Writing Sakal
सप्तरंग

दुनियादारी : फक्‍त माझ्यावर नको!

‘सिरीयसली? म्हणजे तू सर्रास जे तुझ्या आजूबाजूला घडंल ते सरसकट तसंच्या तसं लिहिणार, वर ते मिरवणार आणि त्याहून पुढं त्यावर मिळालेलं कौतुक मला सांगणार.

आदित्य महाजन

‘सिरीयसली? म्हणजे तू सर्रास जे तुझ्या आजूबाजूला घडंल ते सरसकट तसंच्या तसं लिहिणार, वर ते मिरवणार आणि त्याहून पुढं त्यावर मिळालेलं कौतुक मला सांगणार.

‘काही वाटतं का तुला?’

‘त्यात काय वाटायचंय? लेखकासाठी हे खूप नॉर्मल आहे!’

‘सिरीयसली? म्हणजे तू सर्रास जे तुझ्या आजूबाजूला घडंल ते सरसकट तसंच्या तसं लिहिणार, वर ते मिरवणार आणि त्याहून पुढं त्यावर मिळालेलं कौतुक मला सांगणार. आणि मग एक्सपेक्ट करणार की मी पण तुझं कौतुक करावं??’

‘सही पकडे हैं आप तो! अगदी बरोबर हेच हवंय मला...’

‘अरे, कसला स्वार्थी आणि निर्लज्ज प्राणी आहेस तू!’’

कृत्तिका बेंबीच्या देठापासून अनुजला त्याची तिच्या मते असलेली अनैतिकता मान्य करायला लावत असते. अनुज मात्र त्याच्या वर्तमानपत्रातील सदराला येणाऱ्या प्रतिक्रिया वाचून आनंदी असतो.

‘उगाच मोठाले शब्द वापरू नकोस! जे घडतंय, जे आजूबाजूला आहे, त्यावर लिहिल्यानं कधी कोणी गुन्हेगार होतो का?’

‘अरे, पण तू पूर्ण खरं नाही लिहीत आणि त्यात किती गोडवा आणि रोमँटिकपणा असतो!’

‘माझा लेख, माझे शब्द, माझा चॉईस...’

‘पण पात्रं? तू लिहिणाऱ्या गोष्टीसाठी त्यांची परवानगी?’

कृत्तिका, तू माझे लेख वाचणं सोडलं आहेस. तुला ते खूप साधे आणि तरी ड्रामॅटिकली रोमँटिक वाटतात. वेब सिरीजच्या आणि लार्जर दॅन लाइफ सिनेमांच्या जमान्यात तुलाही इतरांसारखे सगळ्यांत काहीतरी गूढ, रहस्यमयी आणि ॲक्शन पॅक्ड हवंय, पण त्यात साध्या, सरळ, छान गोष्टी मागं पडत आहेत. पुन्हा लोकांना अशा गोष्टी आवडण्यासाठी काहीतरी वेगळी शैली हवी ना? गोष्ट रंगीत पण तर झाली पाहिजे. लोकांनी वाचली पण तर पाहिजे!’

‘ते मान्य आहे अनुज, पण अरे मे बी समोरचा तुझ्याशी कम्फर्ट असल्या कारणानं व्यक्त झाला असेल. त्याला त्याची गोष्ट जगासमोर आणायचीच नसेल. त्याला नसेल आवडत हे सगळं. त्या व्यक्तीची काही पर्सनल स्पेस असेल...’ कृत्तिका पुन्हा पोटतिडकीने म्हणाली.

‘हे बघ, मी नावं बदलून लिहितो, त्या गोष्टीत मीठ, मिरची, मसाला घालून लोकांसमोर आणतो आणि त्यानं लोकांना आनंद होतो. त्यांना माझ्यामुळं मनापासून ४०० शब्दांत छान वाटतं. कदाचित मी तुझ्या तत्त्वांच्या दुनियेतला गुन्हेगार असेनही, पण मी अनेकांसाठी रोजच्या जगण्यातला आवडता विदूषक पण आहे. मला ते जास्त महत्त्वाचं वाटतं.’ अनुजच्या ह्या बोलण्यावर कृत्तिका काहीच बोलत नाही आणि मान दुसरीकडं वळवून बसते.

‘हे बघ, मला माहिती आहे तुला तो चीन आठवड्यांपूर्वी मी तुझ्यावर लिहिलेला, तुझ्यासोबत झालेल्या भेटीवर लिहिलेला लेख नाही आवडला...’

‘पण तुला हे माहीत नाहीये की मी तरी तुझे लेख प्रत्येकवेळी आवडीनं वाचते, न पटले तरी न चुकता!’ कृत्तिका त्याचं वाक्य तोडत म्हणते.

अनुज ते ऐकून छान हसतो. कृत्तिका मात्र काहीही रिॲक्ट करायचं टाळते.

‘हे बघ, तू आता लेखकाशी मैत्री करून तर फसली आहेस, त्याला तू काही नाही करू शकत. पण समजा तुझी गोष्ट, आपली गोष्ट एखाद्याला आयुष्यात छान स्माईल देणार असेल ना, तर हा तुझा दोन तासांचा नाकफुगी राग पण अपून सहन कर लेगा...’ तो मिस्कीलपणे म्हणतो.

कृत्तिका त्या वाक्यानं नमतं घ्यावं का ह्या विचारात, चुकूनही हसायचं टाळत, तशीच बसून राहते.

‘आता कृपा करून फक्त एक रिक्वेस्ट आहे माझी ती ऐक...’

‘आता काय?’

‘ऐकणार असशील तरच सांगते.’

‘आधी बोल गं बाई तू...’

‘प्लीज, आता कृपा करून आज मी हे जे तुझ्याशी भांडले आहे ना, त्यावर किंवा माझ्या ''माझ्यावर नको लिहूस'' ह्या वाक्याला धरून लगेच पुढचा लेख लिहू नकोस!’

‘कसली ओळखतेस अगं तू मला...’

‘चांगलीच! म्हणूनच सांगितीये नको लिहूस. प्रॉमिस?’

अनुज थोडा विचार करतो, मग एक अर्धवट पण छान स्माईल देतो आणि म्हणतो, ‘नाही लिहिणार. प्रॉमिस.’

mahajanadi333@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

SCROLL FOR NEXT