Cat Sakal
सप्तरंग

दुनियादारी : मांजरप्रेमी महामंडळ प्रा.लि.

‘शी अरे... असं कसं करू शकतात हे? लॉजिकच नाहीये ह्या नियमाला!’ पेपरातली बातमी वाचून सुश्रुत चिडून म्हणाला.

आदित्य महाजन

‘शी अरे... असं कसं करू शकतात हे? लॉजिकच नाहीये ह्या नियमाला!’ पेपरातली बातमी वाचून सुश्रुत चिडून म्हणाला.

‘शी अरे... असं कसं करू शकतात हे? लॉजिकच नाहीये ह्या नियमाला!’ पेपरातली बातमी वाचून सुश्रुत चिडून म्हणाला.

‘काय झालं तुला?’ रश्मीनं विचारलं.

‘अगं हे बघ, ह्यांनी आता मांजर पाळायला पण त्यांचं रजिस्ट्रेशन वगैरे कंपल्सरी केलंय. काही अर्थ आहे का ह्याला?’

‘का? त्यात काय इतकं? काय असं चुकलंय ह्या नियमात?’ रश्मी एक्स्प्रेशन-लेस चेहऱ्यानं स्पष्ट म्हणाली.

‘सगळंच!’’

‘कसं?’’

‘एकतर मांजर असा प्राणी नाहीये की तो फक्त एकच घरात राहतो. मांजर पाळली तर ती आजूबाजूच्या ५-६ घरांत राहते. मग त्या मांजरीचं रजिस्ट्रेशन कोणी करायचं नक्की? ह्यानं का त्यानं? दुसरी गोष्ट, मांजरी त्यांच्या राहण्याच्या जागा तिथं आजू-बाजू असलेल्या मांजरांमुळं आणि इतर कारणांमुळं बदलत राहतात. त्यांना गळ्यात पट्टा लावून कुत्र्यासारखं नाही पाळता येत.’’

‘काहीही... माझ्या एका मैत्रिणीकडं आहे एक मांजर, तिला ते पट्टा लावून घरातच ठेवतात!’

‘त्या तशा पर्शियन मांजरी पाळल्या जातात, पण मुळात मांजरांना असं पाळायचं नसतं. त्यांची काळजी त्यांना घेता येते आणि त्या घरात येऊन जाऊन राहतात, हेच मांजर पळायचं सुख असतं. ह्या नियमानं सगळे बळंबळं मांजरांना गळ्यात पट्टे बांधून घरात ठेवतील.’’ सुश्रुत खूप पोटतिडकीनं रश्मीला समजावत होता.

‘हे ना तू सगळं बोलत आहेस कारण तू मांजरप्रेमी आहेस. बाकी काही नाही... आणि सध्या तर तुझ्याकडं काहीच मांजरी नाहीयेत, मग कशाला इतका लोड घेतोस? सोड ना...’ रश्मीनं मुद्दाम डिवचण्यासाठी अशी वाक्यं टाकली. सुश्रुतला रश्मीचा डाव कळला आणि तो काहीही न बोलता नुसता शांत स्माईल घेऊन बसून राहिला. सुश्रुतला आपला डाव कळाल्याचं रश्मीला जाणवलं आणि ती पण त्याच्याकडं बघून छान हसली.

‘इतक्या का आवडतात रे तुला मांजरी? किती सेल्फिश असतात त्या... सारखे लाड लागतात त्यांना आणि इतकं करून निरुपयोगी. ॲटिट्युडवाला प्राणी आहे मांजर म्हणजे. आणि केसही किती गळतात त्यांचे!!’’ रश्मी पुन्हा डिवचण्याचा हेतूनं म्हणाली. एकेकाळी हिच्या घरी सुद्धा मांजरी पाळल्या होत्या, हे रश्मीनंच सुश्रुतला कधीतरी सांगितलेलं बहुदा रश्मी विसरली होती, पण सुश्रुत नाही. तेच आठवून त्यानं पुन्हा छान स्माईल दिली आणि म्हणाला, ‘‘कसंय ना... एक प्रकारची मांजर तर तू पण आहेस...’’

‘उगाच? गप्प बैस!’’

‘नाही खरंच सांगतोय मी... तू पण एक मांजरच आहेस. तुलाही सारखे तुझे लाड केलेले आवडतात, तू पण तशी निरुपयोगी आहेस, तुलाही नसता ॲटिट्यूड आहे, तुलाही उगाच खोड्या काढून मांजरांसारखंच खेळायचं असतं आणि मग इतकं करून परत भांडणात तूच नखं मारते. हे बघ, ही मागच्या आठवड्यात मारलेली तुझी नखं अजून दिसत आहेत माझ्या हातावर. आता राहिला प्रश्न मांजरांच्या केसांचा, तर केस तर तुझेही माझ्या टी-शर्टवर सापडतातच मधून-अधून, त्याचा काही हिशोब आहे का?’

सुश्रुत त्याचा मस्त खोडकर मोनोलॉग संपवतो. ‘शट अप!’ रश्मी अर्धवट लाजलेलं लपवत एक स्माईल घेऊन म्हणते.

‘...तर मुद्दा असा आहे, की जर का मला तू इतकी आवडू शकतेस, तर मांजरी का नाही आवडणार? सांग बरं?’

रश्मी पुन्हा लाजणं टाळते आणि ओठ वळवळत हसणं अडवते.

‘काहीतरी कुठेतरी जुळवता चांगलं येतं म्हणून काहीही बोलशील ना तू? आणि मी मांजर आहे का नाही माहीत नाही, तू मात्र नक्कीच बोका आहेस बरंका!’

‘अगदी बरोबर! बोक्यालाच मांजर आवडू शकते. तेच म्हणतोय मी. आणि म्हणूनच ह्या नवीन नियमांपासून तुला वाचवायचा प्रयत्न करतोय मी.’ सुश्रुत म्हणतो आणि हसू लागतो. सवयीप्रमाणं काही बोलायला नसल्यानं रश्मी सुश्रुतला हातावर बोचकारते.

बीइंग ह्युमन वगैरे ऐकलं होतं पण बीइंग ॲनिमल जास्त सुंदर वाटतंय नाही का?

mahajanadi333@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्वारीच्या कोठारात यंदा हरभरा-करडईची पेरणी! अतिवृष्टीमुळे मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना ५७० कोटींचा फटका; ऑक्टोबर उजाडला तरी नाही 'मालदंडी'ची पेरणी

Dmart Offers : डीमार्टमध्ये खरेदीला जाताय? तर चुकूनही विसरू नका 'या' 2 गोष्टी, नाहीतर स्वतःचं नुकसान करून घ्याल..!

आजचे राशिभविष्य - 07 ऑक्टोबर 2025

Yashasvi Jaiswal: मला एक दिवस कॅप्टन व्हायचंय! जैस्वालची 'मन की बात'; शुभमन गिलसमोर उभा राहिला स्पर्धक

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 07 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT