Project Plan
Project Plan Sakal
सप्तरंग

दुनियादारी : काय प्लॅन आहे?

आदित्य महाजन

‘अरे नको छळू... मला प्रोजेक्ट संपवू दे! शांत बसायला काय घेशील?’

‘अरे नको छळू... मला प्रोजेक्ट संपवू दे! शांत बसायला काय घेशील?’

‘मी ना... तुझा या शनिवारचा वेळ घेईन जरा. चालेल?’

अनुराधाच्या शेजारी बसून काहीही काम करत नसलेला शशांक सारखे तिचे कान ओढत, तिला छळता छळता म्हणाला.

‘काये तुझं? दमत नाहीस का? कंटाळत नाहीस का सारखं मला बघून बघून? रोज तर कॉलेजला भेटतो आपण... या शनिवारी सणावाराची अनायसे सुट्टी मिळाली आहे, तर जरा बस ना शांत आणि मला त्या दिवशी तरी झोपू दे मनसोक्त!’ अनू कॉम्प्युटर लॅबमध्ये बसून काम करताकरता थोडी इरिटेट होऊन शशांकला लूक देऊन म्हणाली.

शशांकने एक पॉझ घेतला आणि मग पुन्हा तिचे कान ओढत तिला म्हणाला, ‘बेसिकली ना, तुला काय मी सकाळी सकाळी ७ वाजता हजर राहायला सांगत नाहीये, आरामात ११-१२ नंतर भेट आणि फक्त १ तास हवा आहे तुझा मला. सो ना तुझी झोप खंडित होणारे ना तुझा मी दिवस खाणारे... समजलं? दुसरी गोष्ट, मी तुला भेटायला काय कधी कंटाळून जाईन, असं तर मला काय वाटत नाही, तू कंटाळत असशील तर वो तेरा प्रॉब्लेम है!'

‘अरे कसला चेंगट प्रवृत्तीचा माणूस आहेस अरे तू!! सोडतच नाहीस... कन्व्हिन्स करणं...’ अनू तशीच कॉम्प्युटरमधुन डोकं बाहेर काढून त्याला म्हणाली.

‘तू ते काहीही बोल मला... तुला शनिवारी मला १ तास द्यायचाच आहे!’’

‘ए जा रे... मी नाही भेटणारे. मी कोणालाच इतकी सारखी भेटत नाही.’’

‘ते मला काही सांगू नको, मी ११ ला फोन करणारे.’ ‘मी उचलणारच नाही...’

‘मी तरी वाट बघीन तरी...’ ‘काय वाट लावायची ती लाव स्वतःच्या सुट्टीची.’’

‘असं काय करते अगं... ये कीऽऽऽ!’ असं म्हणत शशांक परत अनूला छळायला लागला.

‘तू आधी सलग दहा मिनिटं शांत बसून दाखव. मला छळणं पण बंद कर सोबत.’ ‘मग येणार ना तू?’

‘श्शऽऽऽऽ. शांत बसायचंय तुला दहा मिनिटं. काहीच नाही बोलायचं.’

शशांक ओठ उडवत २ मिनिटं शांत बसतो. मग पुन्हा तिला छळायला घेतो.

‘सांग ना, येणार ना शनिवारी?’ असं म्हणत शशांक अनूच्या, तिने हाताला बांधलेल्या केस बांधायच्या रबराला अलगद ओढतो. इरिटेट झालेली अनू तिचा नकळत हात खेचते. रबर जास्त ताणलं जातं आणि शाशंकच्या हातून सुटून ते चापकन जोरात अनुच्या गोऱ्या मनगटावर लागतं.

‘स्सऽऽऽऽऽआऽऽऽऽ! अरे आऽऽऽऽ लागलं ना मला!’ ‘अगं, सॉरी सॉरी! तू हात कशाला खेचला... त्यामुळे झालं. आय मीन सॉरी... खूप जोरात लागलं का?’

अनू इवलंसं तोंड करून शशांककडे बघते आणि तिचा राग आणि दुःख दोन्ही न बोलता सांगून टाकते. शशांक पटकन उठून तिची बॅग उगडतो.

‘अरे ए! काय? मुलींची बॅग अशी उघडायची नसते. कशाला अजून छळतोयस बॅग उचकटून?’

अनूच्या या वाक्यावर शशांक काहीच रिॲक्ट करत नाही आणि तिच्या एका कप्यातून तिने ठेवलेले मॉइश्चरायझर काढतो, मग हक्काने तिचा हात हाती घेतो आणि ते क्रीम तिच्या गोऱ्या मनगटावर चापटीने लाल झालेल्या ठिकाणी लावून देतो.

‘एक वेळ नाही आलीस तरी चालेल; पण हा असा चेहरा करून मला गिल्ट नको देत जाऊस बाई!’ शशांक तिच्या हातावर प्रेमाने क्रीम चोळत तिच्याकडे न बघताच म्हणाला.

अनू हे ऐकताच गालात छान हसली. जणू तिचा प्लॅन सक्सेसफुल झाला होता. ‘बास झालं, सोड आता हात.’ ती म्हणाली आणि परत कॉम्पुटरकडे वळली.

शशांक तसाच हलक्या गील्टमध्ये शेजारी शांत बसून राहिला. काही वेळात शांतता तोडत अनू म्हणाली, ‘बसलास हो १० मिनिटं शांत अगदी गुणी बळासारखा. छान. फक्त शनिवारी ११ नाही १२ नंतर फोन कर. मी ११ पर्यंत झोपणार!’

शशांकसुद्धा आता एका गालात अलगद हसला, त्याचाही प्लॅन सक्सेसफुल झाल्यासारखा...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मानवतेला धक्का देणारी घटना! पतीसोबत भांडण झाल्यावर आईने 6 वर्षाच्या मुलाला केलं मगरीच्या हवाली

Nashik Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी 2192 वाहनांचा शोध सुरू; 4 हजार 800 मतदान केंद्रे

MI vs SRH IPL Playoffs : टेन्शन फ्री मुंबई वाढवणार हैदराबादच्या ह्रदयाचे ठोके, एक हार अन् खेळ खल्लास?

Latest Marathi News Update : निवडणूक जिंकले तर अभिनय सोडणार- कंगना

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

SCROLL FOR NEXT