सप्तरंग

भगवान शिवांची तपस्थली श्री क्षेत्र करवीर

अॅड. प्रसंन्ना मालेकर

कोल्हापूर हे जरी जगदंबेच प्रिय क्षेत्र असले तरी ही भगवान शिवांची तपस्थली देखील आहे. त्याहून ही या क्षेत्री एक नियम आहे. प्रत्येक देवतेने या क्षेत्री तप करावे, एक शिवलिंग स्थापन करावे, त्यामुळे या करवीरात शिवक्षेत्रांची मांदीयाळीच आहे. त्यातील काही वैशिष्ट्यपूर्ण शिव स्थाने अशी -

श्री मातृलिंग
करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर असलेले हे लिंग म्हणजे साक्षात महालक्ष्मीचेच लिंगरूप म्हणून याला मातृलिंग म्हणजे मातेचे लिंगरूप म्हणतात. विशेष म्हणजे याला पूर्ण प्रदक्षिणा करतात. 

श्री काशी विश्वेश्वर  
काशी पेक्षा करवीर श्रेष्ठ आहे हे जाणून भगवान ईविश्वेश्वर काशी सोडून परिवारासह करवीरात आले.श्री महालक्ष्मीच्या आज्ञेवरून त्यांनी तिच्या उजव्या हाताला म्हणजे घाटी दरवाजा जवळ राहून भक्तांना मोक्ष देण्याची जबाबदारी सांभाळतात. 

श्री कपिलेश्वर 
कोल्हापूरचे ग्रामदैवत असे भगवान कपिलेश्वर ही विष्णूच्या 24 अवतारापैकी एक असलेल्या महर्षी कपिलांनी स्थापन केले आहे.  जवळ कपिलमुनींची माता व शिष्या अशा देवहुती मातेचही स्थान आहे. याच मंदिरात पूर्वी कोल्हापूरची धर्म सभा बसत असे. कपिलतिर्थ मुजवल्यावर तेथे मंडई झाली आजही ती कपिलतीर्थ मंडई म्हणूनच प्रसिद्ध आहे.

गायत्रेश्वर  
विद्यापीठ हायस्कूलच्या समोर असणारे हे लिंग म्हणजे वेदमाता गायत्रीची तपस्थली आणि तिचे लिंगरूप.

महर्गलेश्वर 
इंदूमती हायस्कूलच्या आवारात कोपऱ्यात असणारे हे शिवालय म्हणजे महालक्ष्मीचा प्रधान अशा बालशिवाचे देवालय. 

इंद्रेश्वर 
महाद्वार रस्ता दासराम बुक डेपो जवळ  इंद्राने वृत्र हत्येचे पाप जाण्या करता तप केले ते हे ठिकाण.

चंद्रेश्वर  
शिवाजी पेठेत चंद्रेश्वर गल्लीत चंद्राने गुरूपत्नी अपहाराचे पातक जाण्यासाठी तप केले. ते हे ठिकाण.

सूर्येश्वर
 शिवाजी पेठेत महाकाली जवळ सूर्याचे तपस्थल आहे.

ब्रम्हेश्वर 
निवृत्ती चौकात शिवाजी महाराजांच्या अर्धा पुतळ्याजवळ देवीचा कथा वाचक म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या ब्रह्मेश्वरचे ठिकाण.

बुधेश्वर-बृहस्पतिश्वर-शुक्रेश्वर
महालक्ष्मी मंदिराच्या पूर्व दरवाजाच्याजवळ  खत्री स्वीटस शेजारी या तिघांची लिंग रूपे.

सर्वेश्वर 
पंचगंगा स्मशानभूमीजवळ सर्वेश्वर हे ठिकाण आहे.   करवीरातील सर्व देवांचे दर्शनाचे फळ देतो म्हणून तो सर्वेश्वर. 

त्रिसंध्येश्वर 
हत्तीमहाल रस्त्यावर संध्यालोपाचा दोष दूर करून त्रिकाल संध्या वंदन केल्याचे पुण्य देतो.

