meteor showers Sakal
सप्तरंग

ययातिचा उल्का वर्षाव पाहण्याची संधी

प्राचीन काळापासून मानव उल्का वर्षावांचा साक्षीदार आहे. खगोलशास्त्राचा अभ्यास करताना मानवाने ही खगोलीय घटना का व कशी घडते.

अमित पुरंदरे

खगोलशास्त्रात आकाशदर्शनाला पर्याय नाही. निरभ्र आकाशात अंधाऱ्या रात्री शहरापासून दूर काळोख्या ठिकाणावरून आकाशदर्शन करताना असंख्य चांदण्यांचा सडा पडलेला दिसतो. निसर्गाच्या या अनोख्या आणि अभिजात आविष्काराला काय उपमा द्यावी, हे सुचतच नाही. असा हा निसर्गाचा आविष्कार अनुभवताना कधी कधी एखादा तारा निखळल्यासारखा दिसतो. या घटनेला नवखे आकाशनिरिक्षक ‘शूटिंग स्टार’ असे संबोधतात. वास्तवतेत ती ‘उल्का’ असते, तारा कधीच निखळत नाही. असा उल्का वर्षाव पाहण्याची संधी आहे.

प्राचीन काळापासून मानव उल्का वर्षावांचा साक्षीदार आहे. खगोलशास्त्राचा अभ्यास करताना मानवाने ही खगोलीय घटना का व कशी घडते, याचा शोध घेतला आणि त्याला समजले की, ही पृथ्वीच्या वातावरणात सातत्याने घडणारी घटना आहे. या अभ्यासाला १६-१७ नोव्हेंबर १८३३मध्ये झालेला ‘सिंह राशीचा उल्कावर्षाव’ कारणीभूत होता. उल्कावर्षाव दर महिन्याला घडणारी खगोलीय घटना असून, त्यासाठी प्रामुख्याने धूमकेतू कारणीभूत असतात. एखादा सुंदर उल्कावर्षाव पाहताना डोळ्यांचे अक्षरश: पारणे फिटते.

खगोल निरिक्षकांमध्ये प्राचीन काळापासून अत्यंत भरवशाचा मानला गेलेला ‘ययाति’चा उल्कावर्षाव ज्याला खगोलीय परिभाषेत ‘पर्सिड्‌स’ म्हणतात, ही दरवर्षी ऑगस्ट महिन्यात मिळणारी अनोखी खगोलीय पर्वणीच आहे. हा उल्का वर्षाव दरवर्षी सातत्याने उत्तरपूर्व आकाशात असणाऱ्या ‘ययाति’ अथवा ‘पर्शियस’ या नक्षत्रामधून होतो.

कधी दिसेल?

  • आकाश निरभ्र असल्यास १२ व १३ ऑगस्टच्या मध्यरात्री उत्तर पूर्व आकाशात ययाति तारकासमूह पहा.

कोठे पहाल?

  • ययाति तारकासमूह शोधण्यासाठी कृत्तिका नक्षत्र किंवा सारथी तारकासमूहाची मदत घेता येईल.

  • हा उल्का वर्षाव नुसत्या डोळ्यांनी जमिनीवर सतरंजी अंथरूण पाठीवर पडून पहावा. दुर्बीण (द्विनेत्री) असल्यास उत्तमच‌.

रेडिअंट पाइंट

कोणताही उल्का वर्षाव व्यवस्थित पाहण्यासाठी त्या उल्का वर्षावाचा ‘रेडिअंट पॉइंट’ माहिती असणे आवश्यक आहे. ‘रेडिअंट पॉइंट’ म्हणजे आकाशाच्या ज्या भागातून जास्तीत जास्त उल्का पडताना दिसतात तो भाग. या उल्का वर्षावाचा ‘रेडिअंट पॉइंट’ हा उत्तर पूर्व आकाशात दिसणाऱ्या ययाति किंवा ‘पर्शियस’ या नक्षत्राजवळ आढळतो.

उल्का वर्षावाचा सर्वोच्च बिंदू

हा उल्का वर्षाव ‘Swift-Tuttle’ या धूमकेतूच्या अंतराळातील कचऱ्यामधून पृथ्वी गेल्यामुळे होतो. हा धूमकेतू ‘हॅले’च्या धूमकेतूसारखाच नियमित येणारा असून त्याचा सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणेचा काळ हा साधारणपणे १३३ वर्षांचा आहे. हा धूमकेतू २१२७मध्ये नुसत्या डोळ्यांनी खूप तेजस्वी दिसण्याची शक्यता आहे. दरवर्षी जुलैमध्ये तिसऱ्या आठवड्यापासून पर्सिड्‌स दिसायला सुरवात होते. मात्र ८ ते १५ ऑगस्ट दरम्यान खूप उल्का दिसू शकतात‌. या उल्का वर्षावाचा सर्वोच्च बिंदू १२ व १३ ऑगस्टच्या मध्यरात्री असतो. या वेळी हा उल्का वर्षाव पाहिल्यास तासाला साधारणपणे ६०-१०० उल्का दिसू शकतात. अंधाऱ्या ठिकाणावरून निरिक्षण करताना आणि आकाशात चंद्र नसताना तासाला १००-१२० उल्काही दिसू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घ्या, सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला आदेश

Latest Marathi News Updates : ३१ जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या – सर्वोच्च न्यायालय

Smriti Mandhana: शाब्बास पोरी! स्मृती मानधनाचा जगभरात दबदबा, वन डे वर्ल्ड कपपूर्वी ICC ने दिली आनंदाची बातमी

Gemini Retro Saree Trend होतोय खूप व्हायरल; पण फोटो बनवताना अजिबात करू नका 'या' 5 चुका, नाहीतर इमेज खराब होणारच

Hidden Story: समुद्राखाली दडलेलं सोनं-चांदीपेक्षा मौल्यवान काय आहे? भारत उलगडणार रहस्य, चावी मिळाली

SCROLL FOR NEXT