल्या शॉपिंग आणि गिफ्टींग वेबसाइट्स बंद करून सुरेशला म्हणाली. शहरातल्या सगळ्यात लोकप्रिय शॉपिंग स्ट्रीटवरच्या एका फुटपाथ जवळील कट्ट्यावर तिच्या शेजारी बसलेला सुरेश नुसता खुदकन छान हसला.

‘‘मी जाहिरात इंडस्ट्रीमध्ये काम करतो ना, म्हणूनच मला ह्या ब्रँड्स बद्दल अप्रूप नाहीये. मला माहितीये, की वस्तूची किंमत खूप कमी आहे आणि त्यावरच्या जाहिराती आणि ब्रॅण्डिंगचा खर्च लावून ते आपल्याला ती विकत आहेत. आतमध्ये बरेच प्रॉब्लेम आहेत, बराच माल खपत नाहीये म्हणून हे सगळे वेगवेगळे ब्रॅण्डिंगचे फंडे लावून आपल्याला बरंच काही विकलं जातंय हे दाखवून, की तुम्ही हे नाही घेतलं तर तुमच्या जगण्याला काही अर्थच नाही!’’ सुरेश म्हणाला.

‘‘सगळं मान्य आहे, पण काहीतरी चांगलं घेतल्यानं किंवा वापरल्यानं आपल्याला चांगलंच वाटणारे.’’

‘‘असं काही नाही. २१० रुपयांची कॉफी आणि ३०००चं घड्याळ नसलं तरी आयुष्य सुंदरच आहे. आणि ८०,००० रुपयांचा फोन आहे म्हणजेच जगण्यात खुशाली आहे असं तर अजिबात नाही.’’

‘‘अरे तू काय पाठ्यपुस्तकातल्या गरीब सामान्य माणसासारखा काहीतरी बोलतो आहेस? आहे पैसा तर तो खर्च करावा ना. ते पण एक मेंटल पिस असतं.’’ निहारिका पुन्हा शॉपिंग वेबसाइट उघडून त्यात डोकं घालत म्हणाली.

‘‘माझं मेंटल पिस दर आठवड्याला सिनेमा-नाटक बघण्यात आहे. त्यातल्या दर्जेदारपणावर मी खर्च करतो. माझ्यासाठी हे आहे ब्रँडेड जगणं.’’

‘‘पण तरी मी सांगतीये, की काही गोष्टी कधी कधी ब्रँडेड असाव्यात.’’

‘‘एक्झॅक्टली! काहीच गोष्टी असाव्यात. सतत सगळ्या नाही. मी कार, टीव्ही, फ्रिज घेताना ब्रँडचा विचार करणारच पण रोजचा घालायचा टी-शर्ट, घरातल्या स्लीपर्स, जेवण्याचा डबा आणि हाफ पँटसाठी सुद्धा ब्रँडचा विचार करणं मला नाही पॉसिबल. हे बघ, मला इतरांसारखं ‘ब्रँड्या’ नाही बनायचं...’’

‘‘काय नाही बनायचं? ब्रँड्या??’’

‘‘हां म्हणजे सारखं सगळं ब्रँड बघूनच घेणारा किंवा ब्रँड्सला एक प्रकारे ॲडिक्ट झालेला.’’

‘‘पण म्हणून त्यांना ब्रँड्या म्हणशील का? कमाल आहेस! तुमच्या जाहिराती लिखाणातला शब्द दिसतोय हा,’’ निहारिका हसत हसत म्हणाली.

‘‘बाकीचे ब्रँड्या आणि तू कोण? निरागस बंड्या?’’ ती हसता हसता सुरेशचे गाल ओढत म्हणाली. सुरेशही त्यावर गोड हसला.

‘‘तुला माहितीये... तुझ्यासारखा विचार करणारी लोकं खूप कमी उरली आहेत. दुर्लभ जातीचे आहात तुम्ही,’’ ती पुढं म्हणाली.

‘‘हो पण आम्ही तेवढ्याच इझिली जुन्या विचारांचे आणि प्रगतीला विरोध करणारे म्हणून जज सुद्धा केले जातो. ब्रँडेड फॅशन जशी सहज आउटडेटेड होते तशी...’’

‘‘नाही रे... साधं असणं कधीच आउटडेटेड नाही होणार... ते कितीही जग बदललं तरी मनात छान कोपरा करतंच.’’

निहारिका मोबाईल बंद करून सुरेशच्या हातामागून तिचा हात घालते आणि तसंच कट्ट्यावर बसल्या बसल्या त्याच्या खांद्यावर डोकं ठेऊन समोरची गर्दी आणि गाड्या, उतरलेल्या संध्याकाळी शांतपणे बघत बसते. नकळत ती डोळे मिटते आणि दिवसभराच्या दगदगीमुळं तिला कधी तिचा डोळा लागतो हेच कळत नाही.

गुबगुबीत गादीशिवाय आणि कुठल्याही एसीशिवाय लागलेली एक नॉन ब्रँडेड, पण सगळ्यात सुंदर झोप. खूपदा समोरच्याचा साधेपणा ओळखणं हीच खरी श्रीमंतीची लक्षणं होय. समजलं का रे ब्रँड्या?

mahajanadi333@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: मुंबईत बेशिस्तपणा वाढला... राज ठाकरेंनी का घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट? सादर केला मुंबईचा विकास आराखडा

Gadchiroli Flood: पूरग्रस्त गडचिरोलीत हाहाकार; मुख्याध्यापकाचा पुराच्या पाण्यात मृत्यू

Temghar Dam : टेमघर धरणग्रस्तांना दोन महिन्यांत मोबदला; न्यायालयाच्या आदेशानंतरही शेतकऱ्यांना दोन वर्षांपासून प्रतीक्षा

Mother Daughter Drown : दुर्दैव! मुलीला बुडताना पाहून आई वाचवायला गेली अन् दोघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्याची वेळ

Birla Group: कुमार मंगलम बिर्ला स्वस्तात शेअर्स का विकत आहेत? एका वर्षापूर्वीच खरेदी केली होती कंपनी

SCROLL FOR NEXT