ऋणमुक्तेश्वर 
गंगावेश मंड़ई जवळचे हे ठिकाण. येथे सर्व ऋणातून मुक्ती मिळतो म्हणून तो ऋणमुक्तेश्वर.  

तारकेश्वर  
श्री छत्रपतींच्या समाधी मंदिर परिसरात पंचगंगातीरावर हे तारकेश्वर आहे. रक्षण कर्ता अशी त्याची ओळख आहे. 

रावणेश्वर  
मूळ नाव रामेश्वर असे आहे. शाहू स्टेडीयमजवळ प्रभू राम स्थापित हे ठिकाण आहे.

शूलेश्वर 
कोष्टी गल्लीत करवीरासुर मारून शंकरांनी त्रिशूल रोवला ती जागा. येथेच शृंग ऋषींचे तपस्थान आहे म्हणून शिंगोशी असे या ठिकाणाचे नाव आहे. 

करवीरेश्वर
करवीरासूराचा वध झाला ते हे क्षेत्र. हे ठिकाण डाकवे गल्लीत आहे. 

अग्नीश्वर  
सिद्धाळा बागेजवळ हे ठिकाण आहे. अग्नीचे लिंगरूप म्हणून तो अग्नीश्वर. 

लिंगेश्वर  
करवीरातील सर्व लिंगाच्या दर्शनाचे पुण्य देणारे लिंगेश्वर हे स्थान हुतात्मा पार्कमध्ये आहे. 

नगरा बाहेर असणारी ठिकाणे - 
पूर्व आळते रामलिंग,दक्षिण चक्रेश्वरवाडी चक्रेश्वर, पश्र्चिम कळे कल्लेश्वर, उत्तर मल्लिकार्जुन येडेनिपाणी, औरवाड अमरेश्वर, खिद्रापूर कोपेश्वर, यडूर वीरभद्र, संकेश्वर सिद्ध सांख्येश, बाजार भोगाव भोगेश्वर, वाटेगाव वाटेश्वर, बहे रामेश्वर, हरीपूर संगमेश्वर, याशिवाय अशी अनेक स्थाने आहेत 

करवीरची 12 ज्योतिर्लिंगे 
श्रीलक्ष्मीविजय ग्रंथात कोल्हापुरातली बारा ज्योतिर्लिंगे दिली आहेत ती अशी
1) महाकाल - घाटीदरवाज्याजवळ  माऊली लाॅजच्या तळघरात हे स्थान आहे. 
2) ॐ कार अमलेश्वर - गरूडमंडपासमोर दिपमाळेत हे स्थान आहे. 
3) सोमनाथ - दिपमाळेत सिद्धिविनायकासमोर हे स्थान आहे. 
4) नागनाथ - दिपमाळेत दत्तासमोर हे स्थान आहे.
5) काशीविश्वेश्वर - घाटीदरवाज्याजवळ हे मंदिर आहे. 
6) पूर्व दरवाजा समोर खत्री स्वीट शेजारी तीन देवळे आहेत  त्यातील पहिले बुधेश्वर यालाच घृष्णेश्वर असे म्हणतात  
7) दुसरे बृहस्पतीश्वर म्हणजेच त्र्यंबकेश्वर 
8) आणि तिसरे मंंदिर शुक्रेश्वर - केदारनाथ वैद्यनाथ  मंदीरामागे

9) मल्लिकार्जून -  राधेश्याम मंगल कार्यालयाच्या तळघरात हे स्थान आहे. 
10) भीमाशंकर - कपिलेश्वर मंडईमध्ये हे ठिकाण आहे 
11) रामेश्वर - रावणेश्वर महादेव हे शाहु स्टेडियम शेजारी आहे
12) वैद्यनाथ - विद्यापीठ हायस्कूल राजावाड्यासमोर दगडी चौखांबीत हे स्थान आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT